logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुण्यात PMPML वर नियंत्रणच नाही? बेवड्याने बस पळवली, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

4 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
4 hrs ago

पुण्यात PMPML वर नियंत्रणच नाही? बेवड्याने बस पळवली, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पुण्यातील भर रस्त्यावर एका गरोदर महिलेने नवजात बाळाला जन्म दिलाय. एक डॉक्टर या मायलेकीसाठी देवदूतचं ठरलेत. शिरुर ग्रामीण रुग्णालयाच्या लगतचं ही आश्चर्यकारक घटना घडली. या घटनेनं माणुसकीचं दर्शन घडवलं. जोशीवाडी येथील ही महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, ती ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र प्रसूतीच्या कळा असह्य झाल्यानं ती रस्त्यावर बसून राहिली. उपस्थितांनी हे पाहिलं अन प्रसंगावधान दाखवत डॉक्टर सुनीता पोटे यांना कळवलं. त्या तातडीनं तिथं पोहचल्या अन परिस्थितीचा अंदाज घेतला. तातडीनं प्रसूती केली नाहीतर कोणाच्या तरी जीवावर बेतेल, अशी स्थिती होती. मग क्षणाचा ही विलंब न करता, त्यांनी रस्त्यावर प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांच्या नजरा या उपचारांकडे लागून होत्या, सिच्युएशन टेंस होती. सगळेच प्रार्थना करत होते अन अचानक नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला, डॉक्टर पोटे उभ्या राहिल्या, हातात चिमुरड्याला पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. टेंस सिच्युएशनमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. डॉक्टर पोटे जणू या मायलेकीसाठी देवदूत बनून धावल्या. यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन ही घडले.... : सुनीता पोटे - प्रसूती करणाऱ्या डॉक्टर #पिंपरीचिंचवड #पुणे #प्रसूती #भररस्ता #डॉक्टरदेवदूत #माणुसकी #सुनीतापोटे #ग्रामीणरुग्णालय #आईआणिबाळ #ह्यूमनस्टोरी #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #Pune #RoadsideDelivery #DoctorHero #Humanity #GoodNews #SunitaPote #RuralHospital #MotherAndBaby #HumanStory #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पुण्यातील भर रस्त्यावर एका गरोदर महिलेने नवजात बाळाला जन्म दिलाय. एक डॉक्टर या मायलेकीसाठी देवदूतचं ठरलेत. शिरुर ग्रामीण रुग्णालयाच्या लगतचं ही आश्चर्यकारक घटना घडली. या घटनेनं माणुसकीचं दर्शन घडवलं. जोशीवाडी येथील ही महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, ती ग्रामीण रुग्णालयात निघाली होती. मात्र प्रसूतीच्या कळा असह्य झाल्यानं ती रस्त्यावर बसून राहिली. उपस्थितांनी हे पाहिलं अन प्रसंगावधान दाखवत डॉक्टर सुनीता पोटे यांना कळवलं. त्या तातडीनं तिथं पोहचल्या अन परिस्थितीचा अंदाज घेतला. तातडीनं प्रसूती केली नाहीतर कोणाच्या तरी जीवावर बेतेल, अशी स्थिती होती. मग क्षणाचा ही विलंब न करता, त्यांनी रस्त्यावर प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. उपस्थितांच्या नजरा या उपचारांकडे लागून होत्या, सिच्युएशन टेंस होती. सगळेच प्रार्थना करत होते अन अचानक नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला, डॉक्टर पोटे उभ्या राहिल्या, हातात चिमुरड्याला पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. टेंस सिच्युएशनमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. डॉक्टर पोटे जणू या मायलेकीसाठी देवदूत बनून धावल्या. यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन ही घडले....
: सुनीता पोटे - प्रसूती करणाऱ्या डॉक्टर
#पिंपरीचिंचवड #पुणे #प्रसूती #भररस्ता #डॉक्टरदेवदूत #माणुसकी #सुनीतापोटे #ग्रामीणरुग्णालय #आईआणिबाळ #ह्यूमनस्टोरी #ब्रेकिंगन्यूज
#PimpriChinchwad #Pune #RoadsideDelivery #DoctorHero #Humanity #GoodNews #SunitaPote #RuralHospital #MotherAndBaby #HumanStory #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • gais mere Sath accident hone ke bad Mera porter walon Ne kuchh Khair nahin Rakha aur mujhe Mera confirmation paise nahin mile hain
    1
    gais mere Sath accident hone ke bad Mera porter walon Ne kuchh Khair nahin Rakha aur mujhe Mera confirmation paise nahin mile hain
    user_Altaf Pathan
    Altaf Pathan
    Kirana store पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • छ. संभाजीनगर बजाज नगरमध्ये, प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नीची हत्या केली.
