logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*ग्रामपंचायत कर्मचाऱी धडकले भंडारा जिल्हा परिषदे वर महासंघाचे महाधरणे आंदोलन-निवेदन सादर- आंदोलनाला खासदाराची भेट- पाठपुराव्याचे आश्वासन*साकोली तील पदाधिकारींचा समावेश साकोली -: आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यकार्यकारिणी सूचनेनुसार दिनांक 11 मे 2026 ला भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. आणि मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री व माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या नावे जिल्हा परिषदेचे अधीक्षक श्री अजय भदुरीया यांनी स्वीकारले. शिष्टमंडळात युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते, कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव कॉम्रेड जयप्रकाश मेहर, आयटक जिल्हा सचिव काॅमेड हिवराज उके, जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड गजानन लाडसे, जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष शेंडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख कॉम्रेड कृष्णकुमार डहाळे, कॉम्रेड जयशंकर राऊत, कॉम्रेड गौरीशंकर धुमनखेडे, कॉम्रेड जागेश्वर राऊत इत्यादींचा समावेश होता. निवेदनात राज्य शासनाने अभय यावलकर समितीच्या शिफारशी मंजूर करून अंमलबजावणी करावी, किमान वेतन कायद्याप्रमाणे दर पाच वर्षांनी वेतन दर पुनर्रचना करून वेतन वाढ करण्यात यावी, वेतनासाठी उत्पन्नाची अट रद्द करून सरसकट शंभर टक्के अनुदान द्यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक अद्यावत करण्यात यावे, अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी इत्यादी स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांचा समावेश करण्यात आला. याप्रसंगी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आंदोलनाला भेट दिली. त्यानी मागण्यांचे समर्थन करून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माननीय खासदारांना संघटनेतर्फे कॉम्रेड माधवराव बांते, कॉम्रेड शिवकुमार गणवीर व कॉम्रेड हिवराज उके यांच्या हस्ते "शिवाजी कोण होता" ही पुस्तिका भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव जयप्रकाश मेहर यांनी केले. मोठ्या संख्येत ग्रामपंचायत महिला पुरुष कर्मचारी उपस्थित होते

1 hr ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
1 hr ago
1e9dba2e-951f-4f2a-ba21-c803888f512d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डीजे आणि फटाक्यांविना एक आगळावेगळा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार पौर्णिमा इटनकर यांचा सौरभ चांदेवार यांच्याशी हरिनामाच्या गजरात विवाह विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडला. या संस्कारमय सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
    2
    भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डीजे आणि फटाक्यांविना एक आगळावेगळा भक्तिमय विवाह सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार पौर्णिमा इटनकर यांचा सौरभ चांदेवार यांच्याशी हरिनामाच्या गजरात विवाह विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने पार पडला. या संस्कारमय सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका राईस मिलमधील लाकडं थेट गावात फेकली गेली. यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
    1
    गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका राईस मिलमधील लाकडं थेट गावात फेकली गेली. यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
    user_हिमालय धकाते
    हिमालय धकाते
    साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले. यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
    1
    काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी, नागरीकांमध्ये खळबळ, पोलीस प्रशासन आरोपींच्या शोधात 
काळी दौलत येथुन ९ जनावरे चोरी
काळी दौलत परिसरात अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून गावात खळबळ उडाली आहे. फिर्यादी संतोष पुंड यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक १० मे २०२६ रोजी रात्री घरासमोर खुट्याला बांधून ठेवलेली पांढऱ्या रंगाची गाय सकाळी आढळून आली नाही. शोध घेतल्यानंतर गावातील इतर नागरिकांचीही जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले.
यामध्ये मिर्झा तहा बेग यांची एक गाय, आदित्य डवरे यांची एक गाय, विपूल मिरासे यांची गाय तसेच इतर तीन जनावरे आणि फिर्यादीची गाय अशा एकूण सुमारे १ लाख ५ हजार रुपयांची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली.तसेच दोन दिवसांपूर्वी नागेंद्र मोरे व निखील गायकवाड यांच्या गायी व गोऱ्हा चोरीला गेल्याचीही बाब समोर आली असून त्यांची किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे परिसरातील एकूण १ लाख ४७ हजार रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    27 min ago
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.
    1
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिवापूर पंचायत समितीचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यासाठी रवाना झाले आहे. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मूल्यांकनाचे महत्त्वाचे काम करणार आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    10 hrs ago
  • *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    1
    *Breaking News...*
नागपुर.
(New Ring Road)
*खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    1
    अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    1
    उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.