logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परळी तालुक्यातील सन 2026 च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या 16 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3 (अ) प्रमाणे ही सोडत काढण्यात आली. मा. तहस‍िलदार श्री विनोद रणवरे यांच्या उपस्थितीत दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या आरक्षण सोडतीमध्ये परळी येथील 12 वर्षीय चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे या लहान मुलाच्या हस्ते प्रथमतः ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार, कौठळीतांडा येथील सरपंचपद ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर वसंतनगर येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, नागरिक आणि इतर नागरिक उपस्थित होते. तसेच, तहसिल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.

2 hrs ago
user_M. p. gitte
M. p. gitte
परळी, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago

परळी तालुक्यातील सन 2026 च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या 16 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3 (अ) प्रमाणे ही सोडत काढण्यात आली. मा. तहस‍िलदार श्री विनोद

7b54f83a-43fd-4c23-91d7-12ebfbda21de

रणवरे यांच्या उपस्थितीत दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या आरक्षण सोडतीमध्ये परळी येथील 12 वर्षीय चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे या लहान मुलाच्या हस्ते प्रथमतः ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार, कौठळीतांडा येथील सरपंचपद ना.मा.प्र.

aba0dbf4-3deb-4981-87de-6a3d105a008f

(महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर वसंतनगर येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, नागरिक आणि इतर नागरिक उपस्थित होते. तसेच, तहसिल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परळी तालुक्यातील सन 2026 च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या 16 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3 (अ) प्रमाणे ही सोडत काढण्यात आली. मा. तहस‍िलदार श्री विनोद रणवरे यांच्या उपस्थितीत दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या आरक्षण सोडतीमध्ये परळी येथील 12 वर्षीय चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे या लहान मुलाच्या हस्ते प्रथमतः ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार, कौठळीतांडा येथील सरपंचपद ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर वसंतनगर येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, नागरिक आणि इतर नागरिक उपस्थित होते. तसेच, तहसिल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.
    3
    परळी तालुक्यातील सन 2026 च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या 16 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3 (अ) प्रमाणे ही सोडत काढण्यात आली. मा. तहस‍िलदार श्री विनोद रणवरे यांच्या उपस्थितीत दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता तहसिल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

या आरक्षण सोडतीमध्ये परळी येथील 12 वर्षीय चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे या लहान मुलाच्या हस्ते प्रथमतः ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार, कौठळीतांडा येथील सरपंचपद ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर वसंतनगर येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, नागरिक आणि इतर नागरिक उपस्थित होते. तसेच, तहसिल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनचोरीचे पाच गुन्हे यशस्वीरित्या उघडकीस आणण्यात आले असून, सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. लातूर शहर आणि परिसरात घडलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तत्काळ संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. तपासादरम्यान आरोपीकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक, तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर, समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी पार पाडली.
    1
    लातूर जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनचोरीचे पाच गुन्हे यशस्वीरित्या उघडकीस आणण्यात आले असून, सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

लातूर शहर आणि परिसरात घडलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तत्काळ संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. तपासादरम्यान आरोपीकडून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक, तसेच आंध्र प्रदेश राज्यातील एक अशा एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १० हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर, समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी पार पाडली.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    1
    आमदार डॉ. राहुल पाटील यांनी बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण देत, सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस अवस्थेत सापडलेली बॅग तिच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केली आहे. ही घटना ११ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाणे मुरुड हद्दीत घडली, जिथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आणि त्यांच्या स्टाफला जिल्हा रात्रगस्तीवर असताना रस्त्याच्या मध्यभागी एक बॅग पडलेली दिसली. तपासणी केली असता, त्यात लहान मुलांचे व पुरुषांचे कपडे, तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस आणि झुमके आढळून आले. घटनास्थळी तात्काळ चौकशी करूनही बॅगेचा मालक किंवा संबंधित व्यक्ती सापडली नाही, त्यामुळे बॅग सुरक्षितपणे पोलीस ठाणे मुरुड येथे जमा करण्यात आली. त्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास सुरू करण्यात आला. बॅगेतील कपड्यांचे वर्णन, सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि विविध माध्यमांचा वापर करून मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. अखेर, तपासानंतर ही बॅग संदीप मंगलदास सुरनर (वय ३३ वर्षे, राहणार रुदा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) यांची असल्याचे निष्पन्न झाले. संदीप सुरनर हे ११ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षाने रुद्रा येथून पुण्याकडे जात असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची बॅग वाहनातून पडून हरवली होती. बॅगेतील कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांची ओळख पटवून, मालकी हक्काची पडताळणी तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते आज हे मौल्यवान दागिने मूळ मालकास परत करण्यात आले. या बॅगेमध्ये सुमारे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस आणि झुमके होते, ज्यांची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या किमतीचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने संदीप सुरनर आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्यांनी लातूर जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत पोलिसांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, पाराजी पुट्टेवाड, ज्ञानोबा गुडमेवाड आणि ढवळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    1
    लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण देत, सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस अवस्थेत सापडलेली बॅग तिच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केली आहे. ही घटना ११ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाणे मुरुड हद्दीत घडली, जिथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आणि त्यांच्या स्टाफला जिल्हा रात्रगस्तीवर असताना रस्त्याच्या मध्यभागी एक बॅग पडलेली दिसली. तपासणी केली असता, त्यात लहान मुलांचे व पुरुषांचे कपडे, तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस आणि झुमके आढळून आले.

