logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री परमेश्वर देवाला भगवी पताका व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण 🔱 श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक भगव्या ध्वजेतून प्रकटले हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शेकडो वर्षांची परंपरा जपत पारण्याचा उपवास व जागरण सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी पारण्याचा उपवास धरून रात्रभर जागरण केले. मध्यरात्री अभिषेक, महाआरती व भव्य अलंकार सोहळ्यानंतर मंदिर परिसर पूर्णतः भक्तिमय झाला. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भगवी पताका महादेवाला अर्पण करून श्री परमेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार भाविकांनी पारण्याचा उपवास सोडला. ज्येष्ठ जाणकारांच्या मते, ही परंपरा आनंदीकालापासून सुरू असून श्रद्धा, संयम व भक्तीचे प्रतीक मानली जाते. अलंकारमय श्री परमेश्वरांचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. #महाशिवरात्री #श्रीपरमेश्वर #हरहरमहादेव #भगवीपताका #पुरणपोळी_नैवेद्य पारण्याचाउपवास हिमायतनगर वाढोणा धार्मिकपरंपरा भक्तीभाव Mahashivratri ShriParmeshwar SpiritualIndia TempleFestival https://www.instagram.com/reel/DU0ZTB5km77/?igsh=MXI0eWR1eDZtNGh4bg==

1 day ago
user_NNL Marathi
NNL Marathi
Local News Reporter Nanded, Maharashtra•
1 day ago

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री परमेश्वर देवाला भगवी पताका व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण 🔱 श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक भगव्या ध्वजेतून प्रकटले हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शेकडो वर्षांची परंपरा जपत पारण्याचा उपवास व जागरण सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी पारण्याचा उपवास धरून रात्रभर जागरण केले. मध्यरात्री अभिषेक, महाआरती व भव्य अलंकार सोहळ्यानंतर मंदिर परिसर पूर्णतः भक्तिमय झाला. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भगवी पताका महादेवाला अर्पण करून श्री परमेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार भाविकांनी पारण्याचा उपवास सोडला. ज्येष्ठ जाणकारांच्या मते, ही परंपरा आनंदीकालापासून सुरू असून श्रद्धा, संयम व भक्तीचे प्रतीक मानली जाते. अलंकारमय श्री परमेश्वरांचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. #महाशिवरात्री #श्रीपरमेश्वर #हरहरमहादेव #भगवीपताका #पुरणपोळी_नैवेद्य पारण्याचाउपवास हिमायतनगर वाढोणा धार्मिकपरंपरा भक्तीभाव Mahashivratri ShriParmeshwar SpiritualIndia TempleFestival https://www.instagram.com/reel/DU0ZTB5km77/?igsh=MXI0eWR1eDZtNGh4bg==

More news from Maharashtra and nearby areas
  • १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
    2
    १० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा
जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीख
नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला.
या कारवाईत अंदाजे ५ ब्रास रेती (सुमारे २५ हजार रुपये), एक जेसीबी मशीन (३ लाख रुपये) आणि एक ट्रॅक्टर (७ लाख ५० हजार रुपये) असा एकूण १०,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी धर्मपाल ज्ञानोबा कांबळे (वय ३४, व्यवसाय पोलीस, नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून आरोपी
बालाजी केशवराव लमदाडे, बापुराव शीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०३(२), ३०३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसानी प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत गित्ते  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस कर्मचारी विठ्ठल शिंदे, आरिफ, जमीर सरवे आदींचा सहभाग होता.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews
    1
    शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨
हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच!
#हिमायतनगर
#शिवपुतळा
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड
#आमरणउपोषण
#शिवप्रेमी
#महाराष्ट्र
#लोकशाही
#नगरपंचायत
#BreakingNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    1
    वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..!
नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे
पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल
असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला
नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
    2
    मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.