देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.
देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर हिवरखेड येथे संपन्न1
- "संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"1
- विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- * जळगाव जामोद तालुक्यातील भेडवळ येथील घट मांडनी चे भाकीत राजा काय पण तनावात राहील युद्ध जण्य परीस्तीती राहील*1
- अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा वाघ आता वारी येथील मानवी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास वाघाने वारी गावाजवळील वस्तीत घुसून एका गाढवाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वारखेड शिवारात मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक जनावरांवर हल्ले केले होते. शेतशिवारात फटाके फोडून आणि आवाज करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा वाघ अधिकच आक्रमक बनत मानवी वस्तीच्या दिशेने सरकला असल्याचे दिसून येत आहे. वारी येथील रहिवाशांनी सांगितले की, पहाटे अचानक जनावरांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर परिसरात तपासणी केली असता एका गाढवाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाघाचे ठसेही स्पष्ट दिसून आले. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केल्याची खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.1
- संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.1