Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- अकोला : जिल्ह्यात रेती माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर या माफियांची मजल पोलिसांना धमकावण्यापर्यंत गेली आहे. अकोला जिल्ह्यातील म्हैसांग परिसरात रेती माफियांच्या दहशतीचा आणि दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा रेती माफिया नदीपात्रातून अवैध रेती उपसा करून ती ट्रॅक्टरने घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना पळवून लावले व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रेती माफियाने केवळ पोलिसांशी हुज्जत घातली नाही, तर त्यांना अश्लील शिवीगाळही केली. एवढ्यावरच न थांबता, "ट्रॅक्टर अंगावर घालून मारून टाकेन," अशी धमकी देत त्याने पोलिसांच्या वाहनासमोर आपला ट्रॅक्टर आडवा घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर माफियाच्या या उग्र अवतारामुळे आणि वाढत्या धोक्यामुळे पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह रेती माफियांच्या या कृत्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. भररस्त्यात पोलिसांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संबंधित रेती माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शुभम मानकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.1
- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.1
- *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*1
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- Post by Amravati News Update1