logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परळी वैजनाथ तालुक्यातील ओंकार शुगर युनिट क्र. ८ पांगरीने मार्च अखेरपर्यंत गाळप केलेल्या ऊसाची देयके घोषित दरानुसार न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीच्या मते, ओंकार शुगरकडून शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल केली जात असून, घोषित दरानुसार संपूर्ण ऊस बिल या महिन्याखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यास १ जूनपासून साखर कारखान्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी, ओंकार शुगरने ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ₹३०५० चा दर जाहीर केला होता, ज्यामध्ये ₹२९५० पहिला हप्ता आणि दिवाळीसाठी ₹१०० असे काही शेतकऱ्यांना बिल अदा केले. नियमानुसार गाळपानंतर पंधरा दिवसांत बिल देणे अपेक्षित असताना, तीन-चार महिन्यांचा विलंब झाला. ८ मे रोजी झालेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनावेळी कारखाना प्रशासनाने २५ मेपर्यंत ₹२९५० प्रति टन दराने सर्व शेतकऱ्यांना देयके देण्याचे लेखी अभिवचन दिले होते. मात्र, त्यानंतर केवळ ₹१८०० प्रति टनाप्रमाणे देयक अदा करण्यात आले, आणि उर्वरित ₹११५० हे २५ मेपर्यंत देण्याचे कबूल केले. आता मे महिना संपत आला तरी ₹१८०० देखील सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि घोषित दरानुसार देयक अदा करण्याबाबत चालढकल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवार, २७ मे रोजी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन दिले. संघर्ष समितीने घोषित केलेल्या दरानुसार ऊस देयके मिळावीत यावर ठाम भूमिका घेतली आहे. राज्यातील इतर ५४ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली असताना, बीड जिल्ह्यातील या साखर कारखान्याबाबत राज्य सरकार, साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या आंदोलनात संघर्ष समितीचे ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, हनुमंत सोळंके, कॉ. भगवान बडे, रघुनाथ दादा देशमुख, हनुमंत लोंढे, कृष्णा कराड, धोंडीबा दिवटे, अशोक शिंदे, दत्तात्रय तिडके, प्रभाकर मुंडे, मनोहर मुंडे, बिभीषण गित्ते, अविनाश मुंडे, शरद गित्ते, सूर्यकांत तिडके यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

1 hr ago
user_M. p. gitte
M. p. gitte
परळी, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago

