logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढते -सचिव प्रा. विलास घुमरे बातमी दि. १७/०९/२०२६ पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढते -सचिव प्रा. विलास घुमरे कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कुर्डुवाडी- स्वेरी व एस.व्ही.आय.टी. या दोन संस्थांच्या वतीने जो पुरस्कार दिला जातोय त्या पुरस्कर्त्यांची निवड अत्यंत पारदर्शी पद्धतीने केलेली असून यामुळे पुरस्काराला न्याय मिळाला आहे. ‘आदर्श’ या शब्दाची निवड करताना पाहिलेली गुणवत्ता, सूक्ष्म अभ्यास, परीक्षण, निरीक्षण, उपक्रमशीलता आदी बाबी तपासल्यामुळे पुरस्काराला विशेष महत्व आहे. अशा पुरस्कारामुळे संबंधित शिक्षकांवरील जबाबदारी आणखी वाढते आणि कार्य करण्यासाठी स्फूर्ती मिळते.’ असे प्रतिपादन विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव प्रा. विलास घुमरे यांनी केले. शिक्षणातील नवनवीन उपक्रमांसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर ) मधील एसव्हीआयटी तथा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने माढा, बार्शी व करमाळा या तीन तालुक्यांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन कुर्डुवाडीतील ‘तुळजाई लॉन्स अँड लॉजिंग’ बार्शी नाका, करमाळा रोड याठिकाणी केले होते. याप्रसंगी विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव प्रा. विलास घुमरे हे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. बी.पी. रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ.बी.पी.रोंगे हे अभ्यासपूर्ण मांडणी करत होते. ते म्हणाले ‘शासन दरबारी आपले प्रश्न व्यवस्थितपणे मांडून कशाप्रकारे ते सुटायला हवे याचा आराखडा तयार करून सादर करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी स्वेरीचे विद्यार्थी ज्याप्रमाणे करिअरमध्ये यश मिळवत आहेत त्याप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न देखील अभ्यासपूर्ण धर्तीवर सोडविण्यासाठी आपण सक्षम आहोत.’ अशी ग्वाही दिली. यानिमित्ताने कुर्डुवाडीत तिन्ही तालुक्यांतील शाळेच्या व्यवस्थापन मंडळातील पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड संख्येने उपस्थित होते. दोन वाजता सुरु झालेला कार्यक्रम तब्बल ५ तास चालला. यामध्ये माढा (११८), बार्शी (१२६) व करमाळा (६४) या तीन तालुक्यांत मिळून एकूण ३०८ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण’ सोहळ्यासाठी श्री. भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. जयप्रकाश बिले, शिवाजी शिक्षण मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे, कुर्डुवाडीच्या श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक डॉ. एम. पी. सुरवसे, अर्णव शिक्षण संकुल वैरागचे सचिव रविंद्र कापसे, गुरुकुल विद्यालय पांडेचे अध्यक्ष नितीन भोगे, भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरचे सचिव अर्जुनराव सरक, कै. शोभाताई सोपल विद्यालय घाणेगावचे शिक्षक प्रतिनिधी निवृत्ती साठे, अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह इतर पदाधिकारी, माढा, बार्शी व करमाळा या तिन्ही तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी स्वेरी, पंढरपूर व एस.व्ही.आय.टी. सोलापूरच्या संयोजन समिती व तिन्ही तालुक्यातील संयोजक व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रा. यादव पनसवाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. क्षणचित्रे- १. प्रत्येकजण ‘आदर्श ज्ञानयात्री’ पुरस्कारासाठी फेटा बांधल्यामुळे रुबाबदार दिसत होते. २. पुरस्कार स्वरुपात दिलेले स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ,मानपत्र व प्रमाणपत्र सह पुरस्कारार्थी आपल्या कुटुंबियांसह डॉ.रोंगे सरांसोबत छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करत होते. ३. डॉ.रोंगे सरांच्या उमेदवारीवर अनेक शिक्षक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे अनेकांनी डॉ. रोंगे सरांचा सत्कार केला. ४. उत्तम आणि स्वादिष्ट भोजनामुळे उपस्थित पुरस्कार विजेते, त्यांचे कुटुंबीय, पालक वर्ग उत्साहित झाले.

2 hrs ago
user_Tej maharashtra varta
Tej maharashtra varta
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
0ac61720-0267-47c9-a9da-aba2d6452e62

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    2
    फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ!
कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा
कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे.
इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार
नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    26 min ago
  • कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    1
    कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत
कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    4
    नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026.
नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाहतूक विस्कळीत.
मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
जुनी झाडे हटवण्याची मागणी
या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    1
    दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला??
निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!!
तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!!
महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    user_सुरज हादवे
    सुरज हादवे
    Business banking service निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    1
    रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    1
    बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं; तर हजारो IPS, IAS, IRS, IFS अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!! पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक. विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई. ही सर्वच औषधांची कहानी. हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते??? मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे. ही गरीबांची पिळवनुक आहे,
    1
    आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा
एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं;
तर हजारो IPS, IAS, IRS, IFS  अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!!
पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक.
विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई.
ही सर्वच औषधांची कहानी.
हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते???
मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे.
ही गरीबांची पिळवनुक आहे,
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    1
    आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता.
१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    1
    लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. 
हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नियोजनबद्ध कटाचा संशय.
बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पालकमंत्री शहरात असतानाच थरार.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.