logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews

6 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
6 hrs ago

Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    1
    Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला...
पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले.
सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    1
    ​नाचनवेल येथे ठाकरे शिवसेनेची 'शिवसंकल्प' बैठक संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला 'शिवसेना इंगा' दाखवण्याचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    1
    जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातून श्रावण सोमवारनिमित्त आज भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात्रेदरम्यान भाविकांनी भगवान शंकराचे नामस्मरण करत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कांचन नगर परिसरातील नागरिकांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. यात्रेच्या निमित्ताने परिसरात धार्मिक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. ##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. सोमेश मुळे जळगाव: साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
##साखर दरवाढीविरोधात जळगाव मनपाजवळ 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचे तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!.. 
सोमेश मुळे जळगाव:
साखरेच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या वाढत्या साखर भाववाढीच्या विरोधात आज जळगाव महानगरपालिकेजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
माजी महापौरांच्या नेतृत्वात घोषणाबाजी
या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा महापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी केले. 'साखर भाव कमी झालेच पाहिजेत', 'केंद्र व राज्य सरकारचा निषेध असो' अशा तीव्र घोषणा देत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे जगणे कठीण झाले असून, सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
आंदोलनानंतर उबाठा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. साखरेचे दर नियंत्रित आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या तळोदा शहरातील शनी गल्ली येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
    1
    तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड

तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड
मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या तळोदा शहरातील शनी गल्ली येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली.
मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस सज्ज; मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून काढला भव्य रूट मार्च Dhule Police ready for Prophet Jayanti; Grand route march taken out along the main route of the procession
    1
    पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस सज्ज; मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरून काढला भव्य रूट मार्च
Dhule Police ready for Prophet Jayanti; Grand route march taken out along the main route of the procession
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.