Shuru
Apke Nagar Ki App…
सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने पाण्याच्या शुद्धतेबाबत उपाययोजना कराव्यात पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची शुद्धता, जलजन्य साथीचे रोग आणि स्वच्छतेबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सीईओ विशाल नरवाडे यांनी दिले आहेत. ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यानुसार नियमित तपासणीवर भर द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पुढील तीन महिन्यांचा टीसीएल (ब्लिचिंग पावडर) साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खरेदी केलेल्या टीसीएलचे नमुने जिल्हा भूजल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे बंधनकारक आहे.
EXPRESS NEWS
सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने पाण्याच्या शुद्धतेबाबत उपाययोजना कराव्यात पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची शुद्धता, जलजन्य साथीचे रोग आणि स्वच्छतेबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने करा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सीईओ विशाल नरवाडे यांनी दिले आहेत. ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. त्यानुसार नियमित तपासणीवर भर द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पुढील तीन महिन्यांचा टीसीएल (ब्लिचिंग पावडर) साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खरेदी केलेल्या टीसीएलचे नमुने जिल्हा भूजल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे बंधनकारक आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने पाटील दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. सदर तक्रारीची प्रत मा. जिल्हाधिकारी, सांगली यांनाही देण्यात आलेली आहे. असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने पाटील यांनी इशारा दिला आहे त्याबाबत निवेदनही दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही अथवा चौकशी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे जनतेमध्ये व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपणास पुन्हा एकदा हे स्मरणपत्र स्वरूपाचे निवेदन सादर करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. विजयकुमार वाघ यांनी अनेक निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवहार व प्रशासकीय कामकाजामध्ये गंभीर अनियमितता केल्याची चर्चा असून त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे. त्याबाबत खालील मुद्द्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. १) डोंगल खरेदी प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार : आरोग्य विभागाच्या वेबसाईटसाठी आवश्यक डोंगल खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारातील प्रचलित दर आणि प्रत्यक्ष खरेदी केलेले दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. संबंधित खरेदी प्रक्रिया, निविदा अटी, पुरवठादारांची निवड व आर्थिक मंजुरी यांची कसून चौकशी करण्यात यावी. २) महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक दबाव व आर्थिक शोषण : शासकीय सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच सीएचओ कर्मचाऱ्यांचे इन्सेंटिव्ह भत्ते मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १५०० रक्कम घेतली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. बीएएमएस मेडिकल ऑफिसर यांच्या ११ महिन्यांच्या करारानंतर नव्याने आदेश काढण्यासाठी एका महिन्याचा पगार घेतला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणाची गोपनीय व निष्पक्ष चौकशी व्हावी. ३) 'टीबी मुक्त अभियान' अंतर्गत निधी गैरवापराचा संशय : शासकीय "१०० डेज कार्यक्रम" अंतर्गत राबविण्यात आलेल्या टीबी मुक्त अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या सुमारे ११ कोटी ४ लाख निधीच्या खर्चाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी. तसेच प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आलेले ११५,००० हे निधी त्या स्तरावर खर्च होणे अपेक्षित असताना संबंधित रक्कम सीएचए कर्मचाऱ्यांकडून धनादेशाद्वारे परत घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका मुद्रणालयातून स्टेशनरी खरेदी करून त्याच्या पावत्या जिल्ह्यातील उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे स्वतःची मुद्रण व्यवस्था उपलब्ध असताना जिल्ह्याबाहेरून खरेदी का करण्यात आली, हा गंभीर संशयाचा विषय आहे. सुमारे ४५ लाखांहून अधिक रकमेच्या खर्चातून निकृष्ट दर्जाचे व अनावश्यक साहित्य उपकेंद्रांना पुरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याऐवजी सर्व निधी एकत्रित करून एकाच प्रिंटिंग प्रेसमार्फत साहित्य खरेदी करण्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी होणे आवश्यक आहे.महोदय, सांगली जिल्हा परिषदेची गौरवशाली परंपरा व जनतेचा विश्वास कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. काही भ्रष्ट व संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषर्षीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे1
- विसापूर तालुका तासगाव ज्योतिबा राजा यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा म्हणजे भक्ती परंपरा आणि उत्साह महासंगम आहे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या आनंदाने भक्तीचा आनंद फुल आहे. उंच हत्ती घोडे लेझीम झांज सनई चौघडे यांचे सह विसापूर परिसरातील सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने आनंदाने मिरवणुकीत सहभागी झाले पहा मिरवणुकीचा सोहळा कॅमेरा मध्ये3
- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. पोलिसांचा धाडसी सापळा मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ०१ देशी बनावटीचे पिस्टल ०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. तपासात धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. "जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.2
- सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचे ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’; जाचक अटी रद्द करण्याची मागणी कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. शेतकऱ्यांवरील जाचक अटी तात्काळ रद्द करून comprehensive loan waiver जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी बावनकुळे यांची उपहासात्मक वेशभूषा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. बंगला, गाडी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत मनसेने सरकारवर टीका केली. “शेतकरी देशाचा अन्नदाता असून तो विविध प्रकारचे कर भरतो. मात्र मदतीच्या वेळी त्याच्यावर अटींचा बोजा टाकला जातो. दुसरीकडे आमदार आणि मंत्र्यांना मानधन व pension देताना कोणतीही अट लावली जात नाही,” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांबाबत दुजाभाव न करता तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन, निलेश पाटील, कुमार पुदाले, बाळासाहेब कदम, वैभव भोसले, विश्वजित पाटील, वृषभ आमते, युवराज येडुरे, संजय पाटील, राहुल पाटील, निलेश धुम्मा, भगवंत जांभळे, राजेंद्र चव्हाण, निलेश भिसे, तुषार मालवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2
- आजचे राशीभविष्य तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे ते जाणून घ्या. बारा राशींचे विस्तृत भविष्य येथे वाचा, जे तुम्हाला तुमच्या दिवसाची योजना बनविण्यात मदत करेल.1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1