*प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लांजी, सायफळ व टाकळी घाटावरून माहूर तालुक्यात रेती तस्करांचा हैदोस* *माहूर तालुक्यात रेती तस्करांचा हैदोस* माहूर ग्रामीण प्रतिनिधी धनंजय आराध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लांजी, सायफळ व टाकळी घाटावरून सर्रास रेती उपसा माहूर तालुक्यातील लांजी सायफळ व टाकळी येथील रेती घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवस-रात्र ट्रॅक्टर, टिप्पर आणि इतर वाहनांच्या माध्यमातून सर्रास रेतीची वाहतूक होत असून महसूल प्रशासन व संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे स्थानिकांच्या माहितीनुसार, नदी पात्रातून नियमबाह्य पद्धतीने रेतीचा उपसा केला जात असून त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रेती तस्करांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचेही समोर येत आहे. अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध रेती उत्खनन बंद करावे, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी रेती घाटांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सिंधगि, चालगनीसह अनेक गावांमध्ये ट्रेझर बोटी वापरून रेतीचा अवैध उपसा सर्रास सुरू आहे. या गंभीर प्रकारावर महसूल प्रशासन गप्प असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.1
- हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1
- Post by Pratik1