परळी वैजनाथ तालुक्यातील ओंकार शुगर युनिट क्र. ८ पांगरीने मार्च अखेरपर्यंत गाळप केलेल्या ऊसाची देयके घोषित दरानुसार न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समितीच्या मते, ओंकार शुगरकडून शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल केली जात असून, घोषित दरानुसार संपूर्ण ऊस बिल या महिन्याखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यास १ जूनपासून साखर कारखान्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी, ओंकार शुगरने ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ₹३०५० चा दर जाहीर केला होता, ज्यामध्ये ₹२९५० पहिला हप्ता आणि दिवाळीसाठी ₹१०० असे काही शेतकऱ्यांना बिल अदा केले. नियमानुसार गाळपानंतर पंधरा दिवसांत बिल देणे अपेक्षित असताना, तीन-चार महिन्यांचा विलंब झाला. ८ मे रोजी झालेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनावेळी कारखाना प्रशासनाने २५ मेपर्यंत ₹२९५० प्रति टन दराने सर्व शेतकऱ्यांना देयके देण्याचे लेखी अभिवचन दिले होते. मात्र, त्यानंतर केवळ ₹१८०० प्रति टनाप्रमाणे देयक अदा करण्यात आले, आणि उर्वरित ₹११५० हे २५ मेपर्यंत देण्याचे कबूल केले. आता मे महिना संपत आला तरी ₹१८०० देखील सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत आणि घोषित दरानुसार देयक अदा करण्याबाबत चालढकल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवार, २७ मे रोजी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन दिले. संघर्ष समितीने घोषित केलेल्या दरानुसार ऊस देयके मिळावीत यावर ठाम भूमिका घेतली आहे. राज्यातील इतर ५४ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली असताना, बीड जिल्ह्यातील या साखर कारखान्याबाबत राज्य सरकार, साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या आंदोलनात संघर्ष समितीचे ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, हनुमंत सोळंके, कॉ. भगवान बडे, रघुनाथ दादा देशमुख, हनुमंत लोंढे, कृष्णा कराड, धोंडीबा दिवटे, अशोक शिंदे, दत्तात्रय तिडके, प्रभाकर मुंडे, मनोहर मुंडे, बिभीषण गित्ते, अविनाश मुंडे, शरद गित्ते, सूर्यकांत तिडके यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लातूर जिल्ह्यातील औसा-तुळजापूर हायवेवरील उजनी शिवारात असलेल्या सर्व्हिस रोडवर निष्काळजीपणामुळे सातत्याने अपघात होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी प्रशासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न केले जातील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील औसा-तुळजापूर हायवेवरील उजनी शिवारात असलेल्या सर्व्हिस रोडवर निष्काळजीपणामुळे सातत्याने अपघात होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी प्रशासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न केले जातील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बीड नगरपालिकेने सहा वर्षांपूर्वी बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉफी सेंटर स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे गरीब भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून एक दोन मजली इमारत माफक दरात बांधून दिली होती. मात्र, ही इमारत आता तिच्या मूळ उद्देशापासून भरकटली असून, तिने उनाड टप्पू, तळीराम बेवडे आणि आंबट शौकिनांचा अड्डा बनली आहे. विक्रेत्यांनी केवळ आपल्या नावावर या ठिकाणचे गाळे घेतले, परंतु प्रत्यक्षात त्यांनी तेथे भाजीपाला किंवा फळे विकण्यासाठी येणे बंद केले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, परिसरात अनिष्ट कृत्ये वाढली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, नगरपालिकेतील काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक येथे सुलभ शौचालय आणि मुतारी सुरू केली, ज्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इमारतीच्या चारही गेटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, वापराविना पडून असल्याने इमारतीतील संपूर्ण लाईट फिटिंगची वायरिंग चोरीला गेली आहे. कोविड-१९ काळात इमारत वापरासाठी दिली होती, मात्र त्याचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येते. बीड शहरात अशी चर्चा आहे की, राजकीय नेत्यांनी फक्त इमारत उभी केली आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडून दिले. इमारतीच्या परिसरात स्वच्छतेचा आणि देखभालीचा पूर्ण अभाव असल्याने अनेक जण या जागेचा उपयोग सुलभ शौचालय व मुतारी म्हणून करत आहेत. परिसरात सीसीटीव्ही फुटेज आणि घाण टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत मोठे लिखाण असूनही, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या कोट्यवधी रुपयांच्या वास्तूचा उपयोग सर्वसामान्य नागरिक आणि भाजी विक्रेत्यांना कधी होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेतील विद्यमान मुख्याधिकारी आणि सत्ताधारी लोकांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे. बीडकर अपेक्षा व्यक्त करत आहेत की लवकरच ही इमारत सर्वसामान्यांच्या आणि भाजी विक्रीच्या उपयोगाला येईल.
    1
    बीड नगरपालिकेने सहा वर्षांपूर्वी बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉफी सेंटर स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे गरीब भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून एक दोन मजली इमारत माफक दरात बांधून दिली होती. मात्र, ही इमारत आता तिच्या मूळ उद्देशापासून भरकटली असून, तिने उनाड टप्पू, तळीराम बेवडे आणि आंबट शौकिनांचा अड्डा बनली आहे.

विक्रेत्यांनी केवळ आपल्या नावावर या ठिकाणचे गाळे घेतले, परंतु प्रत्यक्षात त्यांनी तेथे भाजीपाला किंवा फळे विकण्यासाठी येणे बंद केले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, परिसरात अनिष्ट कृत्ये वाढली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, नगरपालिकेतील काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक येथे सुलभ शौचालय आणि मुतारी सुरू केली, ज्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इमारतीच्या चारही गेटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, वापराविना पडून असल्याने इमारतीतील संपूर्ण लाईट फिटिंगची वायरिंग चोरीला गेली आहे. कोविड-१९ काळात इमारत वापरासाठी दिली होती, मात्र त्याचाही बोजवारा उडाल्याचे दिसून येते.

