भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर महिला व युवतींसाठी शौचालय तसेच सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविन्याची मागणी भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर महिला व युवतींसाठी शौचालय तसेच सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविन्याची मागणी सौ. अनिता अंकुश जाधव यांनी नगराध्यक्ष यांच्याकडे केली मागणी भोकरदन शहरात पोलीस स्टेशन पासून तर जालना रोड नवीन भोकरदन पर्यंत तसेच महात्मा फुले चौकापासून (सिल्लोड रोड) तर जाफराबाद रोड भोकरदन शहरहद्दी पर्यंत तसेच बाजारपट्टी भागातील भाजीपाला विक्रेत्या महिलांसाठी कुठेही शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे महिला व मुलींना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते अनेक मुली भोकरदन शहरात शिक्षणासाठी येत असतात तर अनेक महिला बँक तसेच कार्यालयीन कामानिमित्त व बाजारपेठेत खरेदीसाठी अनेक महिला भोकरदन शहरात येत असतात परंतु शहरात महिला व मुलींसाठी शौचालयाची सुविधा नसल्याने अनेक मुली कमी पाणी पितात व कमी पाणी पिल्याने महिलांना व युवतींना अनेक आरोग्य समस्या निर्माण होत असुन शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, लघवीत जंतू संसर्ग, मूत्रपिंडात खडे तयार होणे, बद्धकोष्ठता (Constipation), त्वचा कोरडी होणे,थकवा व अशक्तपणा यासह शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास ऊर्जा कमी होते आणि पाण्याची कमतरता असल्यास वारंवार डोकेदुखी होऊ शकते एकंदरीत महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पोटाचे तसेच किडनी स्टोनचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे भोकरदन शहरात मुख्य रस्त्याच्या कडेला महिला व मुलींसाठी शौचालयाची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात यावी, तसेच भोकरदन शहरात सर्व मुख्य रस्त्यांवर व चौकांमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणेकरून महिला व मुलींच्या सुरक्षेस मदत होईल. तरी मा. मुख्याधिकारी साहेबांनी भोकरदन शहरातील महिला व मुलींच्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ निराकरण करावे, ही विनंती.

- महावितरणचा 'शॉक'! बुलढाण्यात विद्युत तारेच्या घर्षणामुळे साडेचार एकर मका जळून खाक1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- Post by अरबाज शेख1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.2