पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत पारध/ श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी : येथील बालाजी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकादशीच्या उत्तर रात्री महादेवाची स्वारी काढण्यात आली. त्यानंतर द्वादशीच्या उत्तर रात्री विष्णू बेराड यांनी साकारलेल्या आई अंबा भवानीच्या स्वारीने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या दोन्ही स्वारींमुळे गावात धार्मिक उत्साहाची अनोखी उर्जा निर्माण झाली. अंबा भवानीच्या स्वारीची सुरुवात रात्री उशिरा झाली असून पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत “पावली” खेळत संपूर्ण गावभर प्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपारिक दफड्याच्या तालावर आणि “बोल अंबा भवानी की जय”च्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या भक्तिमय सोहळ्यात सर्व गावकरी, भाविक भक्त, महिला मंडळ तसेच लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. विशेषतः तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या स्वारीला अधिकच आकर्षक रूप दिले. श्री बालाजी मंदिर संस्थानात झालेल्या आरती नंतर गावात स्वारीच्या प्रदक्षिणाला सुरुवात झाली. स्वारीदरम्यान भक्तांनी फुलांचा वर्षाव करत देवीचे स्वागत केले. तसेच महिलांनी घरासमोर रांगोळी काढून स्वारीचे पूजन केले. युवकांनी फटाके फोडून स्वारी समोर जल्लोष साजरा केला. अंबा भवानी स्वारीची ही परंपरा पारध येथील पारंपरिकरित्या कुलकर्णी घराण्याकडे असून ही परंपरा अनेक वर्षांपासून जतन केली जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बालाजी मंदिर संस्थान, पारध बु. यांच्या कमिटीने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये अध्यक्ष श्री दिलीप तुकाराम बेराड, उपाध्यक्ष श्री देविदास आनंदा तेलंग्रे, सचिव श्री बंकिमचंद्र सुरेश लोखंडे तसेच सदस्य समाधान भिकाजी लोखंडे, श्री गणेश शंकरराव वडगावकर, श्री सुभाष जानुबा तबडे आणि श्री रमेश देविदास गालफडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या उत्सवामुळे पारध गावात भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.
पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत पारध येथे बालाजी चैत्र नवरात्र उत्सवात आई अंबा भवानी स्वारीने वाढली रंगत पारध/ श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी : येथील बालाजी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकादशीच्या उत्तर रात्री महादेवाची स्वारी काढण्यात आली. त्यानंतर द्वादशीच्या उत्तर रात्री विष्णू बेराड यांनी साकारलेल्या आई अंबा भवानीच्या स्वारीने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या दोन्ही स्वारींमुळे गावात धार्मिक उत्साहाची अनोखी उर्जा निर्माण झाली. अंबा भवानीच्या स्वारीची सुरुवात रात्री उशिरा झाली असून पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत “पावली” खेळत संपूर्ण गावभर प्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपारिक दफड्याच्या तालावर आणि “बोल अंबा भवानी की जय”च्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या भक्तिमय सोहळ्यात सर्व गावकरी, भाविक भक्त, महिला मंडळ तसेच लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. विशेषतः तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला
मिळाला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या स्वारीला अधिकच आकर्षक रूप दिले. श्री बालाजी मंदिर संस्थानात झालेल्या आरती नंतर गावात स्वारीच्या प्रदक्षिणाला सुरुवात झाली. स्वारीदरम्यान भक्तांनी फुलांचा वर्षाव करत देवीचे स्वागत केले. तसेच महिलांनी घरासमोर रांगोळी काढून स्वारीचे पूजन केले. युवकांनी फटाके फोडून स्वारी समोर जल्लोष साजरा केला. अंबा भवानी स्वारीची ही परंपरा पारध येथील पारंपरिकरित्या कुलकर्णी घराण्याकडे असून ही परंपरा अनेक वर्षांपासून जतन केली जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बालाजी मंदिर संस्थान, पारध बु. यांच्या कमिटीने विशेष परिश्रम घेतले. यामध्ये अध्यक्ष श्री दिलीप तुकाराम बेराड, उपाध्यक्ष श्री देविदास आनंदा तेलंग्रे, सचिव श्री बंकिमचंद्र सुरेश लोखंडे तसेच सदस्य समाधान भिकाजी लोखंडे, श्री गणेश शंकरराव वडगावकर, श्री सुभाष जानुबा तबडे आणि श्री रमेश देविदास गालफडे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या उत्सवामुळे पारध गावात भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.
- नाशिक : ऑपरेशन ‘मुस्कान’ची मोठी कारवाई; धरणाजवळील झोपडीतून अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी जेरबंद नाशिकमध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ ने मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Nashik शहरातील Indiranagar Police Station येथे गु.र.नं. १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त (गुन्हे) Kiran Kumar Chavan यांनी दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी Hemant Todkar यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि संशयित आरोपी Dhamangaon येथे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) Sandeep Mitke यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक धामणगाव येथे रवाना झाले. परिसरात शोधमोहीम सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून आरोपी आणि अल्पवयीन मुलगी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका झोपडीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी विलास भाऊसाहेब जाधव (वय १८, रा. पाथर्डी शिवार, पांडवलेणी पोलीस क्वार्टर वसाहत, नाशिक) याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त Sandeep Karnik, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- जळगाव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित 'जळगाव ग्रंथोत्सव २०२६' मध्ये हिंगोणे बु॥ (ता. धरणगाव) येथील श्री. निंबा पुंडलिक कुंभार यांचा गौरव करण्यात आला. २४ व २५ मार्च रोजी संपन्न झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात श्री. निंबा कुंभार लिखित 'संत गोराबा काका' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील साहित्याचा असा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.1
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख1
- Post by Hiralal Barde1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील कॉटन जिनिंग मध्ये विश्वास संपादित करत पर राज्यातील दोघांनी 96 लाखाची 420 करून कॉटन जिनिंग मालकाची 96 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे सदरील कॉटन जिनिंग मॅनेजर ने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे1
- मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1
- सिल्लोड तालुक्यात झालेल्या गारपीट अवकाळी पावसाने आसमानी वीज पडल्याने केहाळा येथे तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला तर एका म्हशीचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे तालुक्यातील आमठाणा येथील बस स्थानक परिसरात पिंपळाच्या झाडावर वीज पडल्याने मोठी जीवित हानी होता होता वाचली सदरील ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र विजेचा कडकडात सुरू असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते मात्र सदरील ठिकाणी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी असते1