logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगावात रस्ते खोदकामामुळे वाहतुकीचा बोजवारा; अग्रसेन चौक ते भाटीया चौक मार्गावर रहदारीस अडथळा ​रात्रीच्या वेळी खोदकाम करण्याची नागरिकांची मागणी ​खामगाव : शहरातील विविध भागात सध्या सुरू असलेल्या अर्धवट रस्ते कामांमुळे वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः दैना झाली आहे. मुख्य मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले असून, प्रशासनाच्या नियोजित शून्य कारभारामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.अशातच आज, १७ एप्रिल रोजी सकाळपासून अग्रसेन चौक ते भाटीया चौक दरम्यान पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने या भागातील रहदारी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. शहरातील स्टेशन रोड ते अग्रसेन चौक या मार्गाचे काम आधीच सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यातच आता अग्रसेन चौक ते भाटीया चौक या मार्गावर एका बाजूने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचा काही भाग खोदलेला आणि उर्वरित भागात खोदकामाचा मलबा वाहून नेणारे टिप्पर उभे राहत असल्याने रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.यामुळे या मार्गावर तासन् तास वाहतूक ठप्प होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एखादा सुज्ञ नागरिक पुढाकार घेतो, मात्र ताणतणावामुळे वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.भरवस्तीत आणि मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मार्गावर दिवसा खोदकाम केल्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे.धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. "प्रशासनाने नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन हे खोदकाम दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी करावे,जेणेकरून रहदारीवर परिणाम होणार नाही," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ​आगामी काळात उन्हाचा तडाखा आणि लग्नसराईमुळे गर्दी वाढणार आहे, त्यापूर्वी हे काम मार्गी लावावे किंवा कामाचे नियोजन बदलावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

7 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
7 hrs ago

खामगावात रस्ते खोदकामामुळे वाहतुकीचा बोजवारा; अग्रसेन चौक ते भाटीया चौक मार्गावर रहदारीस अडथळा ​रात्रीच्या वेळी खोदकाम करण्याची नागरिकांची मागणी ​खामगाव : शहरातील विविध भागात सध्या सुरू असलेल्या अर्धवट रस्ते कामांमुळे वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः दैना झाली आहे. मुख्य मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आता नित्याचेच झाले असून, प्रशासनाच्या नियोजित शून्य कारभारामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.अशातच आज, १७ एप्रिल रोजी सकाळपासून अग्रसेन चौक ते भाटीया चौक दरम्यान पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने या भागातील रहदारी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. शहरातील स्टेशन रोड ते अग्रसेन चौक या मार्गाचे काम आधीच सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यातच आता अग्रसेन चौक ते भाटीया चौक या मार्गावर एका बाजूने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचा काही भाग खोदलेला आणि उर्वरित भागात खोदकामाचा मलबा वाहून नेणारे टिप्पर उभे राहत असल्याने रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.यामुळे या मार्गावर तासन् तास वाहतूक ठप्प होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एखादा सुज्ञ नागरिक पुढाकार घेतो, मात्र ताणतणावामुळे वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.भरवस्तीत आणि मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मार्गावर दिवसा खोदकाम केल्यामुळे व्यवसायावरही परिणाम होत आहे.धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. "प्रशासनाने नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन हे खोदकाम दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी करावे,जेणेकरून रहदारीवर परिणाम होणार नाही," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ​आगामी काळात उन्हाचा तडाखा आणि लग्नसराईमुळे गर्दी वाढणार आहे, त्यापूर्वी हे काम मार्गी लावावे किंवा कामाचे नियोजन बदलावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खामगाव/*नारी शक्ती वंदन विधेयक: खामगावात भाजपा महिला आघाडीचा भव्य जल्लोष.*
    1
    खामगाव/*नारी शक्ती वंदन विधेयक: खामगावात भाजपा महिला आघाडीचा भव्य जल्लोष.*
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Gaurishankar Dhikar
    1
    Post by Gaurishankar Dhikar
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बिबट्याचा थरकाप उडवणारा हल्ला; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत भंडारा | १७ एप्रिल २०२६ साकोली तालुक्यातील विर्शी (उमरझरी परिसर) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय कापगते यांच्या शेतातील विटाभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबासोबत ही घटना घडली. बुधवार, १५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास आई बाहेर ब्रश करत असताना अंशिका काशिनाथ मिरी (वय ५ वर्षे) ही जवळच खेळत होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली आणि अंशिकाला उचलून नेले. काही वेळानंतर जवळील मक्याच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 👉 विशेष म्हणजे, या भागात यापूर्वीही वाघिणीच्या हालचालीमुळे दहशत निर्माण झाली होती. आता पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. 📢 स्थानिकांची मागणी: वन विभागाने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. 🕊️ अंशिकाच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली…
    1
    बिबट्याचा थरकाप उडवणारा हल्ला; ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
भंडारा | १७ एप्रिल २०२६
साकोली तालुक्यातील विर्शी (उमरझरी परिसर) येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय कापगते यांच्या शेतातील विटाभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबासोबत ही घटना घडली. बुधवार, १५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास आई बाहेर ब्रश करत असताना अंशिका काशिनाथ मिरी (वय ५ वर्षे) ही जवळच खेळत होती.
याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली आणि अंशिकाला उचलून नेले. काही वेळानंतर जवळील मक्याच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
👉 विशेष म्हणजे, या भागात यापूर्वीही वाघिणीच्या हालचालीमुळे दहशत निर्माण झाली होती. आता पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
📢 स्थानिकांची मागणी:
वन विभागाने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी.
