Shuru
Apke Nagar Ki App…
डोंबिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर आत्याचार शेजाऱ्याला अटक
चंद्रकला हेमंत वळवी
डोंबिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर आत्याचार शेजाऱ्याला अटक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन; कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम. तळोदा शहरात गणेश मंडळाकडून स्काऊट पथकाकडून निर्माल्य संकलन ...... तळोदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनोखा उपक्रम.... अध्यापक शिक्षण मंडळ धुळे नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष सौ मंगलाताई महाजन व संस्थेचे आधारस्तंभ कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन यांच्या प्रेरणेतून येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो.हू. महाजन व शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट पथकाने शहर व परिसरातील श्री ची स्थापना केलेल्या विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलनाच्या उपक्रम राबविण्यात आला स्काऊट शिक्षक संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शहर व परिसरातील विविध मंडळांना भेट देऊन निर्माल्य संकलन केले श्रीच्या उत्सवात निर्माल्या मुळे विहीर, नदी,तलाव यांचे पाणी दूषित होऊ नये त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला तसेच संकलित केलेले निर्मल्य गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ प्रकल्प केंद्राला सुपूर्द करण्यात आले हा उपक्रम बाबत शाळेचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ .सौ. शितल महाजन उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी पर्यवेक्षक ए आर सूर्यवंशी व पी.आर.वळवी यांनी कौतुक केले आहे. तसेच अशी उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.1
- Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch - सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी. - #DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking1
- धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.1
- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- अक्कलकुवा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्तीची मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे सीईओंना निवेदन अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था.. रस्त्यांची दुरुस्ती करत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी.. भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन... अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने, त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने, संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था तालुक्यात रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.1