नागापूर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटला; महसुली अभिलेखात १० गुंठे जागेची लवकरच नोंद परभणी प्रतिनिधी :परभणी तालुक्यातील नागापूर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संबंधित जागेची महसुली अभिलेखात नोंद करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून पुढील दोन ते तीन महिन्यांत सुमारे दहा गुंठे जागेची अधिकृत नोंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागापूर परिसरातील मातंग समाजाकडे स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत समाजाच्या वतीने वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीची दखल घेत संबंधित जागा स्मशानभूमीसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने स्मशानभूमीसाठी निश्चित केलेल्या जागेचा प्रस्ताव महसुली नोंदीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत दहा गुंठे जागा महसुली अभिलेखात नोंदवली जाणार असून त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे नागापूर येथील मातंग समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे भविष्यात अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या अडचणी दूर होणार असून समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागापूर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटला; महसुली अभिलेखात १० गुंठे जागेची लवकरच नोंद परभणी प्रतिनिधी :परभणी तालुक्यातील नागापूर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संबंधित जागेची महसुली अभिलेखात नोंद करण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून पुढील दोन ते तीन महिन्यांत सुमारे दहा गुंठे जागेची अधिकृत नोंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागापूर परिसरातील मातंग समाजाकडे स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत समाजाच्या वतीने वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीची दखल घेत संबंधित जागा स्मशानभूमीसाठी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने स्मशानभूमीसाठी निश्चित केलेल्या जागेचा प्रस्ताव महसुली नोंदीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत दहा गुंठे जागा महसुली अभिलेखात नोंदवली जाणार असून त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता आहे. स्मशानभूमीचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे नागापूर येथील मातंग समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे भविष्यात अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या अडचणी दूर होणार असून समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख1