logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कूरखेडा येथील कूरखेडा-वाकडी मार्गावरील नगरपंचायतीच्या डंपिंग यार्डसमोर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. धर्मराज तुळशीराम बोदेले (वय ३७, राहणार गोठणगाव) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात दुसऱ्या दुचाकीचे चालक कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत. कासकर हे कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

6 hrs ago
user_श्यामभाऊ लांजेवार
श्यामभाऊ लांजेवार
Advertising agency कुरखेडा, गडचिरोली, महाराष्ट्र•
6 hrs ago
3aab651c-603f-44cd-8d61-52466302334f

कूरखेडा येथील कूरखेडा-वाकडी मार्गावरील नगरपंचायतीच्या डंपिंग यार्डसमोर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. धर्मराज तुळशीराम बोदेले (वय ३७, राहणार गोठणगाव) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात दुसऱ्या दुचाकीचे चालक कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत. कासकर हे कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. शेतात गेलेल्या दोन नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ५३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या घटनेत, किन्ही/मोखे येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय फिर्यादी पुरुषोत्तम रामदास कटनकर हे दुपारी आपल्या घराला कुलूप लावून शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले ३३ हजार रुपये रोख, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ४० हजार रुपये किमतीची ४ ग्रॅमची सोन्याची बदाम छाप अंगठी असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. दुसऱ्या घटनेतही फिर्यादी घराला कुलूप लावून शेतात गेले असताना अज्ञात चोराने घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, ७५ हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि दिवाण पलंगावर ठेवलेला ५ हजार रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    1
    भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. शेतात गेलेल्या दोन नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाख ५३ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचा ऐवज लंपास केला आहे.

पहिल्या घटनेत, किन्ही/मोखे येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय फिर्यादी पुरुषोत्तम रामदास कटनकर हे दुपारी आपल्या घराला कुलूप लावून शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले ३३ हजार रुपये रोख, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ४० हजार रुपये किमतीची ४ ग्रॅमची सोन्याची बदाम छाप अंगठी असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला.

दुसऱ्या घटनेतही फिर्यादी घराला कुलूप लावून शेतात गेले असताना अज्ञात चोराने घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप, ७५ हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि दिवाण पलंगावर ठेवलेला ५ हजार रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भंडारा येथे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आमचे अत्यंत अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहावे ही राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले. तसेच, या राज्यामध्ये आगामी २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील आणि राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील, तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार नाहीत, अशा सर्व चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही थेट प्रतिक्रिया दिली असून २०३४ पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असे ठासून सांगितले आहे.
    1
    भंडारा येथे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आमचे अत्यंत अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहावे ही राज्यातील १४ कोटी जनतेची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले. तसेच, या राज्यामध्ये आगामी २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील आणि राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील, तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार नाहीत, अशा सर्व चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही थेट प्रतिक्रिया दिली असून २०३४ पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असे ठासून सांगितले आहे.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका १३ वर्षांच्या मुलीवर ३२ नराधमांनी सलग ५ दिवस वेगवेगळ्या ४ हॉटेल्समध्ये बलात्कार केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या क्रूर कृत्यादरम्यान त्या निष्पाप मुलीवर काय परिस्थिती ओढवली असेल, याची कल्पनाही करवत नाही. 'बापू की आवाज न्यूज'चे नितेश बाबू (संपर्क: ७७६९८०९६३४) यांनी या अत्यंत भयानक आणि वेदनादायी कहाणीचा थरार मांडला आहे.
    1
    एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका १३ वर्षांच्या मुलीवर ३२ नराधमांनी सलग ५ दिवस वेगवेगळ्या ४ हॉटेल्समध्ये बलात्कार केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या क्रूर कृत्यादरम्यान त्या निष्पाप मुलीवर काय परिस्थिती ओढवली असेल, याची कल्पनाही करवत नाही. 'बापू की आवाज न्यूज'चे नितेश बाबू (संपर्क: ७७६९८०९६३४) यांनी या अत्यंत भयानक आणि वेदनादायी कहाणीचा थरार मांडला आहे.
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter Tirora, Gondia•
    8 hrs ago
  • दरवर्षी ११ जुलै रोजी 'विश्व जनसंख्या दिवस' साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या, मर्यादित संसाधने, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २०२६ सालासाठी देखील हाच संदेश महत्त्वाचा मानला जात असून, लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध संसाधने यांच्यात समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी, पिण्याचे पाणी, गृहनिर्माण, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणावर स्पष्टपणे दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करून लोकसंख्येशी संबंधित आव्हानांवर प्रभावी उपाय शोधता येतील. प्रत्येक नागरिकाने जबाबदार आणि जागरूक निर्णय घेऊन देशाच्या शाश्वत विकासात योगदान देणे आवश्यक आहे. केवळ लोकसंख्या वाढवणे महत्त्वाचे नसून, प्रत्येक व्यक्तीला उत्तम जीवन, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानजनक संधी उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे. कोहराम न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना लोकसंख्या, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, भावी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि संतुलित भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश देण्यात आला आहे.
    1
    दरवर्षी ११ जुलै रोजी 'विश्व जनसंख्या दिवस' साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या, मर्यादित संसाधने, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. २०२६ सालासाठी देखील हाच संदेश महत्त्वाचा मानला जात असून, लोकसंख्या वाढ आणि उपलब्ध संसाधने यांच्यात समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी, पिण्याचे पाणी, गृहनिर्माण, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणावर स्पष्टपणे दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करून लोकसंख्येशी संबंधित आव्हानांवर प्रभावी उपाय शोधता येतील. प्रत्येक नागरिकाने जबाबदार आणि जागरूक निर्णय घेऊन देशाच्या शाश्वत विकासात योगदान देणे आवश्यक आहे. केवळ लोकसंख्या वाढवणे महत्त्वाचे नसून, प्रत्येक व्यक्तीला उत्तम जीवन, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानजनक संधी उपलब्ध करून देणे तितकेच गरजेचे आहे.

