logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालय, साळवेचा अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रम* *ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालय, साळवेचा अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रम* *१२ मार्चला साळवे इंग्रजी विद्यालयाचा अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ* *इवले से रोप लाविले द्वारी तयाच्या वेलू गेला गगनावरी* 12 मार्च 1951 या दांडी यात्रेच्या वर्धापन दिना चा मुहूर्त साधून कै मा डॉ देवरामभाऊ नारखेडे यांनी व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी साळवे, ता. धरणगाव, जि. जळगाव या आपल्या गावात शैक्षणिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोऊन ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी शाळेत फक्त दहा-बारा विद्यार्थी सुरुवातीला होते. सुरुवातीस काही दिवस ती शाळा गावातच भरत असे, नंतर हळूहळू गावाबाहेर प्रशस्त जागा घेऊन श्रमदानाने व लोकवर्गणीतून इमारत बांधकामात सुरुवात केली. तिचे आजचे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला डोळ्यासमोरच दिसत आहे. कै. देवरामभाऊंची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून हे दिसून येते. तथापि वयाच्या ९९व्या वर्षापर्यंत देखील ते विद्यार्थी प्रिय होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांनी पी एच डी संपादन केली होती. साळवे इंग्रजी विद्यालयात सुरुवातीस आठवी ते अकरावीचे वर्ग होते. तेथे आता पहिली ते बारावी व किमान कौशल्य, तांत्रिक विभाग असे सर्व विभागातून मिळून सुमारे ५५१ विद्यार्थी या काळात शिक्षण घेत आहेत. त्यात प.पू. सानेगुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालय, साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आणि किमान कौशल्य विभा, हे विभाग सुरू आहेत. येथे फक्त साळवेच नव्हे तर खर्दे, भांबर्डी, ऊखळवाडी, कामतवाडी, निशाने, नांदेड, साकरे, कंडारी, निमझरी व नारणे या ग्रामीण भागातील पंचक्रोशीतून विद्यार्थी शिक्षण घेत होते. गेल्या 75 वर्षापासून चेअरमन व संचालक मंडळ सतत प्रयत्न करून शैक्षणिक विकासात खतपाणी घालत आहेत. आज विद्यालयाच्या परिसरात टोलेजंग अशा तीन भव्य इमारती असून त्यात सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, डार्करूम, ड्राइंग हॉल, स्वतंत्र शिक्षक कक्ष, शिक्षिका कक्ष, मुख्याध्यापक कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय व किमान कौशल्याचे वर्कशॉप आणि भव्य असा सुवर्णस्मृती हॉल अशा विविध सोयी आहेत. मजबूत व सुदृढ आरोग्यासाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक शारीरिक, व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील असून एस एस सी साठी व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा, सराव परीक्षा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा व विज्ञान प्रदर्शन वगैरेतून विद्यार्थ्यांचा सहभाग सतत वाढवीत असतात. गेल्या 75 वर्षापासून एस एस सी चा व चाळीस वर्षापासून एच एस सी चा निकाल 85% च्या पेक्षा जास्त आहे एस एस सी नांदेड केंद्रात पहिला येण्याच्या मान सतत आमच्या विद्यालयाचा आहे, ही गोष्ट नम्रपणे नमूद करू इच्छितो. या जडणघडणीत वाटा आहे तो संस्थापक व माजी ऑनररी मुख्याध्यापक कै डॉ देवरामभाऊ, पै रहीम सर, कै सापुरीकर सर, राज्य पुरस्कार प्राप्त हाजी पै शब्बीर सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै चारुदत्त नारखेडे सर, कै. ओंकारभाऊ नारखेडे, कै. नेहेते सर, श्री कोळंबे सर, कै आर एन बऱ्हाटे सर, याशिवाय आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा आणि आजचे मुख्याध्यापक व शिक्षक देखील शालेय शैक्षणिक प्रगती बरोबरच व्यापक व भरीव शिक्षक प्रशिक्षणात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर देखील सदैव यशस्वी आहेत. त्यात प्रामुख्याने मुख्याध्यापक श्री एस डी मोरे, श्री व्ही के मोरे, श्री एस पी तायडे, सौ आर पी नेहेते सहभागी आहेत.