क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता.. भिगवण परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी.. क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता.. भिगवण परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी (MSBTE) संलग्न असलेल्या अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञान (ADMLT) या अभ्यासक्रमाची शासकीय मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेतील विविध चाचण्या, नमुना संकलन, नमुना हाताळणी, उपकरणांचा वापर आणि चाचण्यांचे तांत्रिक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉस्पिटल्स, पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि कौशल्य शिक्षणासाठी बाहेरच्या शहरात जावे लागू नये व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर व प्रा. तुषार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता.. भिगवण परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी.. क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला शासनाची मान्यता.. भिगवण परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षीरसागर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी (MSBTE) संलग्न असलेल्या अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी तंत्रज्ञान (ADMLT) या अभ्यासक्रमाची शासकीय मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेतील विविध चाचण्या, नमुना संकलन, नमुना हाताळणी, उपकरणांचा वापर आणि चाचण्यांचे तांत्रिक ज्ञान दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉस्पिटल्स, पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि कौशल्य शिक्षणासाठी बाहेरच्या शहरात जावे लागू नये व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर व प्रा. तुषार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1
- निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.4
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1