    1
    छ. संभाजीनगर बजाज नगरमध्ये, प्रेमसंबंधांच्या संशयावरून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नीची हत्या केली.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भोरच्या शिक्षण क्षेत्रातील 'दीपस्तंभ' पाटील गुरुजी सेवानिवृत्त; ग्रामस्थांनी सजवलेल्या बैलगाडीतून काढली शाही मिरवणूक विक्रम शिंदे /भोर दि.२5 विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी (ता. भोर) येथील मुख्याध्यापक आणि 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्काराचे मानकरी पुंडलिक गोविंद पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल साडेतीन दशकांच्या निस्पृह सेवेनंतर पाटील गुरुजी सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या निरोप समारंभाला भोर तालुक्यातील शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले.सेवानिवृत्त होत असल्याने गवडी ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने पाटील सरांप्रती असलेल्या आदरापोटी संपूर्ण गावाची सजावट केली होती.सरांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले, तर तरुणांनी पुष्पवृष्टी करत 'आदर्श गुरुजींचा' जयघोष केली. ​पुंडलिक पाटील यांनी १९९१ साली कुडली बुद्रुक (ता. भोर) येथून आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. त्यानंतर: ​नानाची वाडी (ता. भोर) ग्रामीण भागातील मुलांमध्ये किती गुणवत्ता असू शकते याचा एक मूर्तिमंत उदाहरण त्यांनी उभं केलं इयत्ता पहिली ते चौथीतील मुले चक्क दीडशे पर्यंतचे पाढे पाठ करतात आणि याची दखल त्या वेळचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी घेऊन सदर विद्यार्थ्यांच्या पाढयांचे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या जनरल मीटिंगमध्ये घेतले, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अध्यक्ष व माननीय सर्व सदस्य नानाचीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक पुंडलिक गोविंद पाटील यांचा गुणगौरव करून शाळेवर पारितोषकांचा वर्षाव केला व शाळेला दोन संगणक भेट देण्यात आले अशा प्रकारे प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. ​वाकांबे (ता. भोर): शाळा बाह्य उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला. ​जावळेवाडी (ता. खेड): आपल्या कल्पक अध्यापन शैलीने विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक बनले. ​जि. प. शाळा गवडी (ता. भोर)येथे मुख्याध्यापक म्हणून काम करताना शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवले.पाटील सरांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत शासनाने त्यांना 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित केले होते.सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्याने सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी पाटील सरांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. पाटील सरांसारखे कर्तव्यदक्ष शिक्षक ही शिक्षण विभागाची शिदोरी असल्याचे मत गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी व्यक्त केले.यावेळी ​ जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे ,माजी सभापती सुनील भेलके भोर शिवसेना शाखाप्रमुख भरत साळुंके,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, विस्तार अधिकारी विजय कोळी, केंद्रप्रमुख रामदास पाटील, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील लेकावळे , चांगदेव मसुरकर, पंडित गोळे, कमलाकर मोहिते , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक चोर, उपाध्यक्ष दीपक गोळे , समाधान शेंडगे आदी यावेळी उपस्थित होते.
    3
    भोरच्या शिक्षण क्षेत्रातील 'दीपस्तंभ' पाटील गुरुजी सेवानिवृत्त; ग्रामस्थांनी सजवलेल्या बैलगाडीतून काढली शाही मिरवणूक
विक्रम शिंदे /भोर  दि.२5
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी (ता. भोर) येथील मुख्याध्यापक आणि 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्काराचे मानकरी पुंडलिक गोविंद पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल साडेतीन दशकांच्या निस्पृह सेवेनंतर पाटील गुरुजी सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या निरोप समारंभाला भोर तालुक्यातील शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले.सेवानिवृत्त होत असल्याने गवडी ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समितीने पाटील सरांप्रती असलेल्या आदरापोटी संपूर्ण गावाची सजावट केली होती.सरांना सजवलेल्या बैलगाडीत बसवून, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले, तर तरुणांनी पुष्पवृष्टी करत 'आदर्श गुरुजींचा' जयघोष केली.