घटनास्थळी तात्काळ चौकशी करूनही बॅगेचा मालक किंवा संबंधित व्यक्ती सापडली नाही, त्यामुळे बॅग सुरक्षितपणे पोलीस ठाणे मुरुड येथे जमा करण्यात आली. त्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास सुरू करण्यात आला. बॅगेतील कपड्यांचे वर्णन, सोन्याच्या दागिन्यांच्या बॉक्सवरील माहिती आणि विविध माध्यमांचा वापर करून मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. अखेर, तपासानंतर ही बॅग संदीप मंगलदास सुरनर (वय ३३ वर्षे, राहणार रुदा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) यांची असल्याचे निष्पन्न झाले. संदीप सुरनर हे ११ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षाने रुद्रा येथून पुण्याकडे जात असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची बॅग वाहनातून पडून हरवली होती.

बॅगेतील कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांची ओळख पटवून, मालकी हक्काची पडताळणी तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते आज हे मौल्यवान दागिने मूळ मालकास परत करण्यात आले. या बॅगेमध्ये सुमारे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस आणि झुमके होते, ज्यांची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या किमतीचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने संदीप सुरनर आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. त्यांनी लातूर जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानत पोलिसांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, पाराजी पुट्टेवाड, ज्ञानोबा गुडमेवाड आणि ढवळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • चाकूर-वडवळ नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनानिमित्त एकला महिलांचा सन्मान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
    1
    चाकूर-वडवळ नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनानिमित्त एकला महिलांचा सन्मान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • रोटरी क्लबने उदगीर येथील नागरिकांना कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे क्लबने म्हटले आहे.
    1
    रोटरी क्लबने उदगीर येथील नागरिकांना कॅन्सर तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे क्लबने म्हटले आहे.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले हत्येप्रकरणातील सर्व आरोपींची पाळेमुळे खणून खरा सूत्रधार शोधावा, अशी मागणी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. २० जून रोजी रात्री केज तालुक्यात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट असून, एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट रचला गेला होता, मात्र वाचवण्यासाठी आलेल्या विलास घुले यांच्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण म्हणजे एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला आणि दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गंभीर गुन्हा आहे, असे मुंडे यांनी म्हटले. या घटनेमुळे केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या चौथ्या दिवशीही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण प्राण गमवावे लागल्याचा तीव्र निषेध करत, नागरिक रस्त्यावर उतरले असून केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसेच पोलिस ठाण्यासमोर आणि अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री यांना आवाहन करत सांगितले की, पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा वस्तुनिष्ठ तपास करावा आणि सर्व आरोपींना अटक करण्याचे योग्य निर्देश द्यावेत. या मागणीची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तात्काळ दखल घेऊन गृह विभागाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
    1
    माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले हत्येप्रकरणातील सर्व आरोपींची पाळेमुळे खणून खरा सूत्रधार शोधावा, अशी मागणी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. २० जून रोजी रात्री केज तालुक्यात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट असून, एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट रचला गेला होता, मात्र वाचवण्यासाठी आलेल्या विलास घुले यांच्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण म्हणजे एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला आणि दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गंभीर गुन्हा आहे, असे मुंडे यांनी म्हटले.

या घटनेमुळे केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या चौथ्या दिवशीही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण प्राण गमवावे लागल्याचा तीव्र निषेध करत, नागरिक रस्त्यावर उतरले असून केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसेच पोलिस ठाण्यासमोर आणि अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री यांना आवाहन करत सांगितले की, पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा वस्तुनिष्ठ तपास करावा आणि सर्व आरोपींना अटक करण्याचे योग्य निर्देश द्यावेत. या मागणीची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तात्काळ दखल घेऊन गृह विभागाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.