logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या नाशिक–करंजुल एसटी बसची अत्यंत दुरवस्था समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्री धरून प्रवास करावा लागत आहे. छताला अनेक ठिकाणी गळती लागल्याने आसनांवर पाणी साचत असून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार व ज्येष्ठ नागरिकांचे कपडे, पुस्तके आणि सामान भिजत आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना अत्यंत असुरक्षित वातावरणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आदिवासी भागात सातत्याने जुन्या, जीर्ण आणि भंगार बसेस पाठवल्या जात असल्याची तक्रार नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी झोपलेत का असा सवाल करत श्री. गणेश एकनाथ महाले हट्टी यांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने नाशिक–करंजुलसह सुरगाणा तालुक्यातील इतर मार्गांवर तातडीने नवीन व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. गळक्या आणि निकृष्ट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

20 hrs ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
20 hrs ago

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या नाशिक–करंजुल एसटी बसची अत्यंत दुरवस्था समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्री धरून प्रवास करावा लागत आहे. छताला अनेक ठिकाणी गळती लागल्याने आसनांवर पाणी साचत असून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार व ज्येष्ठ नागरिकांचे कपडे, पुस्तके आणि सामान भिजत आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना अत्यंत असुरक्षित वातावरणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आदिवासी भागात सातत्याने जुन्या, जीर्ण आणि भंगार बसेस पाठवल्या जात असल्याची तक्रार नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी झोपलेत का असा सवाल करत श्री. गणेश एकनाथ महाले हट्टी यांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने नाशिक–करंजुलसह सुरगाणा तालुक्यातील इतर मार्गांवर तातडीने नवीन व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. गळक्या आणि निकृष्ट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
    1
    'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रांच्या अवलोकनासाठी बोलावूनही चाळीसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आरटीआय कार्यकर्त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. आरटीआय कायद्याच्या कलम ८ नुसार माहिती देता येत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट असमर्थता दर्शवली. याशिवाय संबंधित कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांना अत्यंत चुकीची वागणूक देण्यात आली आणि अपमानित करण्यात आले.
    1
    माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रांच्या अवलोकनासाठी बोलावूनही चाळीसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आरटीआय कार्यकर्त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. आरटीआय कायद्याच्या कलम ८ नुसार माहिती देता येत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट असमर्थता दर्शवली. याशिवाय संबंधित कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांना अत्यंत चुकीची वागणूक देण्यात आली आणि अपमानित करण्यात आले.
    user_जनहित लोक कल्याण संस्थ धु
    जनहित लोक कल्याण संस्थ धु
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
    1
    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नंदुरबार जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा नगरीत तापी महोत्सवानिमित्त तापी जन्मोत्सव आणि भव्य महाआरती सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. तापी नदीच्या पावन तीरावर आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तापी मातेला वंदन केले. सायंकाळी विद्युत रोषणाईने सजलेल्या तापी घाटावर साकारलेल्या भव्य आरतीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
    1
    नंदुरबार जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा नगरीत तापी महोत्सवानिमित्त तापी जन्मोत्सव आणि भव्य महाआरती सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. तापी नदीच्या पावन तीरावर आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तापी मातेला वंदन केले.

सायंकाळी विद्युत रोषणाईने सजलेल्या तापी घाटावर साकारलेल्या भव्य आरतीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुंबईतील वसई-विरार येथे NEET पेपर लीकप्रकरणी आंदोलकाने सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. जेव्हा पेपर सुरक्षित होता, तर मग तो लीक कसा झाला? असा थेट सवाल विचारत आंदोलकाने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य दावावर लागले असतानाही सरकार या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देत नाही आणि ते गांभीर्याने घेत नाही, असा थेट आरोप आंदोलकाने केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळाविरोधात संताप व्यक्त करत या प्रकरणी न्यायाची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
    1
    मुंबईतील वसई-विरार येथे NEET पेपर लीकप्रकरणी आंदोलकाने सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. जेव्हा पेपर सुरक्षित होता, तर मग तो लीक कसा झाला? असा थेट सवाल विचारत आंदोलकाने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य दावावर लागले असतानाही सरकार या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देत नाही आणि ते गांभीर्याने घेत नाही, असा थेट आरोप आंदोलकाने केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळाविरोधात संताप व्यक्त करत या प्रकरणी न्यायाची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची रोखठोक भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची रोखठोक भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • देशातील सरकार खरोखरच युवा विरोधी आहे का, असा थेट सवाल उपस्थित करणारे विशेष संपादकीय महेश धानके यांनी लिहिले आहे.
    2
    देशातील सरकार खरोखरच युवा विरोधी आहे का, असा थेट सवाल उपस्थित करणारे विशेष संपादकीय महेश धानके यांनी लिहिले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) यांच्यात जोरदार चकमक झाली. आंदोलनादरम्यान आरएएफने अश्रूधूर सोडल्याने विद्यार्थी प्रचंड संतापले. यादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांच्या हातातील लाठ्या हिसकावून घेतल्या. यामुळे घटनास्थळावरील तणाव अधिकच वाढला आणि अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दिल्ली पोलीस व आरएएफला मागे हटावे लागले.
    1
    जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) यांच्यात जोरदार चकमक झाली. आंदोलनादरम्यान आरएएफने अश्रूधूर सोडल्याने विद्यार्थी प्रचंड संतापले.

यादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांच्या हातातील लाठ्या हिसकावून घेतल्या. यामुळे घटनास्थळावरील तणाव अधिकच वाढला आणि अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दिल्ली पोलीस व आरएएफला मागे हटावे लागले.
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.