बीड शहरात अशी चर्चा आहे की, राजकीय नेत्यांनी फक्त इमारत उभी केली आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडून दिले. इमारतीच्या परिसरात स्वच्छतेचा आणि देखभालीचा पूर्ण अभाव असल्याने अनेक जण या जागेचा उपयोग सुलभ शौचालय व मुतारी म्हणून करत आहेत. परिसरात सीसीटीव्ही फुटेज आणि घाण टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत मोठे लिखाण असूनही, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या कोट्यवधी रुपयांच्या वास्तूचा उपयोग सर्वसामान्य नागरिक आणि भाजी विक्रेत्यांना कधी होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेतील विद्यमान मुख्याधिकारी आणि सत्ताधारी लोकांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे. बीडकर अपेक्षा व्यक्त करत आहेत की लवकरच ही इमारत सर्वसामान्यांच्या आणि भाजी विक्रीच्या उपयोगाला येईल.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    37 min ago
  • बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्राम पंचायत कार्यालयात बुधवार, २७ मे रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. या कार्यक्रमाला सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्राम पंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अँड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरि पाटील, संजय पावले यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी या वेळी बोलताना माता रमाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाईंचा त्याग, त्यांची प्रेरणा आणि खंबीर साथ अत्यंत मोलाची ठरली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात उच्च शिक्षण घेत असताना, माता रमाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीत घराची आणि संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या या महान त्यागमुळेच बाबासाहेबांना समाजउद्धार आणि भारतीय संविधान निर्मितीसारखे महान कार्य यशस्वीपणे करता आले, असे निर्मळ यांनी आवर्जून नमूद केले. तसेच, बाबासाहेबांनी आपला 'थॉट्स ऑन पाकिस्तान' हा महत्त्वाचा ग्रंथही माता रमाईंना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बाळासाहेब मुळे आणि रमेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.
    1
    बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्राम पंचायत कार्यालयात बुधवार, २७ मे रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले.

या कार्यक्रमाला सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्राम पंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अँड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरि पाटील, संजय पावले यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी या वेळी बोलताना माता रमाई यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाईंचा त्याग, त्यांची प्रेरणा आणि खंबीर साथ अत्यंत मोलाची ठरली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात उच्च शिक्षण घेत असताना, माता रमाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीत घराची आणि संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या या महान त्यागमुळेच बाबासाहेबांना समाजउद्धार आणि भारतीय संविधान निर्मितीसारखे महान कार्य यशस्वीपणे करता आले, असे निर्मळ यांनी आवर्जून नमूद केले. तसेच, बाबासाहेबांनी आपला 'थॉट्स ऑन पाकिस्तान' हा महत्त्वाचा ग्रंथही माता रमाईंना समर्पित केल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी बाळासाहेब मुळे आणि रमेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर तालुक्यातील मांजरी, सखरा, काडगाव, भुसामुदर्गा, टाकळी, जेवळी आणि हरंगुळ या सात गावातील शेतकरी शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या गावातील हजारो एकर शेती मांजरा धरणातून कॅनलद्वारे येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असून, शेतकऱ्यांचा आरोप आहे की गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे. यंदा तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याअभावी ऊसासह इतर पिके वाळून जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर चप्पल ठेवून निषेध व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी आंदोलकांनी “शेती वाचवा, पाणी द्या” आणि “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पाणी सोडण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    लातूर तालुक्यातील मांजरी, सखरा, काडगाव, भुसामुदर्गा, टाकळी, जेवळी आणि हरंगुळ या सात गावातील शेतकरी शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या गावातील हजारो एकर शेती मांजरा धरणातून कॅनलद्वारे येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असून, शेतकऱ्यांचा आरोप आहे की गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे.

यंदा तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याअभावी ऊसासह इतर पिके वाळून जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर चप्पल ठेवून निषेध व्यक्त केला, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी आंदोलकांनी “शेती वाचवा, पाणी द्या” आणि “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पाणी सोडण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • राज्यात डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारक त्रस्त असताना, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही जेव्हा वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करण्याऐवजी चक्क जल्लोष करत आनंद साजरा केला. या घटनेतून कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा एक वेगळा संदेश दिसून आला, जिथे एकीकडे डिझेलसाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे डिझेल संपल्याचाच आनंद व्यक्त करण्यात आला.
    1
    राज्यात डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारक त्रस्त असताना, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही जेव्हा वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करण्याऐवजी चक्क जल्लोष करत आनंद साजरा केला. या घटनेतून कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा एक वेगळा संदेश दिसून आला, जिथे एकीकडे डिझेलसाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे डिझेल संपल्याचाच आनंद व्यक्त करण्यात आला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली.
    1
    आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडे आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    1
    लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने नामदार पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात एक अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच आणि गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
    1
    त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात एक अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच आणि गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीजवळ एका डाळ मिलच्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ आकाशात पसरले होते, ज्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, पाण्याच्या फवाऱ्यांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र गोदामात ठेवलेल्या साहित्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
    1
    उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीजवळ एका डाळ मिलच्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ आकाशात पसरले होते, ज्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, पाण्याच्या फवाऱ्यांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र गोदामात ठेवलेल्या साहित्यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्याचे सांगितले जात आहे.

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.