Shuru
Apke Nagar Ki App…
धुळे महापौरांचा 'ॲक्शन मोड'! देवपूर अमरधाममध्ये स्वतः झाडू हाती घेऊन केली स्वच्छता... धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. #DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews
Dhule News 24
धुळे महापौरांचा 'ॲक्शन मोड'! देवपूर अमरधाममध्ये स्वतः झाडू हाती घेऊन केली स्वच्छता... धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. #DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी आज अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता आणि तुटलेले अंत्यविधी ओटे पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी महापौरांनी स्वतः झाडू हातात घेऊन अमरधाम परिसराची स्वच्छता करत अधिकाऱ्यांना देखील स्वच्छतेबाबत धारेवर धरले. तसेच तुटलेले ओटे तातडीने दुरुस्त करण्याचे आणि परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. #DhuleNews #Devpur #Amardham #MayorVisit #MaharashtraNews #BreakingNews1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by Kishor k Patil Patil2
- तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰1
- मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.1