logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी... महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!

7 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
7 hrs ago

३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी... महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!

More news from Buldhana and nearby areas
  • महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!
    1
    महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश!
३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी
बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    7 hrs ago
  • खामगाव : शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. 'ऑपरेशन मिशन परिवर्तन' अंतर्गत शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी कॅफे' वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक कॅफेमध्ये शाळा-महाविद्यालयातील मुले-मुली गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ​याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी' कॅफेची झडती घेतली असता, तिथे काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव गावतरे याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही, याची खात्री करावी. तसेच, शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे व हॉटेल चालकांना दिला आहे.​ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणिव डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.
    1
    खामगाव : शहरातील हॉटेल, लॉजेस आणि कॅफेमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध खामगाव पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. 'ऑपरेशन मिशन परिवर्तन' अंतर्गत शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी कॅफे' वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहरात मागील काही काळापासून संशयास्पद कॅफे आणि हॉटेल्सवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक कॅफेमध्ये शाळा-महाविद्यालयातील मुले-मुली गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ​याच अनुषंगाने आज शेगाव रोडवरील 'फूड स्टोरी' कॅफेची झडती घेतली असता, तिथे काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले. या प्रकरणी कॅफे मालक गौरव गावतरे याच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा किंवा कॉलेज सुटल्यानंतर आपली मुले वेळेवर घरी पोहोचतात की नाही, याची खात्री करावी. तसेच, शहरातील सर्व हॉटेल आणि कॅफे चालकांना स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे की, त्यांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना थारा देऊ नये.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर पोलिसांनी यापूर्वीच शहरातील सर्व कॅफे आणि हॉटेल्सना कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा कॅफे व हॉटेल चालकांना दिला आहे.​ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणिव डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Story - सैलानीकडे जाणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले.. दोन भाविक ठार 16 जण जखमी ..
    1
    Story -  सैलानीकडे जाणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले..
दोन भाविक ठार 16 जण जखमी ..
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चिखली - किन्होळा येथील रहिवाशी आदरणीय श्री सचिन बबनराव बाहेकर (शिक्षक) —लाल बहादूर शास्त्री विद्यालय पारडगाव ज्ञानाची मशाल हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! 🔥📚 ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आलेला महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मा. दत्तात्रय वारे गुरुजी जि प शाळा जालिंदरनगर (जगातील पहिला क्रमांक मिळवणारी शाळा)यांच्या हस्ते स्वीकारण्याचा मान त्यांना लाभला — हा त्यांच्या कर्तृत्वाची, समर्पणाची आणि शिक्षणसेवेतील अखंड साधनेची एक उज्ज्वल पावतीच आहे. 🌟🏆 शिक्षक म्हणून त्यांनी केवळ धडे दिले नाहीत, तर संस्कारांची बीजे पेरत असंख्य जीवन घडवली — आणि याच कार्याचा हा अभिमानास्पद गौरव आहे. 🌹 त्यांची प्रेरणा अशीच नवनवीन शिखरे गाठत राहो, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
    2
    चिखली - किन्होळा येथील रहिवाशी  आदरणीय श्री सचिन बबनराव बाहेकर (शिक्षक) —लाल बहादूर शास्त्री विद्यालय पारडगाव 
ज्ञानाची मशाल हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! 🔥📚
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आलेला
महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
मा. दत्तात्रय वारे गुरुजी जि प शाळा जालिंदरनगर (जगातील पहिला क्रमांक मिळवणारी शाळा)यांच्या हस्ते स्वीकारण्याचा मान त्यांना लाभला —
हा त्यांच्या कर्तृत्वाची, समर्पणाची आणि शिक्षणसेवेतील अखंड साधनेची
एक उज्ज्वल पावतीच आहे. 🌟🏆
शिक्षक म्हणून त्यांनी केवळ धडे दिले नाहीत,
तर संस्कारांची बीजे पेरत असंख्य जीवन घडवली —
आणि याच कार्याचा हा अभिमानास्पद गौरव आहे. 🌹
त्यांची प्रेरणा अशीच नवनवीन शिखरे गाठत राहो,
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळत राहो,
हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उभारण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती आता एकाच छताखाली; मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* बुलढाणा सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आधुनिक स्वरूपात मिळावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. माहिती एका क्लिकवर ​जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची चित्रमय माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये योजनेचे स्वरूप, लाभाचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अर्ज कुठे करावा, संपर्क कुठे साधावा आदी माहिती प्रत्येक पॅनलवर सविस्तर मांडण्यात आली आहे. सदर मल्टीमीडिया प्रदर्शनीला शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी तसेच संबंधित विभागाकडे अर्ज सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने ही प्रदर्शनी 30 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रदर्शनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उभारण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती आता एकाच छताखाली;  मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
बुलढाणा
सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आधुनिक स्वरूपात मिळावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
माहिती एका क्लिकवर ​जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची चित्रमय माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये योजनेचे स्वरूप, लाभाचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अर्ज कुठे करावा, संपर्क कुठे साधावा आदी माहिती प्रत्येक पॅनलवर सविस्तर मांडण्यात आली आहे.
सदर मल्टीमीडिया प्रदर्शनीला शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी तसेच संबंधित विभागाकडे अर्ज सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने ही प्रदर्शनी 30 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रदर्शनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    19 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ​खामगाव : "जिथे असते रिस्क, तिथे त्यांची एन्ट्री फिक्स" या उक्तीप्रमाणे, सुटाळा खुर्द येथील एका सार्वजनिक विहिरीत दोन दिवसांपासून अडकलेल्या गायीला (राजमाता) बाहेर काढण्यासाठी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे संस्थापक सुरजभैय्या यादव यांनी धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. आपल्या प्राणाची पर्वा न करता विहिरीत उतरून त्यांनी गायीला सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ​सुटाळा खुर्द येथील रहिवासी अजय बोचरे यांच्या आर.ओ. प्लांटसमोरील एका सार्वजनिक विहिरीत एक गाय पडली होती. रविवारी ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिक नागरिकांनी गायीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु विहिरीची खोली आणि अडथळ्यांमुळे कोणालाही यश आले नाही. अखेर ही माहिती एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना देण्यात आली. ​घटनेची माहिती मिळताच सुरज यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी विलंब न लावता स्वतः विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दोरीच्या सहाय्याने ते खोल विहिरीत उतरले आणि अत्यंत कौशल्याने गायीच्या कमरेला सुरक्षितपणे फास बांधला. त्यानंतर वर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गायीला विहिरीबाहेर जिवंत व सुखरूप काढण्यात यश आले. ​या धाडसी मोहिमेत सुरजभैय्या यादव यांच्यासोबत अजय बोचरे, विशाल कवळे, अकील खान, राजू जवरे, मिलिंद पवार, अमोल बोचरे, जगन्नाथ करांगळे, सुभाष इंगळे, संतोष तायडे, शांताराम धोटे, अजय बोदडे, विशाल ठाकूर, योगेश राऊत या गौ सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. ​"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" अशी ओळख असलेल्या सुरजभैय्यांच्या या कार्यामुळे एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले आहे. त्यांच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल सुटाळा खुर्द परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून संपूर्ण तालुक्यातून या कार्याचा गौरव होत आहे.
    4
    ​खामगाव : "जिथे असते रिस्क, तिथे त्यांची एन्ट्री फिक्स" या उक्तीप्रमाणे, सुटाळा खुर्द येथील एका सार्वजनिक विहिरीत दोन दिवसांपासून अडकलेल्या गायीला (राजमाता) बाहेर काढण्यासाठी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे संस्थापक सुरजभैय्या यादव यांनी धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. आपल्या प्राणाची पर्वा न करता विहिरीत उतरून त्यांनी गायीला सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​सुटाळा खुर्द येथील रहिवासी अजय बोचरे यांच्या आर.ओ. प्लांटसमोरील एका सार्वजनिक विहिरीत एक गाय पडली होती. रविवारी ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिक नागरिकांनी गायीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु विहिरीची खोली आणि अडथळ्यांमुळे कोणालाही यश आले नाही. अखेर ही माहिती एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना देण्यात आली. ​घटनेची माहिती मिळताच सुरज यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी विलंब न लावता स्वतः विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दोरीच्या सहाय्याने ते खोल विहिरीत उतरले आणि अत्यंत कौशल्याने गायीच्या कमरेला सुरक्षितपणे फास बांधला. त्यानंतर वर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गायीला विहिरीबाहेर जिवंत व सुखरूप काढण्यात यश आले. ​या धाडसी मोहिमेत सुरजभैय्या यादव यांच्यासोबत अजय बोचरे, विशाल कवळे, अकील खान, राजू जवरे, मिलिंद पवार, अमोल बोचरे, जगन्नाथ करांगळे, सुभाष इंगळे, संतोष तायडे, शांताराम धोटे, अजय बोदडे, विशाल ठाकूर, योगेश राऊत या गौ सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. ​"एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह" अशी ओळख असलेल्या सुरजभैय्यांच्या या कार्यामुळे एका मुक्या प्राण्याला जीवदान मिळाले आहे. त्यांच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल सुटाळा खुर्द परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून संपूर्ण तालुक्यातून या कार्याचा गौरव होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.