राखीच्या धाग्यात जपला बहिणींच्या मायेचा अनमोल ठेवा — पालकमंत्री गुलाबराव पाटील चोपड्यात बहिणी निर्जलाताई देशमुख व सुशीलाताई गुजर यांच्यासोबत रक्षाबंधन; पद आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जपला भाऊ-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा चोपडा / जळगाव, प्रतिनिधी दिनांक 28ऑगस्ट : पदे बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात आणि काळ पुढे सरकतो; मात्र भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, माया आणि जिव्हाळा कायम तसाच राहतो. याच भावनेचा प्रत्यय रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी चोपडा येथे आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर यांच्या घरी जाऊन अत्यंत कौटुंबिक व आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधन साजरे केले.* बहिणींनी त्यांचे औक्षण करून मनगटावर राखी बांधली आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशासाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री पाटील यांनीही बहिणींना भेटवस्तू देत आपला स्नेह व्यक्त केला. यावेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “राजकारणात पद कितीही मोठे मिळाले आणि जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरी बहिणीसाठी भाऊ हा कायम भाऊच असतो. मनगटावर बांधलेला राखीचा धागा छोटा असला, तरी त्यात बालपणाच्या असंख्य आठवणी, आई-वडिलांचे संस्कार आणि बहिणीची आयुष्यभराची माया गुंफलेली असते. बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील खरी श्रीमंती आहे.” रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबत सण साजरा करण्याची परंपरा पालकमंत्री पाटील यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. सार्वजनिक जीवनातील धावपळ आणि मंत्रीपदाच्या व्यस्ततेतही कुटुंबीयांसाठी वेळ काढत नात्यांमधील जिव्हाळा जपण्याला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले आहे. “वय वाढते, जबाबदाऱ्या वाढतात; पण बहिणीच्या हातून राखी बांधून घेताना मन पुन्हा बालपणात जाते,” अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रक्षाबंधनाचा हा कौटुंबिक सोहळा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आठवणी आणि संस्कारांची वीण अधिक घट्ट करणारा क्षण ठरला. माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव उभा — गुलाबराव पाटील “आयुष्यात मला माझ्या सख्ख्या बहिणींच्या मायेबरोबरच सार्वजनिक आणि राजकीय जीवनात असंख्य माता-भगिनींचे प्रेम व आशीर्वाद लाभले. अनेकांनी मला मंत्री म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील भाऊ म्हणून प्रेम दिले. हा विश्वास माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे. राखीचा प्रत्येक धागा मला या प्रेमाची आणि नात्याची जाणीव करून देतो. माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भावनिक ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी नगरसेवक आबा पाटील, राजेंद्र पाटील, मोतीआप्पा पाटील, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन्ही बहिणींच्या घरी कुटुंबीय एकत्र आल्याने वातावरणात आपुलकी आणि जिव्हाळा भरून राहिला होता. भाऊ-बहीण आणि परिवारातील सदस्यांच्या या स्नेहपूर्ण भेटीने रक्षाबंधनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.

- नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.1
- Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice1
- छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.1
- कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.1
- ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!1
- धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत. अटक आरोपींची नावे: शुभम रतनसिंग गिरासे (22) वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32) रावसाहेब हिम्मत सोनवणे (24) रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26) करण अर्जुन ठाकरे (18) नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. #DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri1
- गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.1