​पुंडलिक पाटील यांनी १९९१ साली कुडली बुद्रुक (ता. भोर) येथून आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. त्यानंतर:
​नानाची वाडी (ता. भोर) ग्रामीण भागातील मुलांमध्ये किती गुणवत्ता असू शकते याचा एक मूर्तिमंत उदाहरण त्यांनी उभं केलं इयत्ता पहिली ते चौथीतील मुले चक्क दीडशे पर्यंतचे पाढे पाठ करतात आणि याची दखल त्या वेळचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी घेऊन सदर विद्यार्थ्यांच्या पाढयांचे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या जनरल मीटिंगमध्ये घेतले, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अध्यक्ष व माननीय सर्व सदस्य नानाचीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक पुंडलिक गोविंद पाटील यांचा गुणगौरव करून शाळेवर पारितोषकांचा वर्षाव केला व शाळेला दोन संगणक भेट देण्यात आले अशा प्रकारे प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली.
​वाकांबे (ता. भोर): शाळा बाह्य उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला.
​जावळेवाडी (ता. खेड): आपल्या कल्पक अध्यापन शैलीने विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक बनले.
​जि. प. शाळा गवडी (ता. भोर)येथे मुख्याध्यापक म्हणून काम करताना शाळेला गुणवत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवले.पाटील सरांच्या शैक्षणिक  कार्याची दखल घेत शासनाने त्यांना 'जिल्हा आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित केले होते.सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्याने सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी पाटील  सरांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक केले. पाटील सरांसारखे कर्तव्यदक्ष शिक्षक ही शिक्षण विभागाची शिदोरी असल्याचे मत गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी व्यक्त केले.यावेळी 
​ जिल्हा परिषद सदस्य  प्रवीण जगदाळे ,माजी सभापती सुनील भेलके भोर शिवसेना शाखाप्रमुख भरत साळुंके,पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, विस्तार अधिकारी  विजय कोळी, केंद्रप्रमुख  रामदास पाटील, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सुनील लेकावळे , चांगदेव मसुरकर, पंडित गोळे, कमलाकर मोहिते , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक चोर, उपाध्यक्ष दीपक गोळे , समाधान शेंडगे  आदी यावेळी उपस्थित होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. हेल्मेट न वापरणे, कागदपत्रांची अपूर्णता, सिग्नलचे उल्लंघन आदी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे तसेच पोलीस अंमलदार सुरेश वळेकर, रामेश्वर आव्हाड, आकाश सवाने, अमोल रासकर, पंडित मुंडे, राम वाहेकर यांनी सहभाग घेतला.
    1
    शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. हेल्मेट न वापरणे, कागदपत्रांची अपूर्णता, सिग्नलचे उल्लंघन आदी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे तसेच पोलीस अंमलदार सुरेश वळेकर, रामेश्वर आव्हाड, आकाश सवाने, अमोल रासकर, पंडित मुंडे, राम वाहेकर यांनी सहभाग घेतला.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दौंड नगरपालिका......... किती लिहावं तेवढं कमीच....... दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. आता उन्हाळ्यात मुलामुलींना सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही.... २०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला. सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली..... आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण तलावाचा उपयोग झालेला नाही. शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????
    3
    दौंड नगरपालिका.........
किती लिहावं तेवढं कमीच.......
दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी, मनोरंजनासाठी, दोन घटका नातवंडांना, मुलामुलींना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.
आता उन्हाळ्यात मुलामुलींना  सुट्टी एन्जॉय करायला शहरात त्यांना कुठे न्यायचे असा प्रश्न पालकांना पडतो.सिनेमा, नाटक काही नाही.....एकही उद्यान नाही......एकही मैदान नाही.......सहलीचे ठिकाण नाही....
२०१७/१८ मध्ये झालेला जलतरण तलाव २०१९ मध्ये पाणी गळती मुळे बंद करण्यात आला.
सुमारे २.६३ कोटी खर्च केले त्याला पण गळती लागली.....
आजतागायत शहरातील मुलामुलींना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना व युवापिढी ला या जलतरण तलावाचा उपयोग झालेला नाही.
शहरातील नागरिकांना एकमेव गार्डन आहे.एकमेव जलतरण तलाव आहे पण....... याचा वापर का होत नाही.......निधी खर्च करून, निधी मंजूर असूनही या सुविधा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होत नसेल तर तुमच्या राजकारणाचा काय उपयोग????????
    user_Alok Yadav
    Alok Yadav
    दौंड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.