Shuru
Apke Nagar Ki App…
३५० वर्षांची परंपरा, २७ मे चा घट; भेंडवळने उकलले पावसासह पिकांचे 'गूढ'! "संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"
अनिल भगत पत्रकार
३५० वर्षांची परंपरा, २७ मे चा घट; भेंडवळने उकलले पावसासह पिकांचे 'गूढ'! "संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.1
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."1
- विद्येच्या मंदिरात हे काय चाललंय? अशा क्रूर प्रवृत्तीच्या शिक्षकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!1
- Post by Ashish ingle1
- ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.1
- Post by Ahem Raza1
- अकोला: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिकांना फटका, पाण्याची टंचाई तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1
- Post by Ashish ingle1