अभिमानाची बाब म्हणजे मागील वर्षी आमच्या विद्यालयाला "मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा" या स्पर्धेत तालुकास्तरीय दुसरे बक्षीस एक लाखाचे मिळाले, आणि विभागीय पातळीवर क्रीडा शिक्षक व्ही एस कायंदे यांनी राज्यस्तरीय झालेल्या क्रीडा स्पर्धेत नाशिक येथे दुसरे बक्षीस प्राप्त केले. शिक्षकांचे समवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचांही वाटा तितकाच महत्त्वाच्या आहे. आणि आम्हाला प्रेरणा देणारे संस्थेचे सर्व संचालक मंडळ हे देखील महत्त्वाचे आहेत. विद्यमान चेअरमन डॉ गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे, सचिव श्री रमेशदादा बोरोले, शालेय समितीचे चेअरमन डॉ शशिकांत नारखेडे, आणि सर्व संचालक मंडळ यांचे संस्था व विद्यालयावर कटाक्षाने लक्ष असते. 12 मार्च 1951 या शुभ दिनी सुरू झालेल्या या आमच्या विद्यालयाचा व संस्थेचा यंदा हा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संस्थेचा शाळेच्या इतिहास व प्रगतीच्या आलेख उंचावला आहे. या सर्व प्रगतीत संस्थेचे, शाळेचे व गावाचे सर्व घटक समाविष्ट आहेत, या सर्वांबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगायचे झाले तर यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करताना त्याची चिरंतन व प्रेरणादायी स्मृति सर्वांसमोर ठेऊन प्रगती व्हावी या उद्देशाने वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले गेले आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण स्मृती या भव्य सभागृहासाठी सुमारे दहा लाखाचा निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. संचालक मंडळ, आजी व माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यासर्वांनी स्वेच्छा योगदान कबूल केले व दिले. तरीही महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी त्यात काही माजी विद्यार्थ्यांचा अनुभव अतिशय बोलका आहे.मुंबई येथे राहणारे काशिनाथ इंगळे यांचे कडे देणगी संदर्भात गेले असता त्यांची भेट न होऊ शकल्याने फक्त माहिती पत्रक देऊन 28 तारखेस येतो असे सांगून आले. पुन्हा 28 तारखेस गेले व लिपिक कै. अशोक बोरोले गेलो. तेव्हा आम्हाला पाहून त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. सर्व आदरातित्थे त्यांनी केले. यानंतर त्यांनी चेक लिहायला घेतला तर ते एक आकड्याच्या वर किती शून्य देतात हे कै.अशोक बोरोले पहात राहिले. एकावर चार शून्य देऊन रू.१०,०००/- (रुपये दहा हजार) चा चेक पाहून आम्ही अचंबीत झालो. इतके या शाळेवर त्यांचे प्रेम होते.मा. भवरीलाल जैन सध्या सिन्नरला असतात. त्यांची उलाढाल दरवर्षी कोट्यावधींची करतात त्यांनी देखील एकदाच निवेदन केल्यावर रू. 11000 , ( रुपये अकरा हजार ) चा चेक विनम्रपणे दिला. श्री बंडू मांगो अत्तरदे हे येथील एक कष्टकरी शेतकरी परंतु मुलांना शिकविले ती शिकली पुढे यशस्वी उद्योजक झाली आज श्री बंडू नाना व त्यांची मुले यांची सामायिक प्रॉपर्टीत कोट्यावधींचे घरात आहे, पण दातृत्व ही तसेच त्यांचे चिरंजीव श्री हरी बंडू अत्तरदे व श्री मुरलीधर बंडू अत्तरदे व श्री ज्ञानदेव बंडू अत्तरदे यांनी देखील भरपूर योगदान दिले. व आवश्यकता भासल्यास आणखी देऊ असे आश्वासन दिले. नाशिकला राहात असलेले उद्योजक साळव्याचे मितभाषी सुपुत्र श्री प्रकाश खुशाल बाविस्कर हे आमचे माजी विद्यार्थी आज सातपूर एमआयडीसी मध्ये त्यांचे भव्य दोन युनिट कार्यरत आहेत. त्यांचे मातृभूमी विषयी असलेले प्रेमही तसेच त्यांनी स्वतः रू 11000/-चे भव्य योगदान दिले. शिवाय ज्यावेळी नासिकला शिष्टमंडळ गेले तेव्हा स्वतः कौटुंबिक