Shuru
Apke Nagar Ki App…
माणुसकीला काळिमा फासणारी घटना! लातूरमध्ये एका नराधम शिक्षकाने मतिमंद विद्यार्थ्याला लाकडी फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण केली. विद्येच्या मंदिरात हे काय चाललंय? अशा क्रूर प्रवृत्तीच्या शिक्षकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
Gaurishankar Dhikar
माणुसकीला काळिमा फासणारी घटना! लातूरमध्ये एका नराधम शिक्षकाने मतिमंद विद्यार्थ्याला लाकडी फळी तुटेपर्यंत बेदम मारहाण केली. विद्येच्या मंदिरात हे काय चाललंय? अशा क्रूर प्रवृत्तीच्या शिक्षकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विद्येच्या मंदिरात हे काय चाललंय? अशा क्रूर प्रवृत्तीच्या शिक्षकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे!1
- विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -1
- अकोला: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिकांना फटका, पाण्याची टंचाई तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.1
- Post by Ahem Raza1
- Post by Ashish ingle1
- Post by Amravati News Update1
- Post by Santosh Dhakulkar2
- अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पळवून लावले व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1