हरित कुंभ’ व ‘लोकसंवाद’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचा संदेश *विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त कुंभ व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती* नाशिक, आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने ‘हरित कुंभ जनजागृती कार्यक्रम’ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे सुरू असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून नाशिककरांमध्ये पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभाबाबत जनजागृती करण्यात आली. यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या सहकार्याने दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून ‘नदी वाचवा, पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. बी. डी. भालेकर हायस्कूल पटांगण येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला. ‘नदी स्वच्छता हेच जीवन’, ‘पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी’, ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’ आणि ‘कचरा व्यवस्थापन हाच खरा धर्म’ या संदेशांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पर्यावरणपूरक जीवनशैली आणि स्वच्छतेची सवय यांचा थेट संबंध स्पष्ट करण्यात आला. पथनाट्याला गणेश भक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध जनजागृतीपर संदेशांशी नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरित कुंभाच्या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग वाढविणे, पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी जनमानस तयार करणे आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देत गणेशोत्सव कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नाशिक, हरित कुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे, सुनील मेंढेकर, संकेत मेंढेकर तसेच यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, नदी संवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीच्या प्रयत्नांत सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.1
- 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक4
- Post by सोनू पटेल4
- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- भिवंडी तालुक्यातील कोशिंबी येथे गणेश उत्सवाची 41 वर्षाची परंपरा कायम1
- पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी “काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश4
- नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- लोकनेते दयानंद चोरघेे यांचा शहापूर तालुक्यात गणपती दर्शन दौरा1