Shuru
Apke Nagar Ki App…
नंदुरबार जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा नगरीत तापी महोत्सवानिमित्त तापी जन्मोत्सव आणि भव्य महाआरती सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. तापी नदीच्या पावन तीरावर आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तापी मातेला वंदन केले. सायंकाळी विद्युत रोषणाईने सजलेल्या तापी घाटावर साकारलेल्या भव्य आरतीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
ईश्वर मराठे (पत्रकार)
नंदुरबार जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा नगरीत तापी महोत्सवानिमित्त तापी जन्मोत्सव आणि भव्य महाआरती सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. तापी नदीच्या पावन तीरावर आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तापी मातेला वंदन केले. सायंकाळी विद्युत रोषणाईने सजलेल्या तापी घाटावर साकारलेल्या भव्य आरतीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नंदुरबार जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा नगरीत तापी महोत्सवानिमित्त तापी जन्मोत्सव आणि भव्य महाआरती सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. तापी नदीच्या पावन तीरावर आयोजित या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तापी मातेला वंदन केले. सायंकाळी विद्युत रोषणाईने सजलेल्या तापी घाटावर साकारलेल्या भव्य आरतीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण प्रकाशा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची भूमिका मांडत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.1
- माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रांच्या अवलोकनासाठी बोलावूनही चाळीसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आरटीआय कार्यकर्त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. आरटीआय कायद्याच्या कलम ८ नुसार माहिती देता येत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट असमर्थता दर्शवली. याशिवाय संबंधित कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांना अत्यंत चुकीची वागणूक देण्यात आली आणि अपमानित करण्यात आले.1
- सुरगाणा तहसील कार्यालयावर भर पावसात श्रमजीवी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू ठेवले.1
- सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या नाशिक–करंजुल एसटी बसची अत्यंत दुरवस्था समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्री धरून प्रवास करावा लागत आहे. छताला अनेक ठिकाणी गळती लागल्याने आसनांवर पाणी साचत असून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार व ज्येष्ठ नागरिकांचे कपडे, पुस्तके आणि सामान भिजत आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना अत्यंत असुरक्षित वातावरणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आदिवासी भागात सातत्याने जुन्या, जीर्ण आणि भंगार बसेस पाठवल्या जात असल्याची तक्रार नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी झोपलेत का असा सवाल करत श्री. गणेश एकनाथ महाले हट्टी यांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने नाशिक–करंजुलसह सुरगाणा तालुक्यातील इतर मार्गांवर तातडीने नवीन व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. गळक्या आणि निकृष्ट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- बाढ उपविभागातील सम्यागड पंचायतीमध्ये असलेल्या आयुष्मान भारत आरोग्य केंद्राच्या जर्जर अवस्थेबाबत रोगी कल्याण समितीचे सदस्य रण विजय कुमार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार अनंत कुमार सिंह यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, औषधांचा अभाव, इमारतीची दुरवस्था, तुटलेली स्टाफ क्वार्टर्स तसेच तातडीची (इमर्जन्सी) आणि रात्रीची सेवा सुरू करण्याची मागणी लावून धरली. याशिवाय, नियमित ड्युटी न करता पगार घेणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आमदारांकडे करण्यात आली. या आरोग्य केंद्रावर सम्यागडसह आसपासच्या पाच पंचायतींमधील सुमारे २५ हजार लोकसंख्या उपचारासाठी अवलंबून आहे. आता या गंभीर समस्येवर आरोग्य विभाग आणि प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांनी 'ज्यांनी निवडून दिले त्यांच्या पोरांना मारताय' असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची रोखठोक भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहीमही राबवली.1