Shuru
Apke Nagar Ki App…
आंदोलनाने काय होतं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी देशातील तरुणाईकडून उत्तर घ्यावं, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. आंदोलनाच्या भूमिकेवर आणि महत्त्वावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी देशातील युवा शक्तीचा दाखला दिला आहे.
विष्णु आखरे पाटील
आंदोलनाने काय होतं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी देशातील तरुणाईकडून उत्तर घ्यावं, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. आंदोलनाच्या भूमिकेवर आणि महत्त्वावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी देशातील युवा शक्तीचा दाखला दिला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आंदोलनाने काय होतं असा प्रश्न विचारणाऱ्यांनी देशातील तरुणाईकडून उत्तर घ्यावं, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. आंदोलनाच्या भूमिकेवर आणि महत्त्वावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी देशातील युवा शक्तीचा दाखला दिला आहे.1
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.1
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खामगाव येथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी नगर परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला. या राजीनाम्यामुळे लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा विजय झाल्याची तीव्र भावना विद्यार्थी कृती समितीने व्यक्त केली आहे. या उत्साहाच्या वेळी विद्यार्थ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा विजय उत्सव साजरा केला.4
- एस आर मतदार यादीमध्ये सर्वांनी आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.1
- भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.1
- शेगाव येथील एन.व्ही. चिन्मयानंद विद्यालयात रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ, सोशल मीडियावरील दिशाभूल आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याविरोधात विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे "व्यसनाला नाही, सुरक्षित भविष्यास होकार" असा ठाम संदेश देत विद्यार्थ्यांना सजग नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाढते तस्करीचे जाळे आणि त्यामध्ये अडकलेल्या तरुणांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अवैध ड्रग्ज व्यापारातून दहशतवादी संघटनांना आर्थिक बळ मिळत असल्याने हा विषय राष्ट्रीय सुरेशेशी जोडलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सोबतच OTP, बँकिंग माहिती, फिशिंग लिंक, QR कोड फसवणूक, बनावट मोबाईल अॅप्स, ऑनलाईन गेमिंग स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल अटक (Digital Arrest) आणि AI आधारित डीपफेक यांसारख्या नव्या सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यासाठी १९३०, तस्करीच्या संशयास्पद हालचालींसाठी १९३३ आणि व्यसनमुक्तीसाठी १४४४६ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, पोलीस हवालदार किरण आघाव आणि पोलीस शिपाई ऋषिकेश जवळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर, हेमलता मॅडम, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त, सायबर सुरक्षित आणि राष्ट्रहित जपणाऱ्या जबाबदार नागरिक होण्याचा निर्धार व्यक्त केला असून रेल्वे पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- दिल्ली येथे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सीजीपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे.1
- बीड शहराजवळील डोंगर परिसरात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस सर्व पुरावे संकलित करत आहेत. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून पोलीस सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत. सध्या या प्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.1