Shuru
Apke Nagar Ki App…
भाऊचे ते घरातून 76 हजाराचा ऐवज लंपास, अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल : बावची (ता. वाळवा) येथील जुन्या अंबिका मंदिराजवळ असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार राजाराम शिंदे (वय ३८, रा. बावची, ता. वाळवा) यांचे सलूनचे दुकान आहे. दि. ९ मे रोजी रात्री ही चोरीची घटना घडली. शिंदे कुटुंबीय रात्री झोपले असताना, चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला व २५ हजार रुपये किमतीची ३५ मण्यांची सोन्याची बोरमाळ, ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख ६ हजार रुपये असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
EXPRESS NEWS
भाऊचे ते घरातून 76 हजाराचा ऐवज लंपास, अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल : बावची (ता. वाळवा) येथील जुन्या अंबिका मंदिराजवळ असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार राजाराम शिंदे (वय ३८, रा. बावची, ता. वाळवा) यांचे सलूनचे दुकान आहे. दि. ९ मे रोजी रात्री ही चोरीची घटना घडली. शिंदे कुटुंबीय रात्री झोपले असताना, चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला व २५ हजार रुपये किमतीची ३५ मण्यांची सोन्याची बोरमाळ, ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख ६ हजार रुपये असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. आष्टा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.1
- रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाच्या ठेकेदाराने केलेल्या कामातील चुकीमुळे एक संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.1
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते1
- राहुल गांधींसारखा 'बुद्धू' राजकारणी मी पाहिला नाही; नारायण राणेंचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राहुल गांधींना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान असून त्यांच्यासारखा 'बुद्धू' राजकारणी मी आजवर पाहिला नाही," अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेचे अज्ञान आणि राहुल गांधींवर टीका पंतप्रधानांच्या विधानावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे म्हणाले की, जेव्हा एखादा देश आयात कमी करतो आणि निर्यात वाढवतो, तेव्हाच त्याची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जीडीपी वाढतो. हे साधे गणित राहुल गांधींना समजत नाही. "लोकसभेत राहुल गांधी ज्या प्रकारे वावरतात आणि बोलतात, त्यावरून त्यांना पंतप्रधानांशी कसं बोलायचं हे देखील कळत नाही. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत काही चांगलं केलं असतं, तर आज त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था झाली नसती," असेही राणे म्हणाले. तसेच, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपने बाहेर काढल्यामुळे आता त्यांना शहाणपण सुचत असून, त्यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. इंधन बचत: पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याचे राणेंनी स्वागत केले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची समस्या ही देशापुढील मोठी समस्या आहे. मंत्री स्वतःहून गाड्यांची मागणी करत नाहीत, तर सुरक्षा व्यवस्थेनुसार ताफा दिला जातो. मात्र, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन योग्य असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. राजू शेट्टींच्या आंदोलनावर टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी १५ मे रोजी 'वर्षा' बंगल्यावर काढणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना राणे यांनी त्यांना टोला लगावला. शेट्टींचे काम: "राजू शेट्टींना आंदोलनाशिवाय दुसरे काहीच माहित नाही. ते ना शेती करतात, ना धंदा. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते आंदोलन करतात," असे राणे म्हणाले. शेतकरी मदत: कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही निधी मंजूर केला आहे. ही मदत शेवटची नसून जून महिन्यात ती वाढवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, राजू शेट्टी माझे मित्र आहेत आणि त्यांना योग्य वेळी मी नक्कीच सल्ला देईन, असेही राणे यांनी मिश्किलपणे नमूद केले.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1
- युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार राम पाचकाळे यांनी अनोखे आंदोलन करत जाळीत उडी घेतली. आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याऐवजी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली.1