logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने उपलब्धता करावी-मंत्री छगन भुजबळ* *येवला औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाच्या दरामध्ये सवलत द्यावी -मंत्री छगन भुजबळ* *मुंबई,दि.११ मार्च :-* येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने उपलब्धता करावी तसेच या सुविधा उपलब्ध करुन देईपर्यंत उद्योजकांना विनाशुल्क मुदतवाढ द्यावी,असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिले. मंत्रालयात येवला औद्योगिक वसाहतीतील प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांच्यासह एमआयडीसी सह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले की, येवला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या वसाहतीचा पूर्ण क्षमतेने विकास करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या वसाहतीतील उद्योजकांना पाण्याची उपलब्धता तातडीने करुन देण्यात यावी, यासाठीची आवश्यक कार्यवाही करत असतानाच याठिकाणी पाणी पुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यासाठी सुरू असलेल्या कामालाही गती द्यावी. त्याचप्रमाणे या वसाहतीतील वीजेचा पुरवठा आणि रस्त्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे. या सर्व सुविधांची उभारणी होईपर्यंत याठिकाणी नोंदणी केलेल्या उद्योजकांना व्यवसाय उत्पादन सुरु करण्यासाठीच्या कालावधीला विनाशुल्क मुदतवाढ देण्यात यावी. या उद्योजकांच्या उद्योग बांधकामासाठी दोन वर्षाचा कालावधी वाढवून द्यावा. त्यासोबतच याठिकाणच्या मूलभूत सोयी सुविधांची तातडीने कायमस्वरुपी उभारणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन या कामाला गती देण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. येवला औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाचा प्रचलित दर जास्त असल्यामुळे या ठिकाणी उद्योजक गुंतवणूकीसाठी आकृष्ठ होत नाही. त्यामुळे या प्रचलित दरातध्ये किमान ५० % सवलत देण्यात यावी. तसेच या ठिकाणी मोठा उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अश्या सुचनाही मंत्री भुजबळ यांनी केल्या. येवला औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अडचणी समजून घेत यंत्रणांना त्या तत्परतेने सोडवण्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
80b3298a-6dfd-4da9-b8fb-bb7ea4697892

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 4 बार अबॉर्शन कराया, 5वीं बार प्रेग्नेंट होने पर मारपीट कर घर से निकाला, शादी का झांसा देकर युवती से यौन शोषण
    1
    4 बार अबॉर्शन कराया, 5वीं बार प्रेग्नेंट होने पर मारपीट कर घर से निकाला, शादी का झांसा देकर युवती से यौन शोषण
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
    1
    “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
    1
    ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा  येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. ​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    14 min ago
  • Post by सचिन शेंडगे 1010
    1
    Post by सचिन शेंडगे 1010
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।
    1
    महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    1
    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.