आदरातिर्थ्याने वागवून स्वतःचा पैसा, वेळ, गाडी, पेट्रोल सर्व खर्च करून निधी जमवण्यासाठी सक्रिय सहभाग दिला, या लोकांचे प्रेम यातून व्यक्त होते, त्यांचे ऋण शब्दांनी व्यक्त करणे शक्य होणार नाही. असे माझी चेअरमन यांनी लिहून ठेवले आहे. हा अनुभव एका बाजूला तर काही वेगळे ही अनुभव येतात आपल्या शाळेतून क ख ग घ शिकून गेलेली मुले त्यांनी आपल्या मुलांना एबीसीडी शिकवली ती मुले आज भारतात विविध भागात नव्हे तर प्रदेशात देखील राहुल भरपूर अर्थाजन करीत आहेत. या संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षक, मेकॅनिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, देशाचे सेवेत सैनिक, उद्योजक व नेते घडत आले आहेत ते आपापल्या क्षेत्रात नाव व त्याची प्रतिष्ठा संपादन करून आहेत. या सर्वांच्या व आजच्या शिकत असलेल्या आणि याही पुढे शिकण्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आज या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेची व संस्थेची प्रगती व भरभर होण्यासाठी परमेश्वराचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. मुख्याध्यापक, साळवे इंग्रजी विद्यालय साळवे

12 hrs ago
user_दीपक  पवार
दीपक पवार
Academy Dharangaon, Jalgaon•
12 hrs ago
09109c2f-4334-428a-b868-51f4a5e83109

ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालय, साळवेचा अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रम* *ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालय, साळवेचा अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रम* *१२ मार्चला साळवे इंग्रजी विद्यालयाचा अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ* *इवले से रोप लाविले द्वारी तयाच्या वेलू गेला गगनावरी* 12 मार्च 1951 या दांडी यात्रेच्या वर्धापन दिना चा मुहूर्त साधून कै मा डॉ देवरामभाऊ नारखेडे यांनी व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी साळवे, ता. धरणगाव, जि. जळगाव या आपल्या गावात शैक्षणिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोऊन ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी शाळेत फक्त दहा-बारा विद्यार्थी सुरुवातीला होते. सुरुवातीस काही दिवस ती शाळा गावातच भरत असे, नंतर हळूहळू गावाबाहेर प्रशस्त जागा घेऊन श्रमदानाने व लोकवर्गणीतून इमारत बांधकामात सुरुवात केली. तिचे आजचे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला डोळ्यासमोरच दिसत आहे. कै. देवरामभाऊंची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून हे दिसून येते. तथापि वयाच्या ९९व्या वर्षापर्यंत देखील ते विद्यार्थी प्रिय होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांनी पी एच डी संपादन केली होती. साळवे इंग्रजी विद्यालयात सुरुवातीस आठवी ते अकरावीचे वर्ग होते. तेथे आता पहिली ते बारावी व किमान कौशल्य, तांत्रिक विभाग असे सर्व विभागातून मिळून सुमारे ५५१ विद्यार्थी या काळात शिक्षण घेत आहेत. त्यात प.पू. सानेगुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालय, साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आणि किमान कौशल्य विभा, हे विभाग सुरू आहेत. येथे फक्त साळवेच नव्हे तर खर्दे, भांबर्डी, ऊखळवाडी, कामतवाडी, निशाने, नांदेड, साकरे, कंडारी, निमझरी व नारणे या ग्रामीण भागातील पंचक्रोशीतून विद्यार्थी शिक्षण घेत होते. गेल्या 75 वर्षापासून चेअरमन व संचालक मंडळ सतत प्रयत्न करून शैक्षणिक विकासात खतपाणी घालत आहेत. आज विद्यालयाच्या परिसरात टोलेजंग अशा तीन भव्य इमारती असून त्यात सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, डार्करूम, ड्राइंग हॉल, स्वतंत्र शिक्षक कक्ष, शिक्षिका कक्ष, मुख्याध्यापक कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय व