तळवाडे विद्यालयाचा गुढीपाडवा विद्यार्थी पट वाढवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद..! गुढीपाडव्याच्या मंगलमुहूर्तावर तळवाडे येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयाने गुढीपाडवा… विद्यार्थी पट वाढवा..! हा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवत शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक संदेश दिला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या अभियानाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत डिजिटल शिक्षण,कृतियुक्त अध्यापन, प्रगत शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे मराठी शाळांवर पुन्हा विश्वास वाढताना दिसत आहे. अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यम सोडून मराठी शाळांकडे वळत असल्याची सकारात्मक नोंद यावेळी अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर तळवाडे विद्यालयाने विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पुढाकार घेत, परिसरातील विविध शाळांना भेटी देत पालक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये जास्तीत जास्त प्रवेश व्हावा यासाठी जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीचे महत्त्व पटवून देत, शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही देत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता सौंदाणे यांनी पालकांना आवाहन केले. या अभियानादरम्यान शाळेत नियमित हजर राहण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले.तसेच शाळेतील नवनवीन उपक्रमांची माहिती शिक्षकांनी दिली.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते यांची ग्वाही दिली . प्राथमिक शाळा महादेववाडीचे शिक्षक श्री.आहेर,श्रीमती दोडके,सोमासे वस्ती शाळेचे शिक्षक श्री.उंडे,शिवाजीनगर (गोपाळवाडी ) शाळेचे शिक्षक गणेश घोडसर,पिंपळखुटे शाळेचे शिक्षक श्री.राठोड,श्रीमती.लांडगे यांचा तळवाडे विद्यालयातर्फे सत्कार केला.तसेच जि.प. प्राथमिक शाळेत नवनिर्वाचित तळवाडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सौंदाणे यांचाही सत्कार करण्यात आला.या उपक्रमाचे केंद्रप्रमुख श्री. खरोटे व सहाय्यक केंद्रप्रमुख समाधान आहेर यांनी कौतुक करत हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.यावेळी रंगनाथ नागरे,गोकुळ जेजूरकर, संजय आरखडे,विनोद पगार,बबन सोनवणे,योगेश लांडगे, एस एस. चोळके, सोपान निकम,सातिश पैठणकर, एन.डी.मोरे,एस. बी.आहेर आदी उपस्थित होते. तळवाडे येथील उर्दू प्राथमिक शाळेमधील लहान मुलांसाठी मुख्याध्यापिका सविता सौंदाणे यांच्यावतीने विशेष मिठाई वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.रमजान महिन्याच्या शुभेच्छा देवुन आपल्यातील बंधुत्वभाव जोपासावा हे होते.आयोजित केलेल्या या उपक्रमात प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांना गोड मिठाई देण्यात आली.शिक्षक मोईन अन्सारी व जमील अन्सारी यांनी स्वागत केले.

- येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- नाशिक:दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनावरून परतत असताना कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी व २ पालकांचा समावेश आहे. रात्री १० वाजता शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. अग्निशमन व आपत्ती पथकाने तीन क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी : मराठा कुणबी मंत्रालय वेगळ्याने स्थापन करा मराठ्याचे मंत्री विखे पाटील कामच करत नाही मनोज जरांगे पाटील यांचा विखे पाटलावर..1
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1