logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma

5 hrs ago
user_Jb Y.Sharma
Jb Y.Sharma
Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    1
    डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई 
डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त,
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    24 min ago
  • जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
प्रतिनिधी : संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे :
जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    3 hrs ago
  • धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच गोंदिया/भंडारा: महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत: * निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. * महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत. इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
    1
    धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच
गोंदिया/भंडारा:
महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.
प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी
बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत:
* निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे.
* महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत.
इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी
धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे.
शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गायलं भजन चंद्रपूर - आज गणेश चतुर्थी राज्यात आज वाजतगाजत गणरायाचे स्वागत करण्यात आले, चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा कार्यालयात सुद्धा बाप्पाचे आगमन झाले. यावेळी खासदार धानोरकर यांनी आपल्या सुरेल वाणीतून भजन गायले..
    1
    चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गायलं भजन
चंद्रपूर - आज गणेश चतुर्थी राज्यात आज वाजतगाजत गणरायाचे स्वागत करण्यात आले, चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा कार्यालयात सुद्धा बाप्पाचे आगमन झाले. यावेळी खासदार धानोरकर यांनी आपल्या सुरेल वाणीतून भजन गायले..
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    1
    सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली 
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Wardha: रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अमर काळे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची घेतली Wardha: रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अमर काळे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची घेतली
    1
    Wardha: रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अमर काळे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची घेतली
Wardha: रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अमर काळे यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची घेतली
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    38 min ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    1
    ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.