किमान कौशल्याचे वर्कशॉप आणि भव्य असा सुवर्णस्मृती हॉल अशा विविध सोयी आहेत. मजबूत व सुदृढ आरोग्यासाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक शारीरिक, व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील असून एस एस सी साठी व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा, सराव परीक्षा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा व विज्ञान प्रदर्शन वगैरेतून विद्यार्थ्यांचा सहभाग सतत वाढवीत असतात. गेल्या 75 वर्षापासून एस एस सी चा व चाळीस वर्षापासून एच एस सी चा निकाल 85% च्या पेक्षा जास्त आहे एस एस सी नांदेड

afb1f0c5-c3f4-4cad-848c-061a2cd72af7

केंद्रात पहिला येण्याच्या मान सतत आमच्या विद्यालयाचा आहे, ही गोष्ट नम्रपणे नमूद करू इच्छितो. या जडणघडणीत वाटा आहे तो संस्थापक व माजी ऑनररी मुख्याध्यापक कै डॉ देवरामभाऊ, पै रहीम सर, कै सापुरीकर सर, राज्य पुरस्कार प्राप्त हाजी पै शब्बीर सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै चारुदत्त नारखेडे सर, कै. ओंकारभाऊ नारखेडे, कै. नेहेते सर, श्री कोळंबे सर, कै आर एन बऱ्हाटे सर, याशिवाय आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा आणि आजचे मुख्याध्यापक व शिक्षक देखील शालेय शैक्षणिक प्रगती बरोबरच व्यापक व भरीव शिक्षक प्रशिक्षणात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर देखील सदैव यशस्वी आहेत. त्यात प्रामुख्याने मुख्याध्यापक श्री एस डी मोरे, श्री व्ही के मोरे, श्री एस पी तायडे, सौ आर पी नेहेते सहभागी आहेत.अभिमानाची बाब म्हणजे मागील वर्षी आमच्या विद्यालयाला "मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा" या स्पर्धेत तालुकास्तरीय दुसरे बक्षीस एक लाखाचे मिळाले, आणि विभागीय पातळीवर क्रीडा शिक्षक व्ही एस कायंदे यांनी राज्यस्तरीय झालेल्या क्रीडा स्पर्धेत नाशिक येथे दुसरे बक्षीस प्राप्त केले. शिक्षकांचे समवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचांही वाटा तितकाच महत्त्वाच्या आहे. आणि आम्हाला प्रेरणा देणारे संस्थेचे सर्व संचालक मंडळ हे देखील महत्त्वाचे आहेत. विद्यमान चेअरमन डॉ गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे, सचिव श्री रमेशदादा बोरोले, शालेय समितीचे चेअरमन डॉ शशिकांत नारखेडे, आणि सर्व संचालक मंडळ यांचे संस्था व विद्यालयावर कटाक्षाने लक्ष असते. 12 मार्च 1951 या शुभ दिनी सुरू झालेल्या या आमच्या विद्यालयाचा व संस्थेचा यंदा हा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संस्थेचा शाळेच्या इतिहास व प्रगतीच्या आलेख उंचावला आहे. या सर्व प्रगतीत संस्थेचे, शाळेचे व गावाचे सर्व घटक समाविष्ट आहेत, या सर्वांबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगायचे झाले तर यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करताना त्याची चिरंतन व प्रेरणादायी स्मृति सर्वांसमोर ठेऊन प्रगती व्हावी या उद्देशाने वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले गेले आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण स्मृती या भव्य सभागृहासाठी सुमारे दहा लाखाचा निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. संचालक मंडळ, आजी व माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यासर्वांनी स्वेच्छा योगदान कबूल केले व दिले. तरीही महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी त्यात काही माजी विद्यार्थ्यांचा अनुभव अतिशय बोलका आहे.मुंबई येथे राहणारे काशिनाथ इंगळे यांचे कडे देणगी संदर्भात गेले असता त्यांची भेट न होऊ शकल्याने फक्त माहिती पत्रक देऊन

337bafc0-0810-4ed4-9c6a-2d7edf467cce

