logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ऑटो रिक्षा - मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी अहिल्यानगर, दि. १० : राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळाच्या उपक्रमांमध्ये चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे. या लाभांसाठी इच्छुक चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार व पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जाईल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल. मात्र, अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यावर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबतचा संदेश अर्जदाराच्या मोबाईलवर प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर नोंदणी स्थिती तपासावी. सभासद नोंदणी शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये अशी एकूण ८०० रुपये रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाला आहात” असा पुष्टी संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #AnandDigheKalyankariMandal #RickshawDriversWelfare #AutoRickshawNews #TransportDepartment #SocialSecurity #AhilyanagarRTO #DriverBenefitScheme #AnandDigheMandal #InsuranceForDrivers #ScholarshipForKids #MaharashtraTransport #RickshawUnion #रिक्षा_चालक_कल्याण

on 11 March
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
on 11 March

ऑटो रिक्षा - मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी अहिल्यानगर, दि. १० : राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळाच्या उपक्रमांमध्ये चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे. या लाभांसाठी इच्छुक चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार व पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जाईल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल. मात्र, अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यावर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबतचा संदेश अर्जदाराच्या मोबाईलवर प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर नोंदणी स्थिती तपासावी. सभासद नोंदणी शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये अशी एकूण ८०० रुपये रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाला आहात” असा पुष्टी संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #AnandDigheKalyankariMandal #RickshawDriversWelfare #AutoRickshawNews #TransportDepartment #SocialSecurity #AhilyanagarRTO #DriverBenefitScheme #AnandDigheMandal #InsuranceForDrivers #ScholarshipForKids #MaharashtraTransport #RickshawUnion #रिक्षा_चालक_कल्याण

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.
    1
    करण्यात आले आहे. एम.आय.टी. महाविद्यालय आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धानोरे येथे हा मेळावा होईल. तरुणांना करिअरची नवी दिशा आणि रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर किंवा संपर्क क्रमांकावर नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    4
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
    2
    प्रेस नोट
सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
*▢ चौकट : 1*
विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही.
या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
*चौकट : 2*
वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या 
या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे,  तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ,  माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti
    1
    Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    21 hrs ago
  • ‘जयभीम’च्या गर्जनेने संभाजीनगर निळ्या रंगात न्हाले दरम्यान, विविध ठिकाणी अनुयायांकडून अभिवादन कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे फलक झळकले. प्रशासनाकडूनही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरभर सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, ‘जयभीम’च्या घोषणांनी संपूर्ण संभाजीनगर निळ्या चैतन्याने भारावून गेले.
    4
    ‘जयभीम’च्या गर्जनेने संभाजीनगर निळ्या रंगात न्हाले
दरम्यान, विविध ठिकाणी अनुयायांकडून अभिवादन कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे फलक झळकले. प्रशासनाकडूनही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरभर सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, ‘जयभीम’च्या घोषणांनी संपूर्ण संभाजीनगर निळ्या चैतन्याने भारावून गेले.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.