logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाघाळे येथे ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे सहायक निबंधक राजकुमार राठोड वाघाळे येथे ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात संपन्न नंदुरबार, दि. 17 सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी बांधवांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहायक निबंधक राजकुमार राठोड यांनी केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ विशेष जनजागृती अभियान वाघाळे (ता. नंदुरबार) येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना सहायक निबंधक श्री. राठोड बोलत होते. यावेळी वाघाळेच्या सरपंच सौ. सुषमा पवार, ग्रामपंचायत अधिकारी आर. आर. महाले, प्रविण पवार, डीडीसी बँकेचे तपासणीस केशव जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामू गांगुर्डे आदी उपस्थित होते. सहायक निबंधक श्री. राठोड म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.जेणे करुन पुढील टप्पयात लाभार्थ्यांची संख्या वाढून अधिक शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील 28 हजार 760 कर्ज खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 18 हजार 806 शेतकरी पात्र ठरले असून, 13 हजार 137 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. अद्याप 5 हजार 669 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तसेच 3 हजार 330 शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC केंद्र) जाऊन आधार प्रमाणीकरण व आवश्यक प्रक्रिया विनाशुल्क पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सरपंच सुषमा पवार म्हणाल्या की, वाघाळे गावातील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही किंवा फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण तसेच फार्मर आयडी काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल. शासनाच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून गावात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आल्याबद्दल त्यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक संदीप गावित यांनी लोकसंवाद उपक्रमाची माहिती दिली. ‘लोकसंवाद-2026’ अभियान यशस्वी करण्यासाठी वाघाळे येथील ग्रामस्थ काशीनाथ पवार, मनिलाल पवार, इसाराम बागुल, ईश्वर बहिरम तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक संदीप गावित, वरिष्ठ लिपिक दिनेश चौरे, लक्ष्मण पवार, विकास नाठे, चंद्रकांत अहिरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

1 hr ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
1 hr ago
91c1d938-185a-4b00-8120-e96bb96d55ea

वाघाळे येथे ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे सहायक निबंधक राजकुमार राठोड वाघाळे येथे ‘लोकसंवाद-2026’ विशेष जनजागृती अभियान उत्साहात संपन्न नंदुरबार, दि. 17 सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकरी बांधवांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहायक निबंधक राजकुमार राठोड यांनी केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ विशेष जनजागृती अभियान वाघाळे (ता. नंदुरबार)

2e16a7d0-7d7f-43b7-ab70-c713d616e6f6

येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना सहायक निबंधक श्री. राठोड बोलत होते. यावेळी वाघाळेच्या सरपंच सौ. सुषमा पवार, ग्रामपंचायत अधिकारी आर. आर. महाले, प्रविण पवार, डीडीसी बँकेचे तपासणीस केशव जगताप, ग्रामपंचायत सदस्य रामू गांगुर्डे आदी उपस्थित होते. सहायक निबंधक श्री. राठोड म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया

61b3b01f-2ab4-4d93-aa3d-45cf26a1c94e

लवकरात लवकर पूर्ण करावी.जेणे करुन पुढील टप्पयात लाभार्थ्यांची संख्या वाढून अधिक शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ मिळेल. जिल्ह्यातील 28 हजार 760 कर्ज खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 18 हजार 806 शेतकरी पात्र ठरले असून, 13 हजार 137 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. अद्याप 5 हजार 669 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तसेच 3 हजार 330 शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC केंद्र) जाऊन आधार प्रमाणीकरण व आवश्यक प्रक्रिया विनाशुल्क पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सरपंच सुषमा पवार म्हणाल्या की, वाघाळे

c16c9dcc-e3ea-48c9-8f1f-4c3158df9807

गावातील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही किंवा फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण तसेच फार्मर आयडी काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल. शासनाच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून गावात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आल्याबद्दल त्यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक संदीप गावित यांनी लोकसंवाद उपक्रमाची माहिती दिली. ‘लोकसंवाद-2026’ अभियान यशस्वी करण्यासाठी वाघाळे येथील ग्रामस्थ काशीनाथ पवार, मनिलाल पवार, इसाराम बागुल, ईश्वर बहिरम तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक संदीप गावित, वरिष्ठ लिपिक दिनेश चौरे, लक्ष्मण पवार, विकास नाठे, चंद्रकांत अहिरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले

भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले
भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल 
बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    1
    मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    1
    जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 day ago
  • हरित कुंभ’ व ‘लोकसंवाद’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचा संदेश *विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त कुंभ व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती* नाशिक, आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने ‘हरित कुंभ जनजागृती कार्यक्रम’ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे सुरू असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून नाशिककरांमध्ये पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभाबाबत जनजागृती करण्यात आली. यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या सहकार्याने दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून ‘नदी वाचवा, पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. बी. डी. भालेकर हायस्कूल पटांगण येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला. ‘नदी स्वच्छता हेच जीवन’, ‘पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी’, ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’ आणि ‘कचरा व्यवस्थापन हाच खरा धर्म’ या संदेशांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पर्यावरणपूरक जीवनशैली आणि स्वच्छतेची सवय यांचा थेट संबंध स्पष्ट करण्यात आला. पथनाट्याला गणेश भक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध जनजागृतीपर संदेशांशी नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरित कुंभाच्या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग वाढविणे, पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी जनमानस तयार करणे आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देत गणेशोत्सव कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नाशिक, हरित कुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे, सुनील मेंढेकर, संकेत मेंढेकर तसेच यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, नदी संवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीच्या प्रयत्नांत सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    हरित कुंभ’ व ‘लोकसंवाद’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचा संदेश

*विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त कुंभ व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती*
नाशिक,  आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने ‘हरित कुंभ जनजागृती कार्यक्रम’ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे सुरू असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून नाशिककरांमध्ये पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभाबाबत जनजागृती करण्यात आली. 
यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या सहकार्याने दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून ‘नदी वाचवा, पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. बी. डी. भालेकर हायस्कूल पटांगण येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला.
‘नदी स्वच्छता हेच जीवन’, ‘पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी’, ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’ आणि ‘कचरा व्यवस्थापन हाच खरा धर्म’ या संदेशांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पर्यावरणपूरक जीवनशैली आणि स्वच्छतेची सवय यांचा थेट संबंध स्पष्ट करण्यात आला.
पथनाट्याला गणेश भक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध जनजागृतीपर संदेशांशी नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरित कुंभाच्या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग वाढविणे, पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी जनमानस तयार करणे आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देत गणेशोत्सव कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नाशिक, हरित कुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे, सुनील मेंढेकर, संकेत मेंढेकर तसेच यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, नदी संवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीच्या प्रयत्नांत सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    53 min ago
  • कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    1
    कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    1
    ब्रेकिंग न्यूज आप लोगों  bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show
देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष
सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    1
    नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार

नाशिक 
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    3
    *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.