संस्कार,जिद्द अन आत्मविश्वास या मूल्यांची कायम जपणूक करा..! प्रसादशास्त्री कुलकर्णी : सावरगाव विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संस्काराची जपणूक, यशासाठीची जिद्द आणि परीक्षेसह करिअर करण्यासाठीचा आत्मविश्वास या मूल्यांची जपणूक केली की यश नक्कीच मिळते.अपयश ही यशाची पहिली पायरी असते,त्यामुळे केव्हाही खचून न जाता आत्मविश्वासाने स्वतःला पुढे घेऊन जा असे प्रतिपादन पाठ्यपुस्तक व निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी केले. सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील,सहसेक्रेटरी प्रवीण पाटील,माजी सभापती संभाजी पवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.प्राचार्य डी.बी.नागरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,तर पर्यवेक्षिका सविता सौंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक जी.एस.नागरे, सुमेध कुऱ्हाडे ,योगेश भालेराव,यु.एम.आहेर, व्ही.एस.विंचू उपस्थित होते. प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता व विद्यालयाचे आद्य संस्थापक स्व. आण्णाबाबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सुंदर सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावीपणे केले.विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व लेखनी देऊन सत्कार करण्यात आला. सावरगाव परिसरातील शैक्षणिक विकासासाठी विद्यालयाचे मोठे योगदान आहे नेहमीच गुणवत्ता जपून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयाने योगदान दिले आहे विद्यार्थ्यांनीही क्षणाची तळमळ ठेवून चांगले करिअर करण्याला प्राधान्य द्यावे असे प्राचार्य नागरे यावेळी बोलताना म्हणाले.मनोगतात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेले ज्ञान,मार्गदर्शन व प्रत्येक शिक्षकाची वेगळी ओळख जपून भावनिक शब्दांत गुणगौरव केला.या शाळेने आम्हाला भरभरून दिले.निरोप घेताना डोळे पाणावतात,अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.दहावीच्या विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी ओटा बांधण्यासाठी विद्यालयाला देणगी दिली.सूत्रसंचालन निकिता काकड व प्राची पवार या विद्यार्थिनींनी केले...

- 💪1
- Post by Dilip Patil1
- देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे1
- सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...1
- माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.1
- रमाबाई आंबेडकर नगर व शाहूनगर रहिवाशी तसेच पॅंथरा रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुशील नावकर यांनी डॉक्टर व्यंकट राठोड व एचडीएम भूसंपादन अधिकारी यांना यांच्याशी भेट घेऊन व तेथील रहिवासींचे प्रश्न मांडले व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी संवाद साधून येथील रहिवाशींना व सिडकोला समोरासमोर बसून त्यांच्या मोबदल्याची 70 टक्के मिळवून देण्याची व 30 टक्के सिडकोला देण्याची देण्याचे स्पष्ट माहिती दिली रहिवाशी खूप आनंदी बाहेर कलेक्टर ऑफिस मधून निघाले2
- अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.1
- Shaikh irfan1