Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यात रस्त्यावर 'चूल' पेटली! गॅस टंचाईवरून वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक आंदोलन.... देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.
Dhule News 24
धुळ्यात रस्त्यावर 'चूल' पेटली! गॅस टंचाईवरून वंचित बहुजन आघाडीचे आक्रमक आंदोलन.... देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- देशभरातील गॅस सिलेंडर टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या घोषणांसह केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले.1
- “जळगाव जिल्ह्यात 11 आमदार आणि 2 खासदार महायुतीचे असूनही, अनेक छोट्या गावांमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पाणीटंचाई कायम आहे. राजकीय ताकद मोठी असली तरी स्थानिक पातळीवरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. ही परिस्थिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव दर्शवते. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो वेळेवर पूर्ण झाला नाही तर अशा ताकदीचा उपयोग काय? आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.” #JalgaonWaterCrisis #WaterForJalgaon #MaharashtraCM #DevendraFadnavis #WaterProblem #ActNowCM #JalgaonNeedsWater #PaniHakkacha #Mahayuti1
- Post by Pramod dada bari1
- पाण्यासाठी 'रणरागिणी' आक्रमक; गणुर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप! चांदवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे गणुर येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत संतप्त महिला आणि नागरिकांनी हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला. गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये (लाईनमध्ये) तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. परिणामी, २९ मार्चपासून संपूर्ण गावात पाण्याचा थेंबही आलेला नाही. भर उन्हाळ्यात सलग आठ-नऊ दिवस पाणी नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. "उन्हाचा कडाका वाढत असताना घरात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आम्ही जायचे कुठे?" असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. MGP लाईनचा बिघाड तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा. पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. भविष्यात अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्रशासन यावर नेमकी काय आणि किती लवकर कार्यवाही करते, याकडे संपूर्ण गाण्याचे लक्ष लागले आहे.1
- ७२ तासांत पाच खून! नांदेड शहर हादरले; सोनू कल्याणकर यांची मॉर्निंग वॉकमध्ये निर्घृण हत्या नांदेड (६ एप्रिल २०२६) – नांदेड शहरात गुन्हेगारीचा कहर सुरू असून, अवघ्या ७२ तासांत (किंवा ४८-७० तासांत) पाचवा खून घडला आहे. आज सोमवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास श्रीनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे शहराध्यक्ष आणि रिअल इस्टेट व्यावसायिक सोनू दिगांबरराव कल्याणकर (वय ३३-३५ वर्षे) यांची भर रस्त्यावर धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेचा तपशील सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी (कुत्र्यासोबत) रामराव पवार मार्गावरून जात असताना, कुमार ड्रेसेस समोर (बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर) ३ ते ७ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर तलवार, खंजर आणि चाकू अशा धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यांच्या शरीरावर १७ हून अधिक वार झाले. अतिरक्तस्रावामुळे जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या वेळी गजबजलेल्या भागात घडल्याने परिसर हादरला. हत्येचे कारण पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या पूर्व वैमनस्यातून (जुने वैर) झालेली आहे. सोनू कल्याणकर यांच्यावर २०२१ मध्येही प्राणघातक हल्ला झाला होता. काही वृत्तांनुसार, गोलू मंगनाळे किंवा इतरांशी जुने वाद होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले की, हा हल्ला नियोजनबद्ध होता. आरोपी आणि पोलिस कारवाई पोलिसांनी अवघ्या काही तासांत चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन अल्पवयीन आहेत. मुख्य आरोपी अंकुश गंदमवार (किंवा संबंधित) याला झरी शिवारात ताब्यात घेताना पोलिसांशी चकमक झाली. आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, त्यात अंकुशच्या पायाला गोळी लागली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला. सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. खुनांची मालिका गेल्या ७०-७२ तासांत (सलग तिसऱ्या दिवशी) नांदेडमध्ये पाच खून झाले आहेत. यात गँगवार, जुन्या वैर आणि इतर घटना समाविष्ट आहेत (उदा. ई-स्क्वेअर परिसरात तिहेरी खून, मुरमुरा गल्लीत एक खून इ.). यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक जण नांदेडला ‘बिहार’ सारखे होत असल्याची टीका करत आहेत. पोलिस प्रशासनाने शहरात अतिरिक्त बंदोबस्त वाढवला असून, आरोपींना लवकरात लवकर न्यायाच्या कठडीत आणण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (ही बातमी एबीपी माझा, लोकसत्ता, लोकमत, साम टीव्ही, न्यूज१८ मराठी, पुढारी इत्यादी विश्वसनीय वृत्तस्रोतांवरून संकलित करण्यात आली आहे. तपास सुरू असल्याने अधिक अपडेट्स येऊ शकतात.) नांदेड पोलिसांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले असताना, शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- ठाण्यात 'प्रेसिडेंट कप'चा उत्साह; राजकीय दिग्गजांची उपस्थिती ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमवर 'प्रेसिडेंट कप' क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार किशोर भाऊ दराडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला. या प्रसंगीनासिक जिल्ह्यातील येवला येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजकीय ताकद आणि क्रिकेटचा जल्लोष या निमित्ताने पाहायला मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते. या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1