परळी वैजनाथ येथे नगरपालिकेच्या कारभारात हुकूमशाहीचे वर्चस्व वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी आरक्षित जागेवर नमो उद्यान उभारण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नंदागौळ रोड परिसरातील या जागेची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, परळीचे विद्यमान नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची संबंधित जागेजवळ शेती असून, नमो उद्यान उभारल्यास परिसरातील जमिनींचे भाव वाढतील आणि त्याचा थेट फायदा काही मोजक्या व्यक्तींना होऊ शकतो. याच उद्देशातून पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी राखीव असलेली सुमारे ६० गुंठे जागा नमो उद्यान प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. देशमुख यांनी आठवण करून दिली की, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सर्व्हे क्रमांक ४२२ मधील याच जागेचे पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र आता त्याच जागेवर नमो उद्यानाचा प्रस्ताव पुढे आल्याने 'जागा एकच, फलक मात्र वेगवेगळे' अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली. नगरपालिकेच्या मालकीच्या या जागेचा यापूर्वी डम्पिंग ग्राउंड, घनकचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, अग्निशामक दलाचा तळ, न. प. कर्मचारी निवासस्थान, सुशिक्षित बेकार सप्तशृंगी संस्थेला, ऑक्सिजन पार्क अशा विविध योजनांसाठी वापर करण्याचे प्रस्ताव आले होते. या प्रतिकात्मक सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, आत्मलिंग शेटे, धीरज जंगले, बाबा शेख, धनंजय अरबुने, संतोष जुजगर, प्रल्हाद कडुकटले, बालाजी ढगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीब रॉय, संदीप मस्के, बालाजी जगतकर, गौतम आगळे, पद्माकर भंडारे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. दिवंगत पत्रकार प्रेमनाथ कदम, प्रशांत जोशी, दिलीप बदर आणि सतीश बियाणी यांच्यासह ज्या पत्रकारांनी या भूमिपूजनाचे साक्षीदार होते, त्यांच्या स्मृतींचा सन्मान राखण्यासाठी तरी ही जागा पत्रकारांनाच देण्यात यावी, अशी भावनिक मागणी यावेळी करण्यात आली. दीपक देशमुख यांनी जोपर्यंत पत्रकार गृहनिर्माण संस्था नियोजित जागेवर प्रत्यक्षात उभी राहत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला. लवकरच ते परळीतील पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ, पत्रकार, संपादक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि खासदार बजरंग सोनवणे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला काही पत्रकार अनुपस्थित राहिल्याबाबत देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, यात सहभागी झाल्यास जाहिराती बंद केल्या जातील किंवा भविष्यात अडचणी निर्माण केल्या जातील, असा दबाव काही पत्रकारांवर टाकण्यात आला. पत्रकारांना अशा पद्धतीने गप्प बसविण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अलीकडेच मराठा भवनासाठी दिलेल्या जागेवरून श्री दत्त देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतल्याने निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख करत देशमुख यांनी नगरपालिकेच्या जमीन वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नोंदणी क्रमांक AF-22856 असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी सर्व्हे क्रमांक ४२२ मधील ६० गुंठे जागा कायम राखावी, तिचा विकास करावा आणि पत्रकारांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्यातून करण्यात आली. हा प्रश्न आता नवे राजकीय व सामाजिक परिमाण घेत असून, येत्या काळात हा विषय अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.
परळी वैजनाथ येथे नगरपालिकेच्या कारभारात हुकूमशाहीचे वर्चस्व वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी आरक्षित जागेवर नमो उद्यान उभारण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नंदागौळ रोड परिसरातील या जागेची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, परळीचे विद्यमान नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची संबंधित जागेजवळ शेती असून, नमो उद्यान उभारल्यास परिसरातील जमिनींचे भाव वाढतील आणि त्याचा थेट फायदा काही मोजक्या व्यक्तींना होऊ शकतो. याच उद्देशातून पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी राखीव असलेली सुमारे ६० गुंठे जागा नमो उद्यान प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. देशमुख यांनी आठवण करून दिली की, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी
तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सर्व्हे क्रमांक ४२२ मधील याच जागेचे पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र आता त्याच जागेवर नमो उद्यानाचा प्रस्ताव पुढे आल्याने 'जागा एकच, फलक मात्र वेगवेगळे' अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली. नगरपालिकेच्या मालकीच्या या जागेचा यापूर्वी डम्पिंग ग्राउंड, घनकचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, अग्निशामक दलाचा तळ, न. प. कर्मचारी निवासस्थान, सुशिक्षित बेकार सप्तशृंगी संस्थेला, ऑक्सिजन पार्क अशा विविध योजनांसाठी वापर करण्याचे प्रस्ताव आले होते. या प्रतिकात्मक सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, आत्मलिंग शेटे, धीरज जंगले, बाबा शेख, धनंजय अरबुने, संतोष जुजगर, प्रल्हाद कडुकटले, बालाजी ढगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीब रॉय, संदीप मस्के, बालाजी जगतकर, गौतम
