खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.यावेळी तहसीलदार सुनील पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत एग्रीस्टॅक, बळीराजा पानंद रस्ते योजना व इतर शेतकरीहिताच्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतरस्ते व सार्वजनिक कामांमध्ये अडथळे निर्माण करू नयेत आणि अतिक्रमण असल्यास ते स्वयंस्फूर्तीने दूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशासक पूजाताई सदानंद वाघमारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सुनील पाटील, भूमी अभिलेख अधीक्षक जे. एस. शिंदे, पुरवठा निरीक्षक रोशनी फुलझले, नायब तहसीलदार निखिल पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी मनोहर भारसाकळे, कृषी मंडळ अधिकारी अनिल डाखोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे, अशोक भिल, राजेश दीक्षित, महसूल अधिकारी अरुण देशमुख, संजय इंगळे, वैशाली घनोकार, सुरेश चराटे, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाचपोर व ए. एन. देशमुख उपस्थित होते.या शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक २०७ प्रकरणे निकाली काढली. यामध्ये फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व विविध प्रमाणपत्रांचा समावेश होता. पुरवठा विभागाने १८ प्रकरणे हाताळली, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १४ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण विभागांनीही आपापल्या योजनांद्वारे नागरिकांना सेवा पुरविल्या.शिबिरात शेकडो लाभार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे तसेच नवीन रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. याशिवाय श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत काही लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.अडगाव व परिसरातील ग्रामस्थ, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.

- खामगाव/*नारी शक्ती वंदन विधेयक: खामगावात भाजपा महिला आघाडीचा भव्य जल्लोष.*1
- Post by Gaurishankar Dhikar1
- बिबट्याचा थरकाप उडवणारा हल्ला; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत भंडारा | १७ एप्रिल २०२६ साकोली तालुक्यातील विर्शी (उमरझरी परिसर) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय कापगते यांच्या शेतातील विटाभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबासोबत ही घटना घडली. बुधवार, १५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास आई बाहेर ब्रश करत असताना अंशिका काशिनाथ मिरी (वय ५ वर्षे) ही जवळच खेळत होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली आणि अंशिकाला उचलून नेले. काही वेळानंतर जवळील मक्याच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 👉 विशेष म्हणजे, या भागात यापूर्वीही वाघिणीच्या हालचालीमुळे दहशत निर्माण झाली होती. आता पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. 📢 स्थानिकांची मागणी: वन विभागाने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. 🕊️ अंशिकाच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली…1
- बरंजळा साबळे येथे आग लागून मकासह साहित्य जळून खाक ,शेतकऱ्याचे मोठे नुकसान1
- सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. ........................1
- खामगाव : वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शहरातील गायी व इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच जनावरांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ होत असून शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाता' दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती बिकट आहे. तसेच, रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले प्लास्टिक खाल्यामुळे अनेक जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गौ तस्करी आणि बेजबाबदार मालकांवर कारवाईची मागणी अनेक पशुपालक आपली जनावरे दूध काढल्यानंतर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. या बेवारस परिस्थितीचा फायदा घेऊन शहरात गौ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी जे मालक जनावरे रस्त्यावर सोडतात, त्यांच्यावर नगर परिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने नगर पालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी सुरज यादव, सौ. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौ. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजीनगर : हनुमान चौकात दोन गटातील वादातून हवेत गोळीबार; शहरात भीतीचे वातावरण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), १७ एप्रिल २०२६ : शहरातील नेहमी गजबजलेल्या हनुमान नगर (हनुमान चौक) येथे गुरुवारी रात्री सुमारे ९:३० वाजता दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाने हवेत दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा तपशील : हनुमान चौकात दोन गटांमध्ये प्रथम वाद झाला. हा वाद लवकरच मारामारीत रूपांतरित झाला. वाद विकोपाला गेल्याने एका तरुणाने बंदूक काढून भररस्त्यात हवेत दोन गोळ्या झाडल्या. घटनेच्या धक्क्याने आसपासचे नागरिक घाबरले. गोळीबारानंतर दोन्ही गट घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस कारवाई : घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही गटातील वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पार्श्वभूमी : ही घटना शहरातील गुन्हेगारी वाढीचा भाग मानली जात आहे. गेल्या ७२ तासांत शहरात सलग गंभीर घटना घडल्या आहेत. यापूर्वी चाकूहल्ले आणि खूनाच्या घटना घडल्या होत्या. या सातत्यपूर्ण घटनांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. अधिक अपडेट : आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. ही बातमी न्यूज१८ मराठी व इतर स्थानिक माध्यमांच्या माहितीवर आधारित आहे. नवीन घडामोडींसाठी अपडेट राहा. सुरक्षित राहा! अशा घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.1
- सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे 14 एप्रिल निमित्त लावलेल्यांची अज्ञात माती फिरवणे पाडल्याची घटना घडली होती या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली होती सदरील घटना प्रकरणी उप पोलीस निरीक्षक गजानन आरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की लवकरात लवकर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळेस त्यांनी माध्यमांना दिली1