Shuru
Apke Nagar Ki App…
"घरी बायकोला काय सांगू?" गॅस सिलेंडर न मिळाल्याने संताप अनावर; गॅस एजन्सीसमोर व्यक्तीने डोके फोडले, वाळूज परिसरातील धक्कादायक प्रकाराने गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Gaurishankar Dhikar
"घरी बायकोला काय सांगू?" गॅस सिलेंडर न मिळाल्याने संताप अनावर; गॅस एजन्सीसमोर व्यक्तीने डोके फोडले, वाळूज परिसरातील धक्कादायक प्रकाराने गॅस टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
- Surendra Makode साई कृपा ट्रॅव्हल्सअमरावती, अमरावती, महाराष्ट्र😡6 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Gaurishankar Dhikar1
- दाताळा विद्युत केंद्र अभियंता यांना कार्यालयात कोंडले1
- खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.यावेळी तहसीलदार सुनील पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत एग्रीस्टॅक, बळीराजा पानंद रस्ते योजना व इतर शेतकरीहिताच्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतरस्ते व सार्वजनिक कामांमध्ये अडथळे निर्माण करू नयेत आणि अतिक्रमण असल्यास ते स्वयंस्फूर्तीने दूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशासक पूजाताई सदानंद वाघमारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सुनील पाटील, भूमी अभिलेख अधीक्षक जे. एस. शिंदे, पुरवठा निरीक्षक रोशनी फुलझले, नायब तहसीलदार निखिल पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी मनोहर भारसाकळे, कृषी मंडळ अधिकारी अनिल डाखोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे, अशोक भिल, राजेश दीक्षित, महसूल अधिकारी अरुण देशमुख, संजय इंगळे, वैशाली घनोकार, सुरेश चराटे, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाचपोर व ए. एन. देशमुख उपस्थित होते.या शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक २०७ प्रकरणे निकाली काढली. यामध्ये फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व विविध प्रमाणपत्रांचा समावेश होता. पुरवठा विभागाने १८ प्रकरणे हाताळली, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १४ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण विभागांनीही आपापल्या योजनांद्वारे नागरिकांना सेवा पुरविल्या.शिबिरात शेकडो लाभार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे तसेच नवीन रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. याशिवाय श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत काही लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.अडगाव व परिसरातील ग्रामस्थ, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.1
- Post by Triloki Yadav2
- Post by Amravati News Update1
- Post by स्मिता तलेय1
- आठवडी बाजारात घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, नगरपालिका चा चुकीचा व्यवहार आहे2
- खामगाव : शहरातील विविध भागात सध्या सुरू असलेल्या अर्धवट रस्ते कामांमुळे वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः दैना झाली आहे. मुख्य मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले असून, प्रशासनाच्या नियोजित शून्य कारभारामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.अशातच आज, १७ एप्रिल रोजी सकाळपासून अग्रसेन चौक ते भाटीया चौक दरम्यान पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने या भागातील रहदारी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. शहरातील स्टेशन रोड ते अग्रसेन चौक या मार्गाचे काम आधीच सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यातच आता अग्रसेन चौक ते भाटीया चौक या मार्गावर एका बाजूने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचा काही भाग खोदलेला आणि उर्वरित भागात खोदकामाचा मलबा वाहून नेणारे टिप्पर उभे राहत असल्याने रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.यामुळे या मार्गावर तासन् तास वाहतूक ठप्प होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एखादा सुज्ञ नागरिक पुढाकार घेतो, मात्र ताणतणावामुळे वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.भरवस्तीत आणि मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मार्गावर दिवसा खोदकाम केल्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे.धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. "प्रशासनाने नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन हे खोदकाम दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी करावे,जेणेकरून रहदारीवर परिणाम होणार नाही," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आगामी काळात उन्हाचा तडाखा आणि लग्नसराईमुळे गर्दी वाढणार आहे, त्यापूर्वी हे काम मार्गी लावावे किंवा कामाचे नियोजन बदलावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.1