चर्मकार महिला संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. जळगाव येथे रविवार दिनांक 8 मार्च रोजी संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह,गिरणा पंपिंग रोड,येथे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरवातीस आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रामाई फुले यांच्या कार्याचे स्मरण व्हावे या हेतूने इ.2री मधील विद्यार्थ्यांनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारून एकपात्री अभिनय सादर केला त्यांना सौ.उज्वला वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ .जयश्रीताई विसावे, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ.सुरेखाताई तायडे,सौ.भारतीताई बाविस्कर,सकाळ सन्मान पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ.उज्वलाताई वाडेकर,सौ.ज्योती ताई निंभोरे उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या वेळेस प्रा.सौ.मीनाक्षीताई वाघमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून "मी सावित्री बोलतेय "या विषयावर एकपात्री अभिनय करून त्यांच्या जीवन कार्याची माहिती प्रभावीपणे सादर केली. या वेळेस प्रमुख अतिथी तथा नगरसेविका सौ सुरेखाताई तायडे यांनी उपस्थिताना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांनी सर्व क्षेत्रात उत्तम कार्य करून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.ज्योतीताई निंभोरे यांनी तर प्रमुख अतिथी परिचय प्रा.डॉ.सौ.हेमाक्षी वानखेडे यांनी तर सूत्रसंचालन सौ.प्रतिभाताई बाविस्कर व आभारप्रदर्शन सौ सुशीलाताई मोरे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास प्रतिष्ठान व गुरु रविदास क्लब चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य तसेच सौ. शारदाताई वानखेडे,सौ.वसुंधराताई भवरे,सौ.लीनाताई बाविस्कर,सौ.स्मिताताई गवळी,सौ.ज्योतीताई शिरसाठ,,सौ.सुनीताताई टेमकर, सौ. सुनीताताई अहिरे,सौ.मंगलाताई वाघ,सौ. जयश्रीताई बाविस्कर,सौ.ज्योतीताई सोनवणे,सौ.सुषमाताई निंबाळकर,सौ.जयश्रीताई वानखेडे ,सौ.लताताई वानखेडे, अपूर्वा बाविस्कर आदींनी सहकार्य केले.
चर्मकार महिला संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. जळगाव येथे रविवार दिनांक 8 मार्च रोजी संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह,गिरणा पंपिंग रोड,येथे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या सुरवातीस आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रामाई फुले यांच्या कार्याचे स्मरण व्हावे या हेतूने इ.2री मधील विद्यार्थ्यांनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारून एकपात्री अभिनय सादर केला त्यांना सौ.उज्वला वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ .जयश्रीताई विसावे, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ.सुरेखाताई तायडे,सौ.भारतीताई बाविस्कर,सकाळ सन्मान पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ.उज्वलाताई वाडेकर,सौ.ज्योती ताई निंभोरे उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथींचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या वेळेस प्रा.सौ.मीनाक्षीताई वाघमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले यांची वेशभूषा साकारून "मी सावित्री बोलतेय "या विषयावर एकपात्री अभिनय करून त्यांच्या जीवन कार्याची माहिती प्रभावीपणे सादर केली. या वेळेस प्रमुख अतिथी तथा नगरसेविका सौ सुरेखाताई तायडे यांनी उपस्थिताना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांनी सर्व क्षेत्रात उत्तम कार्य करून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.ज्योतीताई निंभोरे यांनी तर प्रमुख अतिथी परिचय प्रा.डॉ.सौ.हेमाक्षी वानखेडे यांनी तर सूत्रसंचालन सौ.प्रतिभाताई बाविस्कर व आभारप्रदर्शन सौ सुशीलाताई मोरे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास प्रतिष्ठान व गुरु रविदास क्लब चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य तसेच सौ. शारदाताई वानखेडे,सौ.वसुंधराताई भवरे,सौ.लीनाताई बाविस्कर,सौ.स्मिताताई गवळी,सौ.ज्योतीताई शिरसाठ,,सौ.सुनीताताई टेमकर, सौ. सुनीताताई अहिरे,सौ.मंगलाताई वाघ,सौ. जयश्रीताई बाविस्कर,सौ.ज्योतीताई सोनवणे,सौ.सुषमाताई निंबाळकर,सौ.जयश्रीताई वानखेडे ,सौ.लताताई वानखेडे, अपूर्वा बाविस्कर आदींनी सहकार्य केले.
- Post by Kishor k Patil Patil2
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- #marathi#news#jalna#1