उडणगाव हादरले : विजेचा धक्का लागून ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू दै.जागर मराठी दिलीप मोरे.. सिल्लोड तालुक्यातील उडणगाव येथे रविवारी ता.१९ सकाळी अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने ११ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास गावात नळाला पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नळाची लाईन काढत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत गणेश लक्ष्मण सोनावणे (वय ११, रा. उडणगाव) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने गावात शोकमग्न वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत मोटार, वायरिंग व पाण्याशी संबंधित उपकरणे हाताळताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सर्वांसाठी सावधगिरीचा इशारा ठरत आहे.

- आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली1
- छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर हिवरखेड येथे संपन्न1
- चाकूर (लातूर) हादरले: दोन चुलत भावंडे बेपत्ता; एका मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ चाकूर येथे १९ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातील स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलत भाऊ रविवारी सकाळी बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, देवांश मंगेश स्वामी (वय ६-७ वर्षे) आणि साईचरण दिनेश स्वामी (वय १०-११ वर्षे) हे दोघे सकाळी सुमारे ७ वाजता घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. दरम्यान, दुपारी चाकूर-उजळंब मार्गालगत एका पडक्या घराजवळील मोकळ्या जागेत देवांशचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे हा परिसर त्यांच्या घरापासून अवघ्या ६० फूट अंतरावर आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. साईचरणबाबत सुरुवातीला तोही बेपत्ता असल्याची माहिती होती; मात्र काही अहवालांनुसार तो नंतर सुखरूप सापडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत पुष्टीसाठी पोलिस तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शोधमोहीम हाती घेतली. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ८ ते १० पथके, फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, मुलं आझाद चौकात सायकलवर दिसल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अपघाती आहे की घातपात, याचा तपास सुरू असून पोलिस सर्व शक्यतांचा बारकाईने शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण चाकूर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.1
- संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.1
- "संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"1