मानूर येथे रामनवमी उत्साहात साजरी -मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित ; सामाजिक एकात्मतेचा संदेश..! -रामाचे आचरण आणि कृष्णाचे उच्चारण करावे-ह.भ.प.भिल्लारे महाराज- मानूर येथे रामनवमी उत्साहात साजरी -मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित ; सामाजिक एकात्मतेचा संदेश..! -रामाचे आचरण आणि कृष्णाचे उच्चारण करावे-ह.भ.प.भिल्लारे महाराज- शिरूर कासार प्रतिनिधी हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. त्या सर्वांचा नामोल्लेख भगवतगिता या ग्रंथामध्ये आहे. परंतु गितेचा अभ्यास करणे सर्वांना शक्य नाही. त्यामुळे सर्व नामांचे सार दोन शब्दांमध्ये सांगितले आहे ते शब्द म्हणजे राम-कृष्ण हरी. याला मुलमंत्र असेही म्हणतात.राम आणि कृष्ण यांचे जीवनकार्य भिन्न स्वरुपाचे आहे. राम एक वचनी,एक पत्नी तर भगवान श्रीकृष्ण त्यापेक्षा वेगळे आहेत. परंतु दोन्ही देवतांनी जीवन कल्याणाचा मार्ग दाखवला. त्यासाठी रामाचे आचरण आणि कृष्णाचे उच्चारण करावे असा मौलिक संदेश ह.भ.प.भिल्लारे महाराज यांनी दिला. मानूर येथील राम जन्मोत्सवाच्या किर्तन सेवेमध्ये ते बोलत होते. मानूर येथील प्राचिन असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये दिनांक २६ मार्च रोजी राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. गावामधून प्रभु श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रामनामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या जयघोषात ही मिरवणूक राम मंदिरा पर्यंत पोहचली. त्या ठिकाणी ह.भ.प.भिल्लारे महाराज यांचे सांप्रदायिक किर्तन झाले. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करताना त्यांनी प्रभु रामचंद्रांच्या जन्माची कथा अतिशय ओजस्वी शब्दामध्ये सांगितली. आपल्या किर्तनातून त्यांनी सामाजिक संदेश सुध्दा दिला. दुपारी बरोबर 12 वाजता फुलांचा वर्षाव करत प्रभु रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा झाला. या प्रसंगी पंचक्रोषीतील हजारो भाविक उपस्थित होते. आष्टी पाटोदा शिरुर कासार मतदार संघाचे आ.सुरेश अण्णा धस यांच्या वतीने युवा नेते जयदत्त भैय्या धस यांची विशेष उपस्थिती होती. तसेच माजी जि.प.सदस्य जेष्ठ नेते दशरथ दादा वनवे, जि.प.सदस्य रामदास नाना बडे, सामाजिक कार्यकर्ते कलंदर काका पठाण, पोपटराव शिरसाट, उल्हास पाखरे, जयसिंग शिरसाट आदि मान्यवर उपस्थित होते. श्रीराम देवस्थानच्या वतीने बाळासाहेब क्षीरसागर आणि संतोष मानूरकर यांनी सर्व मान्यवर आणि भाविक भक्तांचे स्वागत केले. विशेष म्हणजे रामनवमीच्या या कार्यक्रमाला उपसरपंच मोहब्बत खान पठाण,जेष्ठ नेते यशरबभाई यांच्या नेतृत्वाखाली मानूर गावातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तनकार ह.भ.प.भिल्लारे महाराज यांनी मानूरच्या या सामाजिक एकात्मतेचा आवर्जुन उल्लेख केला. मुस्लीम समाजाला धन्यवाद दिले. समाजाच्या वतीने महाराजांचाही सत्कार करण्यात आला.

- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- Post by AapTak Hindi News Channel1