28 तारखेस येतो असे सांगून आले. पुन्हा 28 तारखेस गेले व लिपिक कै. अशोक बोरोले गेलो. तेव्हा आम्हाला पाहून त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. सर्व आदरातित्थे त्यांनी केले. यानंतर त्यांनी चेक लिहायला घेतला तर ते एक आकड्याच्या वर किती शून्य देतात हे कै.अशोक बोरोले पहात राहिले. एकावर चार शून्य देऊन रू.१०,०००/- (रुपये दहा हजार) चा चेक पाहून आम्ही अचंबीत झालो. इतके या शाळेवर त्यांचे प्रेम होते.मा. भवरीलाल जैन सध्या सिन्नरला असतात. त्यांची उलाढाल दरवर्षी कोट्यावधींची करतात त्यांनी देखील एकदाच निवेदन केल्यावर रू. 11000 , ( रुपये अकरा हजार ) चा चेक विनम्रपणे दिला. श्री बंडू मांगो अत्तरदे हे येथील एक कष्टकरी शेतकरी परंतु मुलांना शिकविले ती शिकली पुढे यशस्वी उद्योजक झाली आज श्री बंडू नाना व त्यांची मुले यांची सामायिक प्रॉपर्टीत कोट्यावधींचे घरात आहे, पण दातृत्व ही तसेच त्यांचे चिरंजीव श्री हरी बंडू अत्तरदे व श्री मुरलीधर बंडू अत्तरदे व श्री ज्ञानदेव बंडू अत्तरदे यांनी देखील भरपूर योगदान दिले. व आवश्यकता भासल्यास आणखी देऊ असे आश्वासन दिले. नाशिकला राहात असलेले उद्योजक साळव्याचे मितभाषी सुपुत्र श्री प्रकाश खुशाल बाविस्कर हे आमचे माजी विद्यार्थी आज सातपूर एमआयडीसी मध्ये त्यांचे भव्य दोन युनिट कार्यरत आहेत. त्यांचे मातृभूमी विषयी असलेले प्रेमही तसेच त्यांनी स्वतः रू 11000/-चे भव्य योगदान दिले. शिवाय ज्यावेळी नासिकला शिष्टमंडळ गेले तेव्हा स्वतः कौटुंबिक आदरातिर्थ्याने वागवून स्वतःचा पैसा, वेळ, गाडी, पेट्रोल सर्व खर्च करून निधी जमवण्यासाठी सक्रिय सहभाग दिला, या लोकांचे प्रेम यातून व्यक्त होते, त्यांचे ऋण शब्दांनी व्यक्त करणे शक्य होणार नाही. असे माझी चेअरमन यांनी लिहून ठेवले आहे. हा अनुभव एका बाजूला तर काही वेगळे ही अनुभव येतात आपल्या शाळेतून क ख ग घ शिकून गेलेली मुले त्यांनी आपल्या मुलांना एबीसीडी शिकवली ती मुले आज भारतात विविध भागात नव्हे तर प्रदेशात देखील राहुल भरपूर अर्थाजन करीत आहेत. या संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षक, मेकॅनिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, देशाचे सेवेत सैनिक, उद्योजक व नेते घडत आले आहेत ते आपापल्या क्षेत्रात नाव व त्याची प्रतिष्ठा संपादन करून आहेत. या सर्वांच्या व आजच्या शिकत असलेल्या आणि याही पुढे शिकण्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आज या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेची व संस्थेची प्रगती व भरभर होण्यासाठी परमेश्वराचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो. मुख्याध्यापक, साळवे इंग्रजी विद्यालय साळवे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Kishor k Patil Patil
    2
    Post by Kishor k Patil Patil
    user_Kishor k Patil Patil
    Kishor k Patil Patil
    पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
    1
    धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • प्रतिनिधि.... दिलीप मोरे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    2
    प्रतिनिधि....
दिलीप मोरे 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे 
गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    2
    गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात
बातमी :
सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    1
    सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी  भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड...
या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    1
    आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    Sillod, Aurangabad•
    18 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.
    1
    धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.