कोहराम न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना लोकसंख्या, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, भावी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि संतुलित भविष्य घडवण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश देण्यात आला आहे.
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी ते थेरगाव या महत्त्वाच्या संपर्क मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची आज मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग या परिसरातील अनेक गावांसाठी दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख दुवा असून, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिका याच मार्गाचा वापर करतात. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवघ्या चार-पाच वर्षांत रस्ता उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाच्या निधीचा हा गैरवापर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, खराब भागाची पुनर्बांधणी करावी किंवा गरज पडल्यास संपूर्ण रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक स्तरावरून जोर धरत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
    3
    पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी ते थेरगाव या महत्त्वाच्या संपर्क मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणाची आज मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील डांबर उखडल्यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग या परिसरातील अनेक गावांसाठी दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख दुवा असून, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिका याच मार्गाचा वापर करतात. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवघ्या चार-पाच वर्षांत रस्ता उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासनाच्या निधीचा हा गैरवापर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, खराब भागाची पुनर्बांधणी करावी किंवा गरज पडल्यास संपूर्ण रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक स्तरावरून जोर धरत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागपूरमधील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉल येथे लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सशक्तिकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिलांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वकील पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मुस्तफा पठाण यांनी महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली. प्रेरणा विकास सोसायटीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिला आंदोलनाचे उद्दिष्ट, त्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
    1
    नागपूरमधील व्हीसीए मैदानाजवळ असलेल्या ब्लेसिंग लॉन हॉल येथे लोक कल्याण योजना आणि प्रेरणा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिला सशक्तिकरण कार्यशाळे'चे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर शहर आणि जिल्ह्यातील एकल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि गरजू महिलांसह विविध महिला बचत गटांच्या सदस्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि विविध सरकारी योजनांची माहिती देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात वकील पायल गायकवाड यांनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीररित्या सक्षम करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. मुख्य अतिथी आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मुस्तफा पठाण यांनी महिला सुरक्षा कायदे, आर्थिक सक्षमीकरण आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. अर्बन रूरल मिशनचे समन्वयक राजेश जाधव यांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, लोक कल्याण योजनेचे संचालक संजय वानखेडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली.

प्रेरणा विकास सोसायटीच्या जिल्हा समन्वयक आशा बुरनुरे यांनी एकल महिला आंदोलनाचे उद्दिष्ट, त्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. प्रत्येक एकल महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अलका पोपटकर यांनी केले, तर मंगला तिरपुडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्थानिक एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी क्रांती दलाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. रंजनाताई पारशिवे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी सायंकाळी वरोरा आगार प्रमुखांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा आणि परिसरातील इतर गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी वरोरा येथे येतात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रातील एकही बस वेळेवर धावत नसून, सकाळी ८:०० ते ९:३० दरम्यान येणाऱ्या बसेस तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत आहेत किंवा अनेकदा थेट रद्द केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे महत्त्वाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना हुकत आहेत. शिवाय, महाविद्यालयातील बायोमेट्रिक हजेरीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील स्थानिक एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य आणि दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. बस फेऱ्यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय ओबीसी, एससी, एसटी क्रांती दलाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा सौ. रंजनाताई पारशिवे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी सायंकाळी वरोरा आगार प्रमुखांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

दादापूर, मानोरा, कारेगाव, आष्टा, वडाळा आणि परिसरातील इतर गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी वरोरा येथे येतात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून सकाळच्या सत्रातील एकही बस वेळेवर धावत नसून, सकाळी ८:०० ते ९:३० दरम्यान येणाऱ्या बसेस तब्बल २ ते ३ तास उशिराने धावत आहेत किंवा अनेकदा थेट रद्द केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे महत्त्वाचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या सूचना हुकत आहेत. शिवाय, महाविद्यालयातील बायोमेट्रिक हजेरीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील रस्ते मोडकळीस आले असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने रस्त्याचा कुठलाही अंदाज येत नाही, ज्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी नगरसेवक संदीप बावनकुळे आणि नगरसेविका वैशाली लांजेवार यांच्या नेतृत्वात एक आगळेवेगळे पाऊल उचलण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलकांनी थेट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये धानाचा रोवणा करून हे अनोखे आंदोलन केले.
    1
    भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील रस्ते मोडकळीस आले असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने रस्त्याचा कुठलाही अंदाज येत नाही, ज्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी नगरसेवक संदीप बावनकुळे आणि नगरसेविका वैशाली लांजेवार यांच्या नेतृत्वात एक आगळेवेगळे पाऊल उचलण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलकांनी थेट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये धानाचा रोवणा करून हे अनोखे आंदोलन केले.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.