logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अतिक्रमण : जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर अतिक्रमण : जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर! शिरसोली रोडवरील 'स्लॉटर हाऊस'ची जागा होणार अतिक्रमणमुक्त; महापौर दीपमाला काळे यांचे कडक आदेश जळगाव: शिरसोली रोडवरील महानगरपालिकेच्या मालकीच्या १३ एकर (स्लॉटर हाऊस परिसर) जागेवरील अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या जागेवरील सर्व अतिक्रमणे येत्या चार दिवसांत पोलीस बंदोबस्तात हटवण्याचे स्पष्ट आदेश महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि संबंधित विभागांना दिले आहेत. मोहाडी रस्त्यावरील गट नंबर ६० मधील '५ हेक्टर ४ आर' म्हणजेच सुमारे १३ एकर ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. ही जागा 'स्लॉटर हाऊस' म्हणून ओळखली जाते. पूर्वी या ठिकाणी कत्तलखाना होता. मनपाने ही जागा अटलांटा कंपनीला वापरण्यासाठी दिली होती. मात्र, गेल्या काही काळापासून या मोकळ्या जागेवर अनधिकृत झोपडपट्टीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून आपले बस्तान बसवले होते. *विकासासाठी उचलले पाऊल* महानगरपालिकेची ही मौल्यवान जागा अतिक्रमणामुळे अडकून पडली होती. या जागेचा विकास करण्याचा मानस महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाकडून येथील झोपडपट्टीधारकांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून हटवले नाही. *पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार* अतिक्रमणधारकांनी नोटिसीला केराची टोपली दाखवल्याने आता महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार, पुढील चार दिवसांत पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाद्वारे ही संपूर्ण १३ एकर जागा रिकामी करून घेतली जाईल, जेणेकरून भविष्यातील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल.

7 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Kishor k Patil Patil
    2
    Post by Kishor k Patil Patil
    user_Kishor k Patil Patil
    Kishor k Patil Patil
    पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujib Shaikh
    Mujib Shaikh
    Sillod, Aurangabad•
    3 hrs ago
  • धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. #DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews
    1
    धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
#DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • #jalna#marathinews#
    1
    #jalna#marathinews#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    1
    भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**
    1
    सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    44 min ago
  • #marathi#news#jalna#
    1
    #marathi#news#jalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.