सव्वा कोटिचा गुटखा समुद्री महामार्गावर जप्त . कारंजा टोलनाक्यावर महामार्ग पोलीसांची धडक कारवाई आयशर गाडी ताब्यात. वाशिम प्रतिनिधी अनंत घुगे वाशिम : कारंजा लाड तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावरून सुसाट वेगाने होणाऱ्या गुटखा तस्करीच्या साम्राज्यावर महामार्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.९) रात्री कारंजा लाड टोल नाक्यावर करण्यात आली. यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अमरावतीच्या 'जावेद' नावाच्या कुख्यात माफियाचा पर्दाफाश झाला आहे. ९ मे च्या रात्री महामार्ग पोलिसांचे पथक टोल नाक्यावर पाळत ठेवून होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या सूचनेवरून सापळा रचण्यात आला होता. संशयित आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवताच चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली. मात्र, ट्रकच्या फटीतून येणाऱ्या उग्र सुंगधी वासामुळे पोलिसांचा संशय बळावला. ताडपत्री हटवताच आत गुटख्याच्या गोण्यांचे डोंगर पाहून पोलीसही अवाक झाले. तपासात चालकाने कबुली दिली की, हा सर्व माल अमरावतीच्या 'जावेद भाई'चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुटखा किंग जावेद हा गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि अकोला या पाच जिल्ह्यांत गुटख्याचे जाळे पसरवून बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक पोलिसांना हाताशी धरून, त्यांना 'मॅनेज' करून हा माफिया आपले हातपाय पसरत होता, मात्र महामार्ग पोलिसांच्या इमानदारीने आज त्याचे कंबरडे मोडले आहे.सिनेमॅटिक थरार' : सुंगधी उग्र वासाने उघडले तस्करीचे गुपित रात्रीच्या अंधारात महामार्ग पोलिसांचे पथक वाघासारखे टपून बसले होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या 'इनपुट' नुसार सापळा रचला होता. आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवल्यानंतर चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली, पण जेव्हा पोलिसांनी आपला खाकीचा हिसका दाखवला, तेव्हा त्याचे अवसान गळाले. ट्रकच्या छतापर्यंत खच्चून भरलेल्या गुटख्याच्या गोण्या बघून डोळे विस्फारले होते. गुटखा माफिया जावेदने पाच जिल्ह्यांत आपले 'नेटवर्क' इतके घट्ट विणले होते की, कोणालाही संशय येऊ नये. मात्र, हायवे पोलिसांनी त्याचे हे 'इम्पायर' एका रात्रीत धुळीस मिळवले. महामार्ग पोलिसांना जमले, ते स्थानिक पोलिसांना का जमले नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सव्वा कोटिचा गुटखा समुद्री महामार्गावर जप्त . कारंजा टोलनाक्यावर महामार्ग पोलीसांची धडक कारवाई आयशर गाडी ताब्यात. वाशिम प्रतिनिधी अनंत घुगे वाशिम : कारंजा लाड तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावरून सुसाट वेगाने होणाऱ्या गुटखा तस्करीच्या साम्राज्यावर महामार्ग पोलिसांनी धाडसी कारवाई करत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.९) रात्री कारंजा लाड टोल नाक्यावर करण्यात आली. यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अमरावतीच्या 'जावेद' नावाच्या कुख्यात माफियाचा पर्दाफाश झाला आहे. ९ मे च्या रात्री महामार्ग पोलिसांचे पथक टोल नाक्यावर पाळत ठेवून होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या सूचनेवरून सापळा रचण्यात आला होता. संशयित आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवताच चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली. मात्र, ट्रकच्या फटीतून येणाऱ्या उग्र सुंगधी वासामुळे पोलिसांचा संशय बळावला. ताडपत्री हटवताच आत गुटख्याच्या गोण्यांचे डोंगर पाहून पोलीसही अवाक झाले. तपासात चालकाने कबुली दिली की, हा सर्व माल अमरावतीच्या 'जावेद भाई'चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुटखा किंग जावेद हा
गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि अकोला या पाच जिल्ह्यांत गुटख्याचे जाळे पसरवून बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक पोलिसांना हाताशी धरून, त्यांना 'मॅनेज' करून हा माफिया आपले हातपाय पसरत होता, मात्र महामार्ग पोलिसांच्या इमानदारीने आज त्याचे कंबरडे मोडले आहे.सिनेमॅटिक थरार' : सुंगधी उग्र वासाने उघडले तस्करीचे गुपित रात्रीच्या अंधारात महामार्ग पोलिसांचे पथक वाघासारखे टपून बसले होते. पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या 'इनपुट' नुसार सापळा रचला होता. आयशर ट्रक (MH 40 CT 2964) थांबवल्यानंतर चालकाने सुरुवातीला हुज्जत घातली, पण जेव्हा पोलिसांनी आपला खाकीचा हिसका दाखवला, तेव्हा त्याचे अवसान गळाले. ट्रकच्या छतापर्यंत खच्चून भरलेल्या गुटख्याच्या गोण्या बघून डोळे विस्फारले होते. गुटखा माफिया जावेदने पाच जिल्ह्यांत आपले 'नेटवर्क' इतके घट्ट विणले होते की, कोणालाही संशय येऊ नये. मात्र, हायवे पोलिसांनी त्याचे हे 'इम्पायर' एका रात्रीत धुळीस मिळवले. महामार्ग पोलिसांना जमले, ते स्थानिक पोलिसांना का जमले नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- अकोल्यातील डाबकी रोडवरील रावनगर मांगे नाल्यावर बोगस बांधकाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाल्यात घाण पाणी तसेच खाली मास काँक्रिटीकरण न करताच बांधकाम केल्याने तो पडला आहे. नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे.4
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1
- *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर येथे एक महिना पुरेल एवढा धान्य व किराणा साठा भेट देत निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि आधाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले. गेल्या चार वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार, वयोवृद्ध, भिक्षा मागणारे आजी-आजोबा तसेच डिपेंडंट व्यक्तींसाठी निःस्वार्थपणे मोफत सेवा दिली जात आहे. अनेकांना जिथे स्वतःच्या कुटुंबाकडून आधार मिळत नाही, अशा वृद्धांसाठी हा आश्रम मायेची सावली बनला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजातील गरजू, निराधार आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी हातभार लावणे हीच खरी मानवसेवा आहे. संघर्ष, समर्पण, अभ्यास आणि माणुसकीचा अखंड वाहणारा झरा… म्हणजे अनिलभाऊ - प्रशांत ढोरे पाटील केमिस्ट विश्वातील लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर! काही व्यक्ती या केवळ व्यक्ती नसतात… त्या एक विचार असतात… एक प्रेरणा असतात… एक चळवळ असतात… आणि हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देणारं विद्यापीठ असतात…! केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर हे असंच एक नाव… ज्यांचा उल्लेख झाला की संघर्षालाही बळ मिळतं, अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धैर्य निर्माण होतं आणि हजारो केमिस्ट बांधवांच्या डोळ्यात विश्वासाची नवी पहाट उगवते…! गेली अनेक दशके त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य केमिस्ट, फार्मासिस्ट आणि औषध व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी समर्पित केलं आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात निर्भीड भूमिका घेत त्यांनी केमिस्ट चळवळीला नवं बळ दिलं. ई-फार्मसीविरोधातील संघर्ष असो किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कासाठीचा लढा प्रत्येक वेळी अनिलभाऊ खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अभ्यासाची ताकद आहे… प्रत्येक भाषणात सत्याची धार आहे… प्रत्येक निर्णयात संघटनप्रेम आहे… आणि प्रत्येक कृतीत कार्यकर्त्यांविषयीची अपार आत्मीयता दडलेली आहे…! यावेळी केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे, सचिव विनोदजी नागवाणी, जिल्हा प्रतिनिधी सुनीलजी पारसकर, उपाध्यक्ष बद्रीभाऊ पानगोळे, जयंत शर्माजी, सुचित भराड, अभिमन्यू जगताप आदी उपस्थित होते. तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेसाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन भरीव मदत करावी, असे आवाहन केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी केले. तर कुठेही निराधार, बेघर वृद्ध, मुलं-मुली किंवा नातेवाईक असूनही सांभाळ केला जात नसलेल्या वृद्धांनी 8855850378 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.2
- आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!1
- बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.1