राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार सुभाष बिंदवाल यांचा शिर्डीत गौरव साई दर्शनासाठी आलेल्या राष्ट्रीय पत्रकार नेत्यांचा शिर्डीत भव्य सत्कार शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन) साईबाबांच्या पवित्र नगरीत सहपरिवार साई दर्शनासाठी आलेल्या जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा पुरोगामी पत्रकार संघ भारतचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार/विश्वस्त सुभाष बिंदवाल यांचा शिर्डीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आगमन झाल्यानंतर बिंदवाल यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. समाजहिताची भूमिका जपत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी साईबाबांचे सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे वंशज गफार खान पठाण यांचे पुतणे रईस राजक पठाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बिंदवाल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा अतिशय उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. सुभाष बिंदवाल यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिर्डी नगरीत अशा मान्यवरांच्या आगमनामुळे वातावरण अधिक भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

- महाराष्ट्रात दिव्यांगांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला आहे. एफआयआर दाखल होऊनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही, उलट चोरांकडूनच दिव्यांगांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.1
- लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने १९ मे २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.1
- पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे. भांड्यांच्या व्यवसायातून अंडरवर्ल्डमध्ये घुसलेल्या या टोळीने चार पिढ्यांपासून आपले वर्चस्व कसे कायम ठेवले, याचा थरारक खुलासा झाला आहे.1
- ऑनलाईन औषध विक्री व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंद पुकारला. परभणीसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला, ज्यामुळे औषध विक्री ठप्प झाली. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.1
- परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.1
- महाराष्ट्रातील जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन खोदकाम करताना ठरलेल्या साडेतीन फुटांऐवजी केवळ एक फूट खोली ठेवण्यात आली. अधिकारी तपासणीसाठी आल्यावर त्यांना दुसऱ्याच ठिकाणी खोदलेली पाईपलाईन दाखवून फसवणूक केली. हा प्रकार उघड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर आता ठेकेदार षडयंत्र रचत आहेत.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- पीडितांच्या मदतीसाठी एका खासदाराने पोलिसांना थेट आव्हान दिले. त्यांनी आक्रमकपणे 'गोळी मारा किंवा फाशी द्या' असे म्हणत आपली भूमिका मांडली. या घटनेमुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे.1