नाशिक:ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीला नवे बळ;ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतरण ही काळाची गरज* नाशिक:-समाजात वाचनाची आवड वाढवून ज्ञानसमृद्ध आणि विचारशील पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतरण, मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाखो पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे तसेच विविध उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती बळकट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नाशिक आणि श्री माणकेश्वर वाचनालय, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नाशिक ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक सुनील जगताप, कवी लक्ष्मण माहाडिक, माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन शिंदे, निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कांताबाई कर्डिले, उप नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, माणकेश्वर वाचनालय निफाड चे अध्यक्ष मधुकर शेलार, उपाध्यक्ष मेघा जंगम, प्राचार्य ढगे, देविदास कापसे, नगरसेवक सागर पाटील कुंदे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय करंजकर, वि. दा. व्यवहारे यांच्यासह मान्यवर, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. संचालक श्री गाडेकर म्हणाले की, राज्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने शासकीय ग्रंथालयांचे डिजिटल रूपांतरण हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रंथालय ॲपच्या माध्यमातून आता कोणत्याही वाचकाला घरबसल्या आपल्या मोबाईलवरून पुस्तक, लेखक, विषय किंवा प्रकाशक यांची माहिती सहजपणे शोधता येणार आहे. सध्या शासकीय ग्रंथालयांमध्ये सुमारे ४८ लाख पुस्तके उपलब्ध असून त्यापैकी जवळपास ४२ लाख पुस्तकांची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये एकूण सात कोटींहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ही सर्व पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावीत आणि ग्रंथसंपदेची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून ग्रंथालय ॲपला मान्यता देण्यात आली. परिषदेमधील अध्यक्ष व सर्व सदस्यांनी या उपक्रमाला सकारात्मक पाठिंबा दिला असून त्यानुसार डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालयांसाठी विविध योजनाही राबविण्यात येत आहेत, नुकतेच राज्यातील एक हजार ग्रंथालयांना पुस्तकांचे संच पाठविण्यात आले आहेत. तसेच सुमारे २०० ग्रंथालयांना कपाटे व रॅक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच कारागृहातील ग्रंथालयांनाही पुस्तक संच व कपाटे देण्यात आली असून राज्यातील सात कारागृहांना याचा लाभ झाला आहे. तसेच नुकसानग्रस्त ग्रंथालयांना मदत देण्यासाठी ५७ ग्रंथालयांना पुस्तक संच व कपाटे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रंथालय क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा अभ्यासक्रमात सुधारणा करून तो दोन महिन्यांवरून सहा महिन्यांचा करण्यात आला आहे. यामध्ये प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे. यावर्षीपासून नाशिकमध्येही सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ग्रंथपाल प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू करण्यात आला असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या पुस्तक विक्री स्टॉलला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद करत त्यांनी वाचकांना अधिकाधिक पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन केले. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक दृढ होऊन समाज अधिक विचारशील व ज्ञानसमृद्ध होईल, असा विश्वास श्री. गाडेकर यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची वाट मोकळी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश देत समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला. या सर्व महान व्यक्तींनी ज्ञानाचा अमृत समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. पुस्तक हे माणसाला विचार व संस्कार देतेआणि समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये असल्याचे मत अध्यक्ष ढोकळे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवाजी ढेपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री जगताप यांनी तर आभार ग्रंथालय संचालक श्री. जोपुळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसचंलन राजेंद्र उगले यांनी केले. *ग्रंथ दिंडीने झाला नाशिक ग्रंथ महोत्सवाचा शुभारंभ* उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचलन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नाशिक व श्री मानकेश्वर वाचनालय तालुका निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रंथोत्सव 2025 हा 10 व 11 मार्च 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी ग्रंथ दिंडीने याचा शुभारंभ झाला. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नाशिक सुनील जगताप, कवी लक्ष्मण माहाडिक, माणकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन शिंदे, निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कांताबाई कर्डिले, उप नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, माणकेश्वर वाचनालय निफाड चे अध्यक्ष मधुकर शेलार, उपाध्यक्ष मेघा जंगम, प्राचार्य ढगे, देविदास कापसे, नगरसेवक सागर पाटील कुंदे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय करंजकर, वि. दा. व्यवहारे यांच्यासह मान्यवर, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. श्री माणकेश्वर वाचनालय येथून ढोलताशाच्या गजरात व ग्रंथ वाचनाचे संदेश देत ग्रंथ दिंडीला सुरवात झाली. यात वैनतेय इंग्लिश मिडियम स्कूल, वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स निफाड, ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल, होरायझन अकॅडमी, श्री. महिमान इंटरनॅशनल स्कूल, निफाड इंग्लीश स्कूल, वीसडम इंटरनॅशनल स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड, कर्मवीर गणपतदादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. विद्यार्थांनी केलेल्या महापुरूषांच्या वेशभूषेणे नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी न्यायमुर्ती रानडे दर्शन व वाचनाचे महत्त्व सांगणारे 'वाचल तर वाचाल' हे पथनाट्य सादर केले. माणकेश्वर वाचनालय -पेठ गल्ली - शनी चौक -छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे ग्रंथ दिंडी मार्गस्थ झाली.

- 4 बार अबॉर्शन कराया, 5वीं बार प्रेग्नेंट होने पर मारपीट कर घर से निकाला, शादी का झांसा देकर युवती से यौन शोषण1
- “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.1
- ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.1
- शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by सचिन शेंडगे 10101
- महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।1
- अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.1