🕊️ अंशिकाच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली…
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बरंजळा साबळे येथे आग लागून मकासह साहित्य जळून खाक ,शेतकऱ्याचे मोठे नुकसान
    1
    बरंजळा साबळे येथे आग लागून मकासह साहित्य जळून खाक ,शेतकऱ्याचे मोठे नुकसान
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    13 hrs ago
  • सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे
    1
    सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 min ago
  • सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. ........................
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला.
प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
........................
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ​खामगाव : वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शहरातील गायी व इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच जनावरांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ होत असून शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाता' दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती बिकट आहे. तसेच, रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले प्लास्टिक खाल्यामुळे अनेक जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ​गौ तस्करी आणि बेजबाबदार मालकांवर कारवाईची मागणी अनेक पशुपालक आपली जनावरे दूध काढल्यानंतर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. या बेवारस परिस्थितीचा फायदा घेऊन शहरात गौ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी जे मालक जनावरे रस्त्यावर सोडतात, त्यांच्यावर नगर परिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने नगर पालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी सुरज यादव, सौ. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौ. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    ​खामगाव : वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शहरातील गायी व इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच जनावरांना रस्त्यावर सोडून देणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने आज नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ होत असून शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाता' दर्जा दिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची स्थिती बिकट आहे. तसेच, रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेले प्लास्टिक खाल्यामुळे अनेक जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ​गौ तस्करी आणि बेजबाबदार मालकांवर कारवाईची मागणी
अनेक पशुपालक आपली जनावरे दूध काढल्यानंतर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. या बेवारस परिस्थितीचा फायदा घेऊन शहरात गौ तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी जे मालक जनावरे रस्त्यावर सोडतात, त्यांच्यावर नगर परिषदेने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर 'एकनिष्ठा गौ सेवा' संघटनेच्या वतीने नगर पालिकेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.हे निवेदन देतेवेळी सुरज यादव, सौ. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौ. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर : हनुमान चौकात दोन गटातील वादातून हवेत गोळीबार; शहरात भीतीचे वातावरण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), १७ एप्रिल २०२६ : शहरातील नेहमी गजबजलेल्या हनुमान नगर (हनुमान चौक) येथे गुरुवारी रात्री सुमारे ९:३० वाजता दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाने हवेत दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचा तपशील : हनुमान चौकात दोन गटांमध्ये प्रथम वाद झाला. हा वाद लवकरच मारामारीत रूपांतरित झाला. वाद विकोपाला गेल्याने एका तरुणाने बंदूक काढून भररस्त्यात हवेत दोन गोळ्या झाडल्या. घटनेच्या धक्क्याने आसपासचे नागरिक घाबरले. गोळीबारानंतर दोन्ही गट घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस कारवाई : घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही गटातील वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पार्श्वभूमी : ही घटना शहरातील गुन्हेगारी वाढीचा भाग मानली जात आहे. गेल्या ७२ तासांत शहरात सलग गंभीर घटना घडल्या आहेत. यापूर्वी चाकूहल्ले आणि खूनाच्या घटना घडल्या होत्या. या सातत्यपूर्ण घटनांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. अधिक अपडेट : आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. ही बातमी न्यूज१८ मराठी व इतर स्थानिक माध्यमांच्या माहितीवर आधारित आहे. नवीन घडामोडींसाठी अपडेट राहा. सुरक्षित राहा! अशा घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर : हनुमान चौकात दोन गटातील वादातून हवेत गोळीबार; शहरात भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), १७ एप्रिल २०२६ : शहरातील नेहमी गजबजलेल्या हनुमान नगर (हनुमान चौक) येथे गुरुवारी रात्री सुमारे ९:३० वाजता दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाने हवेत दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी किंवा इजा झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेचा तपशील :
हनुमान चौकात दोन गटांमध्ये प्रथम वाद झाला. हा वाद लवकरच मारामारीत रूपांतरित झाला. वाद विकोपाला गेल्याने एका तरुणाने बंदूक काढून भररस्त्यात हवेत दोन गोळ्या झाडल्या. घटनेच्या धक्क्याने आसपासचे नागरिक घाबरले. गोळीबारानंतर दोन्ही गट घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिस कारवाई :
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.
आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दोन्ही गटातील वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
पार्श्वभूमी :
ही घटना शहरातील गुन्हेगारी वाढीचा भाग मानली जात आहे. गेल्या ७२ तासांत शहरात सलग गंभीर घटना घडल्या आहेत. यापूर्वी चाकूहल्ले आणि खूनाच्या घटना घडल्या होत्या. या सातत्यपूर्ण घटनांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
अधिक अपडेट : आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
ही बातमी न्यूज१८ मराठी व इतर स्थानिक माध्यमांच्या माहितीवर आधारित आहे. नवीन घडामोडींसाठी अपडेट राहा.
सुरक्षित राहा! अशा घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे 14 एप्रिल निमित्त लावलेल्यांची अज्ञात माती फिरवणे पाडल्याची घटना घडली होती या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली होती सदरील घटना प्रकरणी उप पोलीस निरीक्षक गजानन आरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की लवकरात लवकर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळेस त्यांनी माध्यमांना दिली
    1
    सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे 14 एप्रिल निमित्त लावलेल्यांची अज्ञात माती फिरवणे पाडल्याची घटना घडली होती या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली होती सदरील घटना प्रकरणी उप पोलीस निरीक्षक गजानन आरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की लवकरात लवकर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळेस त्यांनी माध्यमांना दिली
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.