जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी ! कोल्हापूर - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत १० मे २०२६ या दिवशी भव्य अशा हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, ‘भागिरथी महिला मंच’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, पतित पावन संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, चिन्मय मिशन, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती. मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांचे छायाचित्र असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या ग्रंथाचे प्रकाशन ! समारोपप्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. अभय वर्तक, तसेच आरोग्यभारतीच्या वैद्या अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीच्या अनास्थेमुळे गावातील अनेक मूलभूत सोयीसुविधांची कामे रखडली असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.4
- रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये रिकाम्या रूम दिसत असतानाही “बेड नाही” असे सांगितले जात असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काही डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना लग्नाच्या मंडपाला आग; कंडारी येथे लग्नाच्या मंडपाला आग; विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना कंडारी येथे भर लग्नसमारंभात थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून वरच्या विद्युत तारांवर अडकला. यानंतर शॉर्टसर्किट होऊन मंडपाला भीषण आग लागली. ही घटना नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात घडली असून, भर उन्हाळ्यातील बदलत्या हवामानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला. तसेच मंडपाखाली उभ्या असलेल्या काही दुचाक्यांनाही आग लागून त्या जळाल्या. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलत्या हवामानामुळे लग्नसराईत अशा घटनांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1