Shuru
Apke Nagar Ki App…
आर्या कुल्फी ला यवतमाळ येथे खूप पतिसाद मिळत आहे उन्हाळ्यात काही तरी थंड
Ashish ingle
आर्या कुल्फी ला यवतमाळ येथे खूप पतिसाद मिळत आहे उन्हाळ्यात काही तरी थंड
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पळवून लावले व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.1
- Post by Amravati News Update1
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."1
- *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*1
- Post by Amravati News Update1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1
- *यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण* #उपनिवड समिती स्थापन करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी; प्रशासनावर दिरंगाईचा आरोप आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रातून अवजड वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्र 52, 53, 54 व 55 मधील 95 उमेदवारांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी विभाग नियंत्रक, यवतमाळ यांना दिलेल्या अंतिम निवेदनात नमूद केले आहे की, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते MEO चाचणीतही उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, नियुक्ती प्रक्रिया रखडलेली असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने उपनिवड समिती (Sub-Selection Committee) स्थापन करून नियुक्ती प्रक्रिया गतीमान करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने 26 एप्रिल 2026 पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास 27 एप्रिल 2026 पासून विभाग नियंत्रक कार्यालय, यवतमाळ समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात संबंधित निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची वेळ येऊ न देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.1