मुंडगावच्या आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
मुंडगावच्या आठवडी बाजाराचा चिखलमय चेहरा; संत बाईजाबाई ग्रंथालयही पावसाच्या पाण्यात वेढले नागरिकांचा संताप! १७ विशेष प्रतिनिधी मुंडगाव (ता. अकोट, जि. अकोला): श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतींमुळे ओळख असलेल्या मुंडगाव गावातील आठवडी बाजार आणि संत बाईजाबाई ग्रंथालय परिसराची पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न
झाल्याने पावसाचे पाणी साचते, परिणामी संपूर्ण परिसर चिखलमय बनतो. याचा मोठा फटका व्यापारी, विद्यार्थी, वाचक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने घाण पाणी बाजार परिसरात पसरते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न
निर्माण झाले आहेत. संत बाईजाबाई ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या परिसरात पाणी साचत असल्याने ये-जा करणे अवघड बनले असून ज्ञानमंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने नाल्यांची नियमित साफसफाई, पाण्याचा योग्य निचरा आणि बाजार
परिसराचे सिमेंटीकरण याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "संतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंडगावची ही अवस्था बदलणार कधी?" असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालय रेकॉर्ड ग्रामसेवक साहेबांच्या घरी ग्रामपंचायत कार्यालय फक्त नावालाच ग्रामपंचायत वनोजा बाग येथील ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून दिसत नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आणुन देणार ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये रेकॉर्ड रजिस्टर असतात तरी कुठे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा गावात कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा बाग फक्त शोभेची वस्तू बनली आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती फलक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले नाहीत आणि नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये यायचं असेल तर ग्रामसेवक साहेब म्हणतात मला भेटायला अगोदर फोन करायचा अन्यथा नाही याकडे प्रशासनान लक्ष देईल का1
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होते आहेत ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना करत आहेत यावर शासन कारवाई करेल का ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि ग्रामपंचायत मध्ये घान कचरा पडलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो कचरा सारखे पडले आहेत आणि कचरा व्यवस्थापन करणे साठी कुठलीच योजना नाही डजबिन ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून धुळखात पडले आहेत नागरिकांना का वाटप करण्यात आले नाही ग्रामपंचायत कार्यालयात कुठलीच माहिती फलक लावण्यात आले नाहीत यावर शासन कारवाई करेल का हा सवाल गावातील ग्रामस्थ करत आहेत संबंधीत ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे1
- Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा! दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.1