आगळे, पद्माकर भंडारे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. दिवंगत पत्रकार प्रेमनाथ कदम, प्रशांत जोशी, दिलीप बदर आणि सतीश बियाणी यांच्यासह ज्या पत्रकारांनी या भूमिपूजनाचे साक्षीदार होते, त्यांच्या स्मृतींचा सन्मान राखण्यासाठी तरी ही जागा पत्रकारांनाच देण्यात यावी, अशी भावनिक मागणी यावेळी करण्यात आली. दीपक देशमुख यांनी जोपर्यंत पत्रकार गृहनिर्माण संस्था नियोजित जागेवर प्रत्यक्षात उभी राहत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला. लवकरच ते परळीतील पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ, पत्रकार, संपादक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि खासदार बजरंग सोनवणे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाला काही पत्रकार अनुपस्थित राहिल्याबाबत देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, यात
सहभागी झाल्यास जाहिराती बंद केल्या जातील किंवा भविष्यात अडचणी निर्माण केल्या जातील, असा दबाव काही पत्रकारांवर टाकण्यात आला. पत्रकारांना अशा पद्धतीने गप्प बसविण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अलीकडेच मराठा भवनासाठी दिलेल्या जागेवरून श्री दत्त देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतल्याने निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख करत देशमुख यांनी नगरपालिकेच्या जमीन वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नोंदणी क्रमांक AF-22856 असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी सर्व्हे क्रमांक ४२२ मधील ६० गुंठे जागा कायम राखावी, तिचा विकास करावा आणि पत्रकारांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्यातून करण्यात आली. हा प्रश्न आता नवे राजकीय व सामाजिक परिमाण घेत असून, येत्या काळात हा विषय अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.
- परळी तालुक्यातील सन 2026 च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या 16 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3 (अ) प्रमाणे ही सोडत काढण्यात आली. मा. तहसिलदार श्री विनोद रणवरे यांच्या उपस्थितीत दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या आरक्षण सोडतीमध्ये परळी येथील 12 वर्षीय चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे या लहान मुलाच्या हस्ते प्रथमतः ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार, कौठळीतांडा येथील सरपंचपद ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर वसंतनगर येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, नागरिक आणि इतर नागरिक उपस्थित होते. तसेच, तहसिल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.3
- लातूर जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनचोरीचे पाच गुन्हे यशस्वीरित्या उघडकीस आणण्यात आले असून, सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. लातूर शहर आणि परिसरात घडलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तत्काळ संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. तपासादरम्यान आरोपीकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक, तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर, समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी पार पाडली.1
- आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.1
- लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण देत, सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस अवस्थेत सापडलेली बॅग तिच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केली आहे. ही घटना ११ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाणे मुरुड हद्दीत घडली, जिथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आणि त्यांच्या स्टाफला जिल्हा रात्रगस्तीवर असताना रस्त्याच्या मध्यभागी एक बॅग पडलेली दिसली. तपासणी केली असता, त्यात लहान मुलांचे व पुरुषांचे कपडे, तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस आणि झुमके आढळून आले. घटनास्थळी तात्काळ चौकशी करूनही बॅगेचा मालक किंवा संबंधित व्यक्ती सापडली नाही, त्यामुळे बॅग सुरक्षितपणे पोलीस ठाणे मुरुड येथे जमा करण्यात आली. त्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास सुरू करण्यात आला. बॅगेतील कपड्यांचे वर्णन, सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि विविध माध्यमांचा वापर करून मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. अखेर, तपासानंतर ही बॅग संदीप मंगलदास सुरनर (वय ३३ वर्षे, राहणार रुदा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) यांची असल्याचे निष्पन्न झाले. संदीप सुरनर हे ११ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षाने रुद्रा येथून पुण्याकडे जात असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची बॅग वाहनातून पडून हरवली होती. बॅगेतील कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांची ओळख पटवून, मालकी हक्काची पडताळणी तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते आज हे मौल्यवान दागिने मूळ मालकास परत करण्यात आले. या बॅगेमध्ये सुमारे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस आणि झुमके होते, ज्यांची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या किमतीचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने संदीप सुरनर आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्यांनी लातूर जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत पोलिसांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, पाराजी पुट्टेवाड, ज्ञानोबा गुडमेवाड आणि ढवळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.1
- परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.1
- चाकूर-वडवळ नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनानिमित्त एकला महिलांचा सन्मान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.1
- रोटरी क्लबने उदगीर येथील नागरिकांना कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे क्लबने म्हटले आहे.1
- मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियानुसार, उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सत्तापक्षाच्या उमेदवारांनाच पसंती द्यावी.1