Shuru
Apke Nagar Ki App…
बुवाबाज 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आंदोलन करणार
Shivaji Bhosale
बुवाबाज 39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आंदोलन करणार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Shivaji Bhosale1
- *चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या आणि भाजपसोबतच्या चर्चांवर अत्यंत परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, त्या सर्व चर्चांचा बोंद्रे यांनी आज समाचार घेतला. राहुल बोंद्रे म्हणाले की, भाजपची देशभरात एकच 'पॉलिसी' आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल सतत वावड्या उठवायच्या, चर्चा चालू ठेवायची आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करून त्यांना पक्षात ओढायचे. ही एक 'सोची समझी साजिश' (ठरवून केलेला कट) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. *संजय गायकवाड यांच्या भेटीचे सत्य:* संजय गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी देवीची यात्रा होती आणि ते केवळ पाहुणे म्हणून घरी आले होते. यात्रेत हवशे-नवशे आणि नवस फेडणारे सर्वच येतात. या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. चिखलीची ही परंपरा आहे की आम्ही राजकारण केवळ निवडणुकीपुरते करतो, एरवी एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतोनगरपालिका निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत बोंद्रे म्हणाले की, भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी काँग्रेसने १३ जागा जिंकून त्यांना तोडीस तोड टक्कर दिली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही काँग्रेस तिथे पाय रोवून उभी आहे, हे भाजपला सहन होत नाहीये. म्हणूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना चिखलीत बोलावले जात असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीशेवटी, जर कोणी भाजपला कमजोर करण्यासाठी प्रस्ताव देत असेल तर त्याचे स्वागत आहे, परंतु आम्ही काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठीच काम करत राहू, असा विश्वास राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जिजाऊ एक्स्प्रेस1
- पंढरपूर - पंढरपुरातील ३०० वर्ष जुना दोन एकरातील होळकर वाडा एकदा पहाच1
- भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे1
- Post by Shaha News Marathi1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.1
- खामगांव : जन सामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वकांशी योजना सुरू केल्या आहेत, या योजणांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा,त्यांना त्यांचा लाभ द्या आणि जनसंघापासून भाजपाचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास आज 3 मार्च रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ना. अँड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आले त्यावेळी ते भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. जनसंघापासून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. पक्षासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व सतत झटणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. देश सेवेसाठी नेहमी सतत करत असलेले कार्य व जनहितासाठी आपल्या सरकारने आणलेल्या योजना व त्या प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना दिलेला त्यांचा लाभ या लोकांना माहिती असाव्या व ज्या गरजूना लाभ मिळाला नाही अश्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सातत्याने भाजपाच्या वतीने राबविण्याचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत व त्या प्रभावीपणे राबविले सुद्धा जात आहेत. परंतु अजूनही अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची काहीच माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब प्रत्येक नागरिकाला या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची मदत करा जेणेकरून आपल्याला सुद्धा पुण्य लाभेल व गरजू व्यक्तींचे सुद्धा आयुष्य उज्वल होईल. प्रधानमंत्री आवास योजना, पी एम किसान योजना,कौशल्य विकास योजना,जलजीवन योजना अशा शेकडो अनेक योजना मार्फत शेतकरी व इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी,नोकरदार असो वा इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी कोणती न कोणती चांगल्या लाभाची योजना सरकारने आणलेल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा आरोग्य संबंधितही योजनेमार्फत कोट्यावधी रुग्णांना याचा लाभ होत आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आपण महामारीवर मात केली. देशातील करोडो नागरिकांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना आपण व्हॅक्सिन देऊन जीवनदान दिले व मानवता जोपसली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली त्या अंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते आजही देणे सुरू आहे. असे अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करत आहे याची माहिती प्रचार व प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा जेणेकरून भाजपाचे देशसेवा व समाजसेवा हेच कार्य आहे असे अभिमानाने सांगून पटवून द्या. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिषद भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला मेरा बूथ सबसे मजबूत हा नारा सदैव लक्षात ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा व भारतीय जनता पार्टीचा पक्ष विस्तार आणखी वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा यावेळी ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. या उद्घाटनचा सत्रास भाजपा खामगाव जिल्हा व खामगाव मतदार संघातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या प्रशिक्षण वर्गास आपली (कार्यकर्ता सांभाळणे ) या विषयावर भाजपा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, मन की बात बूथ व्यवस्थापन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, SIR विशेष सखोल निरीक्षण या विषयावर याचे खामगाव प्रमुख तथा भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, कार्य विस्तार आमची दृष्टी खामगाव तालुका सरचिटणीस वैभव डवरे, वैचारिक अधिष्ठान शेखर कुलकर्णी, केंद्र व राज्य सरकार योजना व सरकारची कामगिरी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, इतिहास व विकास ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख, व मीडिया, सोशल मीडिया, AI, नमो ॲप या विषयावर सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.2